Sunday, August 21, 2022

उंब्रज मधील नियोजित शिवस्मारकाची शिष्टमंडळाकडून पाहणी

 


             उंब्रज मधील नियोजित शिवस्मारकाची शिष्टमंडळाकडून पाहणी



उंब्रज मधील नियोजित शिवस्मारकाची शिष्टमंडळाकडून पाहणी

उंब्रज मधील नियोजित शिवस्मारकासाठी  लिंगायत समाजातील संतोष बेडके यांचे विशेष योगदान 




उंब्रज (दि. 21 प्रतिनिधी ) प्रसाद वाकडे लिंगायत TV live 

उंब्रजच्या बाजारपेठेमध्ये मध्यवर्ती ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 16 फुटी उंच भव्य अश्वारूढ पुतळा व्हावा ही सबंध उंब्रज पंचक्रोशीतील  नागरिकांची व शिवप्रेमींची अनेक दिवसांपासून इच्छा आहे.  हे शिवकार्य  संकल्प  पूर्तता करण्याची जबाबदारी 'श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान, उंब्रज' यांनी घेतली आहे. लोकवर्गणीतून भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचे काम श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान, उंब्रजच्या मार्फत चालू केले आहे.  उंब्रज व आजूबाजूच्या परिसरातून या कार्यास खूपच मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.




   या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब व नामदार शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते होणाऱ्या उंब्रज येथील नियोजित शिव स्मारकाचे भूमिपूजन संदर्भात आज मा. शरदजी कणसे शिवसेना संपर्कप्रमुख, सातारा जिल्हा यांनी नियोजित उंब्रज मधील  शिवस्मारक स्थळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.  यावेळी ठाण्याचे विभाग प्रमुख श्री गोविंद उबाळे, श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बेडके, 




 उपाध्यक्ष शरद जाधव,  खजिनदार रणजीत कदम, अभिजीत जाधव, कॅप्टन इंद्रजीत जाधव, महेश जाधव, तुषार पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख समीर जाधव, उपजिल्हाप्रमुख दक्षिण अक्षय मोहिते आदि मान्यवर उपस्थित होते. उंब्रज च्या वैभवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे नक्कीच भर पडेल. उंब्रज पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिवकार्यास हातभार वर्गणीच्या स्वरूपात आपले बहुमोल असे योगदान द्यावे असे आवाहन श्री शिवयोध्दा प्रतिष्ठान, उंब्रज यांनी केले आहे.




Saturday, August 20, 2022

शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणारा उंब्रज चा सुप्रसिद्ध भीम - कुंती उत्सव

 


शेकडो  वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणारा उंब्रज

 चा सुप्रसिद्ध भीम - कुंती उत्सव 

    शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणारा उंब्रज चा सुप्रसिद्ध भीम - कुंती उत्सव





रविंद्र वाकडे.

उंब्रजदि.3 - उंब्रजजि.सातारा येथील अतिशय श्रध्देचा व ऐत्याहासिक परंपरा असलेला भीम - कुंती  पंचक्रोशी उत्सव हा  गेली शेकडो वर्षे सर्व धर्म समभाव ऐक्याची परंपरा जोपासणारा उत्सव आहे.पवित्र श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी तो साजरा केला जातो.

             उंब्रज हे गाव  तारळीउत्तरमांड व कृष्णामाई या तीन नद्यांच्या संगमावर वसलेले असून या गावाला ऐत्याहसिक व धार्मिक असा वारसा लाभलेला आहे. या गावाचे आराध्य दैवत श्री उमेश्वर महादेव असून शेजारीच कोटी गावचे दैवत श्री कोटेश्वर व वडोली येथील दैवत श्री भिकेश्वर अशा तीन दैवतांच्या सानिध्यात व पवित्र कृष्णामाईच्या काठावर उंब्रज हे गाव वसलेले आहे.शिवाय येथेच पवित्र कृष्णामाई पूर्वाभिमुखी होते.

------------------------------------------------------------------------------------------

संपूर्ण देशभरात फक्त महाराष्ट्रामधील कराड तालुक्यात उंब्रज येथेच हा उस्तव एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो उंब्रज नंतर तारळे आणि उरुल तालुका पाटण येथे हि ह औअस्तव साजरा केला जातो मात्र उंब्रज येथील उस्तव हा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो याला शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे  

------------------------------------------------------------------------------------------

श्रावणातील शेवटच्या सोमवारी माता कुंती व भीम या माय - लेकरांची पारंपरिक पद्धतीने भेट होते.हा उत्सव येथे भीम - कुंती उत्सव म्हणून ओळखला जातो. गजराजावरील अंबारीतून कुंती भीमाच्या दर्शनासाठी मिरवणुकीने जाऊन ,नंतर या उत्सवाची सांगता होते.

तथापि या उत्सवाला जवळ जवळ 400 वर्षाची परंपरा आहे.असा दावा याच गावातील अनेक जेष्ठ नागरिक जाणकार दंतकथेच्या आधारे करतात.सुमारे चारशे वर्षांपूर्वी उंब्रज येथील पाटील यांचा मुलगा खूप आजारी पडला होता.अनेक गुणकारी दवा-पाणी घेवून सुद्धा त्याच्या तब्ब्येतीत तिळमात्र फरक पडत नव्हता.पाटील यांच्या घरातील सर्व मंडळी निराश झाली होती.कोणताच पर्याय त्यांच्या समोर उरला नसताना धार्मिक वृत्ती असणाऱ्या पाटील यांनी  भीमसेन महाराज यांची मातीची मूर्ती तयार करीन अशी मनोकामना केली .तसे काही दिवसातच त्यांना त्यांच्या मनोकामनेचे फळ मिळाले व त्यांचा मुलगा थोड्याच दिवसात एकदम ठणठणीत बरा झाला.तेव्हापासून ते आज अखेर उंब्रज पंचक्रोशीत भीम - कुंती उत्सव साजरा होत आहे. माता कुंती व भीमसेन महाराज पाटलांच्या नवसास पावल्याचे वृत्त वेगाने पंचक्रोशीत पसरले. रंजले - गांजलेले सर्वजण या उत्सवास हजेरी लावू लागले.भीम - कुंती सर्वांच्याच नवसास पावू लागले.हळूहळू ही यात्रा विराट रूप धारण करू लागली .त्यानंतर गेली शेकडो वर्षे ही यात्रा अखंड चालू आहे.या यात्रेस परिसरातील लोक हजारोंच्या संख्येने येत असतात.उंब्रज हे या परिसरातील  प्रमुख बाजार पेठेचे ठिकाण असल्याने व्यापारी व शेतकरी यांची येते सतत वर्दळ असते.त्यामुळे व्यापारी व शेतकरी यांच्यात एकोपा रहावा म्हणून हा उत्सव  जोरात साजरा करण्यात येवू लागला.शेतकऱ्यांमध्ये कष्ट करण्यासाठी भीमा सारखी ताकद यावी.असाही या यात्रेमागचा उद्देश असल्याचे सांगितले जाते.

 ******************************************************************************

कराड ते वाई हा परिसर पांडवकालीन  काळातील  दंडकारण्य या नावानी प्रसिद्ध आहे या काळात पांडवांचे  अज्ञातवासातील शेवटचे वर्ष हे पांडवांनी  सातारा  जिल्ह्यात   व्यथित केले आहे त्यांनी आपला 1  वर्षा चा काळ हा   आगशिव नगर ते वाई या  भागात घालवला या काळात त्यांनी आपले वास्तव्य हे  डोंगरावर अज्ञात ठिकाणी  महादेवाची मंदीरे डोंगर कपारीत  खोदुन काढली  आणि या ठिकाणी त्यांनी आपले वास्तव्य केले या मध्ये आगा शिव नगर येथील पांडव कालीन लेणी पाटण तालुक्यातील नारळ वाडी येथील रुद्रेश्वर महादेव  मंदिर मांडवे नागठाणे ,  येथे भैरवगड,  वाई येथील किचन टेकडी येथे शेवटचे वास्तव्य झाले  वाई येथे भीमसेन यांचे कडून किचकाचा  वध झाला  या  नंतर भीमसेन यांनी  आपल्या अंगावर उडालेले रक्त आणि वस्त्र धुण्यासाठी उंब्रज तालुका कराड येथील कृष्णा नदीवर आले होते  त्यांच्या पद स्पर्शाने पावन झाले आहे अशी आख्यायिका  शेकडो वर्षांपासून सांगितली जात आहे पांडवांच्या वास्तव्या बाबतीत  पुरावे  देखील आहेत

