Wednesday, May 25, 2022

लिंगायत संघर्ष समिती तर्फे गौरव सोहळा

लिंगायत संघर्ष समिती तर्फे गौरव सोहळा 
सातारा, दि.25 - प्रतिनिधी प्रा.अजय शेटे.
लिंगायत संघर्ष समिती,महाराष्ट्र तर्फे रविवार दि.22 रोजी  समता पतसंस्था,कोपरगाव येथे दु.3.30 वा.लिंगायत लोकनेते , लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक ,महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष व सहकार महर्षी मा.काकासाहेब कोयटे यांच्या शुभहस्ते लिंगायत समाजासाठी कार्य करणारे तसेच विविध पदांवर नियुक्त झालेल्या समाजातील मान्यवरांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

यामध्ये मनमाड लिंगायत समाजाच्या अध्यक्ष पदी व साप्ताहिक 'पोलीस तपास ' च्या महाराष्ट्र चिफ प्रमुख पदी नियुक्त झालेल्या श्री.गणेश देशमुख तसेच ,महाराष्ट्र चिफ महिला प्रतिनिधी सौ.आरती गणेश देशमुख तसेच श्री.सुनील तात्या कबाडे यांचा  दि चांदवड मर्चंट को-ऑप  बँकेच्या निवडणुकीत सर्वात जास्त मताधिक्य घेवून संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच श्री.चंद्रशेखर दंदने यांची नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन वर सहसचिव म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच श्री.अनिल चौगुले यांची  लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून निवड झाल्याबद्दल स्मृतिचिन्ह, शाल,श्रीफळ ,बुके व प्रशस्तीपत्र देवून  विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजातील सर्व  कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.

Tuesday, May 24, 2022

दत्तवाड येथील प.पु.श्रीअदु्श्यशिवयोगी महाराज यांची भक्तिमय वातावरणात अंत्यसंस्कार


दत्तवाड येथील प.पु.श्रीअदु्श्यशिवयोगी महाराज यांची भक्तिमय वातावरणात अंत्यसंस्कार
कोल्हापूर दि 24 :-  रमेशकुमार मिठारे
महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानात, शिरोळ तालुक्यातील दत्तवाड ग्रामात, श्रोत्रीय ब्रम्हनिंष्ठ श्री सद्गुरु बाबा महाराज मठाचे ब्रम्हश्री बसगोंडा पाटील महाराज यांचे चतुर्थ सुपुत्र अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री सद्गुरू बाबा महाराज यांचे उत्तराधिकारी जीवन शिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट दत्तवाड संचलित,अभिनव बालविकास मंदिर व परिवर्तन प्राथमिक शाळा दत्तवाड संस्थापक अध्यक्ष प.पु.श्री.अदृश्य शिवयोगी बाबामहाराज यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी देहावसान झाले.त्यांच्या पाश्चात पत्नी, तिन मुली,एक मुलगा,दोन भाऊ व बहीणी असा मोठा परिवार आहे.
       प.पु.अदुश्य शिवयोगी महाराज यांच्या आकस्मिक निधनाने दत्तवाड ग्रामात व परिसराच्या महाराष्ट्र व कर्नाटक भक्तजनांना त्यांच्या देहावसानाचे वार्ता समजताच प्रचंड  भाविक भक्त जनांच्या समुदयात महाराजांचे अंत्ययात्रा संपूर्ण दत्तवाड गावांतून काढण्यात आली.यावेळी प.पु.श्री‌.काडसिद्धेश्वर महास्वामीजी कणेरी मठ,प.पु.श्री. निजगुनानंद महास्वामीजी,प.पु.श्री.भालाक्क्षदेव स्वामी, वर्तमानसिमी मठाधिश,काद्रोळी, व शिरोळ दत्तकारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि अंत्ययात्रा काढण्यात आली.या अंत्ययात्रे प्रसंगी "श्रीगुरुबाबा", "सद्गुरू बाबा" अशा नामघोषाचे गजर करत ही अंत्ययात्रा मठापासून ते गावातील जुने मुख्य निवासस्थानच्या मार्गाने बाबामहाराज मठापर्यत हि मिरवणूक काढण्यात आली. ही अंत्ययात्रा मिरवणूक मठास्थळी पोहोचल्यानंतर प्रचंड भावीक भक्त जनांच्या उपस्थितीत कर्नाटकातील व महाराष्ट्रातील संतमंडळानी सुश्राव्य भजनाच्या व टाळमुर्दंगाच्या गजरात प.प.अदु्श्य शिवयोगी महाराजांना भक्तीमय वातावरणात,धुप व चंदनाच्या आणि पुष्पवृष्टीच्या उधळणीत या महाराजांना समाधीस्त करण्यात आली.यावेळी समस्त दत्तवाड ग्रामस्थ व पाटील (गळतगे) परिवार आणि भक्तजण बहुसंख्येने उपस्थित होते.

लिंगायत समाजातील जेष्ठ पत्रकारदत्तात्रय जंगम यांचे निधन


लिंगायत समाजातील जेष्ठ पत्रकार
दत्तात्रय जंगम यांचे निधन
 कराड दि. 24 : दिलीप महाजन प्रतिनिधी 
ओगलेवाडी, ता. कराड येथील ज्येष्ठ पत्रकार व सदाशिवगड
मराठी पत्रकार संघाचे सदस्य दत्तात्रय राजाराम जंगम (वय 72) यांचे अल्पशा
आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांनी विविध  दैनिकांमध्ये वार्ताहार
म्हणून काम केले होते. तसेच त्यांनी विविध विषयावर लेख व कविता लिहिल्या
होत्या. त्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले होते.
त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा माती सावडण्याचा विधी
दि. 25 मे रोजी ओगलेवाडी येथील स्मशानभूमीत 8.30 वाजता होणार आहे.

लिंगायत संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याचे आदर्श महासचिव सुधीर आप्पा भुसारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अभिष्टचिंतन


लिंगायत संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याचे आदर्श महासचिव सुधीर आप्पा भुसारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
 अभिष्टचिंतन 
सातारा, दि.24 - प्रा अजय शेटे प्रतिनिधी
 लिंगायत संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याचे आदर्श महासचिव व आपल्या लेखणी व वाणीने समाजातील प्रत्येक समाज समाजबांधवांच्या मनात स्थान निर्माण केलेले ,त्याच बरोबर  जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अनेक कन्नड वचनांचा मराठी भावार्थ दररोज प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पोहोचविणारे बसव साहित्याचे अभ्यासक व आमचे सहकारी श्री.सुधीर आप्पा भुसारी यांना मा.प्रदिप साखरे,लिंगायत संघर्ष समिती,महाराष्ट्र व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन यांचे तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांचे वतीनेही त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,हार्दिक शुभेच्छा.

धर्माबरोबर शिक्षणाचा प्रचार आवश्यक : डॉ. चंद्रशेखर शिवाचार्यविश्वाराध्य विदयार्थी निलय स्नेहमेळावा संपन्न


धर्माबरोबर शिक्षणाचा प्रचार आवश्यक : डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य
विश्वाराध्य विदयार्थी निलय स्नेहमेळावा संपन्न
पुणे दि  24 : प्रतिनिधी
 धर्माबरोबरच शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार गरजेचा आहे. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. आज देशात धर्मावरून राजकारण सुरु आहे हे कुठेतरी थांबायला हवे. यापेक्षाहि महत्वाचे म्हणजे समाजाचा कसा विकास होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. 
           पुणे येथील श्री जगद्गुरु विश्वाराध्य विदयार्थी निलय अमृतमहोत्सवानिमित्त आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, नागपूरचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, विश्वेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन अनिल गाडवे, ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी, मंद्रुपचे रेणूक शिवाचार्य, काशी जंगमवाडी मठाचे प्रबंधक नलिनी चिरमे, सचिन चिरमे, पुणे येथील जंगमवाडी मठाचे व्यवस्थापक सुधाकर हलगणे, भरत उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
          यावेळी आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रख्यात गणिततज्ञ प्रा. डॉ. बसवराज मुडगी म्हणाले की, डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी धर्माच्या प्रचारासोबत सामाजिक काम करत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात निवाऱ्याची व्यवस्था केली. त्यामुळे अनेक गरीब, गरजू आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. त्यांनी मराठवाड्यातील दुर्लक्षित ग्रंथाचे प्रकाशन केले.
         नागपूरचे पोलिस उपयुक्त गजानन राजमाने म्हणाले, निलयमध्ये राहिल्यामुळे माझ्यावर चांगले संस्कार झाले आणि चांगली शिस्त लागली. यामुळे सरकारी नोकरी करत असताना २१ नक्षलवादिंना अटक केले, ५ नक्षलवादीना शरण केले. ज्या गावात निवडणूक होत नव्हती तिथे निवडणूक घेतली. नागपूरची संघटित गुन्हेगारी संपवून टाकली. सरकारी नोकरी करताना कधीही भाष्टाचार केला नाही.
         यावेळी श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य म्हणाले, दान हा खूप मोठा गुण आहे व्यक्तिलाही मोठा बनवतो. आपण विविध दान पाहिले आहेत. यात अन्नदान, विद्यादान, आर्थिक दान, कन्यादान आहेत परंतु विद्यादान हे आजीवन आनंद देत राहतो. आपण काम करत असताना सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. कारण आपण समृध्द झालो आहोत तर इतरांचाही विचार आपण करायला हवा तरच देश प्रगतीपथावर जाईल.
        कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रेयस उंबरकर यांनी केले आणि आकाश स्वामी यांनी आभार व्यक्त केले.


