स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हणेगाव येथील शाळेच्या भव्य प्रभात फेरीने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हणेगाव येथील शाळेच्या भव्य प्रभात फेरीने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले
देगलूर( दि.१७) ;- महादेव उप्पे लिंगायत TV live देगलूर ,प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्रांतिवीरांच्या वेशभूषेत हणेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात हणेगाव नगरीतून प्रभात फेरी काढली.यात ढोल पथक, तिरंगा पथक, हिंदू, मुस्लिम, शिख, बौद्ध या सर्व धर्माच्या व आपल्या श्रद्धास्थान व्यक्तिमत्वाच्या वेशभूषेतून विद्यार्थ्यांनी भारतीय एकात्मतेचे दर्शन घडविले.हम सब एक है हा नारा उल्लेखनीय व साजेसा वाटत होता.
बेटी हिंदुस्तान की या व इतर गीतावर विद्यार्थ्यींनीनी नृत्य सादरीकरणातून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अधोरेखित केला.
इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी भगतसिंग, राजगुरू,सुखदेव,झाशी की राणी लक्ष्मीबाई,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू,नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या थोर व्यक्तींच्या वेशभूषेत सहभागी होऊन प्रभात फेरीची शोभा वाढवली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सौ.ईदलगावे मॅडम,बच्चेवार मॅडम,सोनवणे मॅडम, चौधरी सर या शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले.



No comments:
Post a Comment