********************************************************************************** 

       या यात्रेची तयारी सुमारे एक महिना आधीपासून केली जाते .भीमाची मातीची मूर्ती करण्यासाठी गावातील हौशी लोक आपल्या बैलगाड्या सजवून  वाजत गाजत गावा बाहेरून माती आणतात.कुंती मातेची प्रतिमा श्री महामुनी यांच्या घरी केली जाते.भीमाची महाकाय प्रतिमा तयार करण्यासाठी 16 बैलगाड्या माती आणून सुमारे तीन टन वजनाची प्रतिमा तयार केली जाते.भीम - कुंती माता यांच्या मूर्ती तयार करण्याचे काम गेल्या काही वर्षापासून उंब्रज पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आनंदपूर या गावचे श्री.आदिक कुंभार आणि त्यांचे सहकारी हे करतात.आई आपल्या लेकरास भेटण्यास किती आतूर असते.हे या यात्रेद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवले जाते.कुंती मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना भीम चौकात केली जाते.त्यामुळेच या चौकाला  'भीम चौक '  असे नाव पडले आहे.श्रावणातील शेवटच्या सोमवारी कुंती मातेची गजराजा वरून भीमाच्या दर्शन भेटीसाठी वाजत गाजत मिरवणूक निघते.

या वेळी ढोल ताशे वाजवले जातात.ग्राम प्रदक्षिणा पूर्ण झाल्या नंतर भीम चौकात भीम कुंतीच्या भेटीचा कार्यक्रम होतो.

त्यावेळी येथे जमलेल्या भाविकांना डोळ्याचे पारणे फिटल्याचा भास होतो. हा मंगलमय क्षण सर्वांना आनंदी करतो.नंतर भीम व कुंतीची मूर्ती सर्व भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते .एक महिना भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते व नवस ही बोलले जात असतात .




गतवर्षीचे ज्यांचे नवस पूर्ण झाले आहेत.ते भिमासाठी धोनचा व कुंती मातेसाठी चोळी -  खण नारळाचे तोरण अर्पण करतात.भीम - कुंतीच्या पूजा अर्चेचे काम श्री. मेठावर कुटुंबीय पाहतात.या सर्व कामात भीमसेन मंडळ अपार कष्ट करते.एक महिन्या नंतर भाद्रपद पौर्णिमेला भीम - कुंती यांना सर्वांच्या दर्शनासाठी दिल्ली दरवाजा येथे आणले जाते.सर्व भाविक त्या संध्याकाळी दर्शनाचा लाभ घेतात .यावेळी मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा व इतर कार्यक्रम ठेवले जातात.तसेच भजन किर्तनाचा पण कार्यक्रम आयोजित केला जातो.त्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम होऊन भीम - कुंतीच्या प्रतिमा विसर्जनासाठी कृष्णा नदीच्या काठावर नेल्या जातात.हा  भीम गाडा '  ओढण्यासाठी तरुणांचे  खास दोन गट तयार केले जातात.पुढे भीम - कुंतीचे प्रस्थान होऊन मूर्तींचे विधिपूर्वक विसर्जन केले जाते व उत्सवाची सांगता होते.

आजच्या बदलत्या काळाबरोबर उत्सवाचे स्वरूप ही बदलू लागले आहे.मात्र भाविकांच्या मनात या उत्सवाबद्दल मनातील श्रद्धा आजही कायम आहे .

या उस्तव  कालावधीत भीमसेन आणि माता कुंती यांची पूजा करण्याचा मान हा उंब्रज येथील लिंगायत समाजातील बबनराव मेणकर यांचे कुटुंबाकडे असतो सध्या बबन मेणकर यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव विकास मेणकर आणि कुटुंबीय करत आहेत .

   भीमसेन उत्सव मंडळ ,ग्रामपंचायत उंब्रज  तसेच उंब्रज पोलीस स्टेशन चे सपोनि अजय गोरड  आणि सर्व कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य करून हा

सदरचा सोहळा   योग्य रित्या संपन्न होणेसाठी योग्य ते नियोजन करून घेतात आणि हा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत माता कुंती आणि पुत्र भीमसेन यांच्या भेटीचा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा होतो

 हे मात्र निश्चित . भीम  राजेश राजेश महाराज की जय

 

विशेष लेख रवींद्र वाकडे

 


Friday, August 19, 2022

दि विश्वेश्वर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मा.सुनीलशेठ रुकारी यांची निवड


 दि विश्वेश्वर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मा.सुनीलशेठ रुकारी यांची निवड 
सातारा, दि.20 - रविंद्र वाकडे
 वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे कार्याध्यक्ष व लिंगायत संघर्ष समिती चे अध्यक्ष ,
आमच्या सर्वांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान मा. सुनीलशेठ नामदेवराव रूकारी यांची पुणे येथील प्रत्येक लिंगायतांचा मानबिंदू असणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा दि विश्वेश्वर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी  एकमताने बिनविरोध निवड झाली आहे.
त्याबद्दल मा.प्रदिपजी साखरे, कार्याध्यक्ष,वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन,लिंगायत संघर्ष समिती,महाराष्ट्र.वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही  लाईव्ह यांचे तर्फे हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 

Wednesday, August 17, 2022

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल हणेगाव येथे स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

 


स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल हणेगाव येथे स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा.  





देगलूर( दि.१९)  प्रतिनिधी:महादेव उप्पे

 देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

     यावेळी सकाळी ७:३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करून अनेक वेशभुषा परिधान केलेल्या चिमुकल्यांचा गावभर प्रभातफेरी रॅली काढण्यात आली. त्यानंतर शाळेत भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त भाषणांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.




     या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मौजम अजिजसाब फारूखी तर प्रमुख पाहुणे म्हणून लालू मल्लेवाड उपस्थित होते,तसेच शाळेचे मुख्याध्यापक मा. आनंद बत्तीनवार, रामतीर्थे सर,पाटिल सर, बेंबरेकर मॅडम, बैलवाड मॅडम, लंगडे मॅडम, गन्ने मॅडम,सुकाळे,संगेवार व पालकांची उपस्थिती होती.




लिंगायत समाजातील मान्यवरांना जीवनगौरव व समाजभुषण पुरस्काराचे उदगीर येथे 25 सप्टेंबर रोजी वितरण

 


लिंगायत समाजातील मान्यवरांना जीवनगौरव व समाजभुषण पुरस्काराचे उदगीर येथे 25 सप्टेंबर रोजी वितरण



लातूर  दि  १६ :- प्रतिनिधी शिवकुमार कल्याणी देगलूर खानापूर 

 महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवरांना लिंगायत महासंघाच्यावतीने लातूर येथील बसव महामेळाव्यात दिले जाणारे जीवनगौरव, समाजभुषण आणि अक्कमहादेवी पुरस्काराचे रविवार दि.25 सप्टेंबर 2022 रोजी  वधू-वर परिचय मेळावा रघुकूल मंगल कार्यालय, उदगीर येथे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. लिंगायत महासंघाच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथे प्रतीवर्षी बसव महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. हे आयोजन गेल्या 10 वर्षापासून सातत्याने होत आहे. या बसव महामेळाव्यात लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या धडपडी व होतकरु कार्यकर्त्यांना व सामाजिक बांधिलकी जपणार्‍या गुणवंतांना जीवनगौरव/समाजभुषण व अक्कमहादेवी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्रातील दोन वरिष्ठ मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. तर 31 विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजभुषण पुरस्कार दिला जातो. तसेच 3 मान्यवर महिलांना अक्कमहादेवी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.


यावर्षीचा लातूर येथे होणारा बसव महामेळावा रद्द करण्यात आला असुन त्यात दिल्या जाणार्‍या पुरस्काराचे वितरण 25 सप्टेंबर 2022 रोजी उदगीर येथे होणार्‍या राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळाव्यात केले जाणार असल्याचे लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.




स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून धानोरी (पुणे) येथील शिवयोगी प्रतिष्ठानच्यावतीने राजु जुबरे व डॅा. भीमराव पाटील लिखित स्वातंत्र्य लढ्यात लिंगायतांचे योगदान या पुस्तकाचे प्रकाशन धानोरी येथील शिवयोगी चौकात संपन्न

 



             स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून धानोरी (पुणे) येथील शिवयोगी प्रतिष्ठानच्यावतीने  राजु जुबरे व डॅा. भीमराव पाटील लिखित स्वातंत्र्य लढ्यात लिंगायतांचे योगदान या पुस्तकाचे प्रकाशन                    धानोरी येथील शिवयोगी चौकात संपन्न


