उंब्रज मधील नियोजित शिवस्मारकाची शिष्टमंडळाकडून पाहणी
उंब्रज मधील नियोजित शिवस्मारकाची शिष्टमंडळाकडून पाहणी
उंब्रज मधील नियोजित शिवस्मारकासाठी लिंगायत समाजातील संतोष बेडके यांचे विशेष योगदान
उंब्रज (दि. 21 प्रतिनिधी ) प्रसाद वाकडे लिंगायत TV live
उंब्रजच्या बाजारपेठेमध्ये मध्यवर्ती ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 16 फुटी उंच भव्य अश्वारूढ पुतळा व्हावा ही सबंध उंब्रज पंचक्रोशीतील नागरिकांची व शिवप्रेमींची अनेक दिवसांपासून इच्छा आहे. हे शिवकार्य संकल्प पूर्तता करण्याची जबाबदारी 'श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान, उंब्रज' यांनी घेतली आहे. लोकवर्गणीतून भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचे काम श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान, उंब्रजच्या मार्फत चालू केले आहे. उंब्रज व आजूबाजूच्या परिसरातून या कार्यास खूपच मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब व नामदार शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते होणाऱ्या उंब्रज येथील नियोजित शिव स्मारकाचे भूमिपूजन संदर्भात आज मा. शरदजी कणसे शिवसेना संपर्कप्रमुख, सातारा जिल्हा यांनी नियोजित उंब्रज मधील शिवस्मारक स्थळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ठाण्याचे विभाग प्रमुख श्री गोविंद उबाळे, श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बेडके,
उपाध्यक्ष शरद जाधव, खजिनदार रणजीत कदम, अभिजीत जाधव, कॅप्टन इंद्रजीत जाधव, महेश जाधव, तुषार पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख समीर जाधव, उपजिल्हाप्रमुख दक्षिण अक्षय मोहिते आदि मान्यवर उपस्थित होते. उंब्रज च्या वैभवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे नक्कीच भर पडेल. उंब्रज पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिवकार्यास हातभार वर्गणीच्या स्वरूपात आपले बहुमोल असे योगदान द्यावे असे आवाहन श्री शिवयोध्दा प्रतिष्ठान, उंब्रज यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment