लिंगायत समाजातील मान्यवरांना जीवनगौरव व समाजभुषण पुरस्काराचे उदगीर येथे 25 सप्टेंबर रोजी वितरण
लातूर दि १६ :- प्रतिनिधी शिवकुमार कल्याणी देगलूर खानापूर
महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवरांना लिंगायत महासंघाच्यावतीने लातूर येथील बसव महामेळाव्यात दिले जाणारे जीवनगौरव, समाजभुषण आणि अक्कमहादेवी पुरस्काराचे रविवार दि.25 सप्टेंबर 2022 रोजी वधू-वर परिचय मेळावा रघुकूल मंगल कार्यालय, उदगीर येथे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. लिंगायत महासंघाच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथे प्रतीवर्षी बसव महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. हे आयोजन गेल्या 10 वर्षापासून सातत्याने होत आहे. या बसव महामेळाव्यात लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या धडपडी व होतकरु कार्यकर्त्यांना व सामाजिक बांधिलकी जपणार्या गुणवंतांना जीवनगौरव/समाजभुषण व अक्कमहादेवी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्रातील दोन वरिष्ठ मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. तर 31 विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजभुषण पुरस्कार दिला जातो. तसेच 3 मान्यवर महिलांना अक्कमहादेवी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.
यावर्षीचा लातूर येथे होणारा बसव महामेळावा रद्द करण्यात आला असुन त्यात दिल्या जाणार्या पुरस्काराचे वितरण 25 सप्टेंबर 2022 रोजी उदगीर येथे होणार्या राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळाव्यात केले जाणार असल्याचे लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.



No comments:
Post a Comment