 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून धानोरी (पुणे) येथील शिवयोगी प्रतिष्ठानच्यावतीने  राजु जुबरे व डॅा. भीमराव पाटील लिखित स्वातंत्र्य लढ्यात लिंगायतांचे योगदान या पुस्तकाचे प्रकाशन  धानोरी येथील शिवयोगी चौकात संपन्न


पुणे,दि.१५   : नरसिंग मुळे  प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून धानोरी (पुणे) येथील शिवयोगी प्रतिष्ठानच्यावतीने  

राजु जुबरे व डॅा. भीमराव पाटील लिखित स्वातंत्र्य लढ्यात लिंगायतांचे योगदान या पुस्तकाचे प्रकाशन



करण्यात आले. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील विविध भागांतील ७५ ठिकाणी या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन सोमवारी (दि.१५) करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर शिवयोगी चौकातही प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा धानोरी (पुणे) येथील शिवयोगी चौकात संपन्न झाला. पुस्तकाचे प्रकाशन प्रणयराज सोसायटीचे चेअरमन जगजितसिंग बांगर, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत टिंगरे, गणेश पाटील, शशिकांत भोसले, राजू ठोंबरे, हनुमंत कुटे, पोलीस नाईक प्रवीण भालचिम यांचे हस्ते करण्यात आले. 

            यावेळी शिवयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुरुनाथ बिराजदार,  मार्गदर्शक यशवंत बिराजदार, सुनील समाने सर, प्रकाश बिराजदार, संतोष सातपुते, डॉ.दत्ता खैरनार, सुशील देटे, अरुण बिराजदार, अमित महापदी, वैभव रणसिंग, सौ.वृषाली बिराजदार, सौ.प्रांजली समाने,डॉ. स्मिता बिराजदार, पूर्वा बिराजदार, स्वरा बिराजदार, काव्या बिराजदार, नमन बिराजदार नयन बिराजदार, श्रवण बिराजदार उपस्थित होते.



          स्वातंञ्य लढा हा सर्व भारतीयांच्या एकात्मतेचा लढा होता. या लढ्यात लिंगायत समाजाचेही ऐतिहासिक योगदान होते.१२ व्या शतकापासूनच लिंगायत समाजाला क्षाञतेजाची पराक्रमी परंपरा लाभली आहे. तोच वारसा जपत १८५७ च्या उठावापूर्वीपासून (कित्तुर राणी चन्नम्मा-१८२४) ते गोवा मुक्तीसंग्राम (१९६१) पर्यंतच्या सर्व लढ्यात लिंगायत समाजाने सक्रिय असा लढा दिला आहे. लिंगायत समाजातील पूर्वजांच्या शौर्याची, वीरत्वाची, त्याग-बलिदानाची परंपरा "स्वातंञ्यलढ्यात लिंगायतांचे योगदान" या पुस्तकात मांडली आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे.




Tuesday, August 16, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हणेगाव येथील शाळेच्या भव्य प्रभात फेरीने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले

 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हणेगाव येथील शाळेच्या भव्य प्रभात फेरीने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हणेगाव येथील शाळेच्या भव्य प्रभात फेरीने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले 






देगलूर( दि.१७)  ;- महादेव उप्पे  लिंगायत TV live देगलूर ,प्रतिनिधी

 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्रांतिवीरांच्या वेशभूषेत हणेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात हणेगाव नगरीतून प्रभात फेरी काढली.यात ढोल पथक, तिरंगा पथक, हिंदू, मुस्लिम, शिख, बौद्ध या सर्व धर्माच्या व आपल्या श्रद्धास्थान व्यक्तिमत्वाच्या वेशभूषेतून विद्यार्थ्यांनी भारतीय एकात्मतेचे दर्शन घडविले.हम सब एक है हा नारा उल्लेखनीय व साजेसा वाटत होता.




     बेटी हिंदुस्तान की या व इतर गीतावर विद्यार्थ्यींनीनी नृत्य  सादरीकरणातून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अधोरेखित केला.



 इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी भगतसिंग, राजगुरू,सुखदेव,झाशी की राणी लक्ष्मीबाई,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू,नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या थोर व्यक्तींच्या वेशभूषेत सहभागी होऊन प्रभात फेरीची शोभा वाढवली. 

       हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सौ.ईदलगावे मॅडम,बच्चेवार मॅडम,सोनवणे मॅडम, चौधरी सर  या शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले.




लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...