Monday, May 23, 2022

सोलापूर मध्ये लवकरच मेडिकल कॉलेज उभारणार - डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी जी



सोलापूर मध्ये लवकरच मेडिकल कॉलेज उभारणार - डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी जी 
सातारा, दि.24 -प्रतिनिधी  प्रा.अजय शेटे
काशी पिठाचे विद्यमान जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी मठ,मंदिरे उभी करण्यापलीकडे समाजहिताचे ही काम केले आहे.धर्म कार्याबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपले मोठे योगदान दिले आहे.सध्या याचाच फायदा समाजातील गरजूंना मोठ्या प्रमाणावर होत आहे.
भविष्यात शिक्षणातील बाजारीकरण संपवून वैद्यकीय शिक्षणावर भर देण्यात येणार आहे.त्यामुळे भविष्यात काशी पिठातून डॉक्टर घडणार असल्याचे विधान श्री क्षेत्र काशी पिठाचे नूतन जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी नुकतेच केले आहे.
श्री क्षेत्र होटगी मठाची जबाबदारी माझ्यावर असल्याने सोलापूर येथेही लवकरच मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार असून, त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे.असेही ते म्हणाले .सोलापूर येथील पट्टाभिषेक कार्यक्रम झाल्यानंतर ते  सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते .
ते म्हणाले विद्यमान जगद्गगुरूंनी शिक्षणासाठी पुण्यासह इतर महत्त्वाच्या शहरात गरीब विद्यार्थ्यांना किफायतशीर आणि मोफत निवास आणि भोजन व्यवस्था करण्याचे मोठे काम केले आहे.याचा फायदा आज अनेकांना होत आहे.श्री क्षेत्र होटगी मठाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था चालवल्या जात आहेत.त्यामुळे आता त्याच माध्यमातून वैद्यकीय शिक्षण सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.लवकरच हे कार्य पूर्णत्वास जाईल.
हे सर्व नियोजन सुरू असतानाच श्री क्षेत्र काशी पिठाची मोठी जबाबदारी आपणावर आली .आज श्रीशै्ल पिठा अंतर्गत असलेले होटगी मठ आणि काशी पिठाचे जगद्गुरु म्हणून समाजातील गरीब,वंचित व गरजू घटकांना वैद्यकीय शिक्षण मिळावे .यासाठी आपण आता काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात असणारा ऐतिहासिक वारसा मात्र लोकनेत्या कडून दुर्लक्षित आनी विकासापासून वंचित झाकले माणिक - श्री क्षेत्र पाटेश्र्वर विशेष लेख




जिल्ह्यात असणारा ऐतिहासिक वारसा मात्र लोकनेत्या कडून दुर्लक्षित आनी विकासापासून वंचित 
 झाकले माणिक - श्री क्षेत्र पाटेश्र्वर
विशेष लेख - रवी वाकडे






जिल्ह्यात असणारा ऐतिहासिक वारसा मात्र लोकनेत्या कडून दुर्लक्षित आनी विकासापासून वंचित 
 झाकले माणिक - श्री क्षेत्र पाटेश्र्वर
विशेष लेख - रवी वाकडे
सातारा, दि.23 - 
जिल्ह्यात असणारा ऐतिहासिक वारसा मात्र लोकनेत्या कडून दुर्लक्षित आनी विकासापासून वंचित 
 झाकले माणिक - श्री क्षेत्र पाटेश्र्वर
 श्री क्षेत्र पाटेश्वर  ला जाण्यासाठी आपणास सातारा पासून देगाव व तिथून पुढे सात  कि.मी.पर्यंत गाडीने पुढे जावे लागते.तसेच पुढे दिड कि.मी.पायी चालल्या नंतर श्री क्षेत्र पाटेश्र्वर ला आपण पोहोचतो.तसेच दुसऱ्या मार्गाने म्हणजे कराड हून अजिंक्यतारा सूत गिरणी व एहसास मतिमंद शाळेच्या मधून बी व्हीं जी फूड मार्गे हायवे पासून ही आठ किमी. अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र 
पाटेश्वर ला दर्शनासाठी जाता येते.
श्री क्षेत्र पाटेश्वर चे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले भगवान श्री शिवशंकराचे प्रतिक असलेले श्री शिवलिंगाचे दर्शन हे होय.येथील लेण्यांमध्ये व मंदिरात विविध आकारात व प्रकारात कोरलेल्या श्री शिवपिंडी होत.मानवी हाताच्या बोटांच्या पेरा एव्हढ्या लहान आकारापासून ते अंदाजे चार फूट उंचीच्या श्री शिवपिंडी येथे पहायला मिळतात.आणि अशीच विविधता त्यांच्या कोरीव कामात ही पहायला मिळते.

श्री पाटेश्वर ची ही लेणी ही हिंदू लेण्यांच्या प्रकारातील असून ती कोणी खोदली असावीत याची माहिती उपलब्ध होऊ शकत नाही.मात्र श्री पाटेश्वराचे मंदिर ई. स.अठराव्या शतकात सरदार 
अनगळ यांनी बांधल्याचे ज्ञात आहे.
श्री पाटेश्वर चा डोंगर चढताना आपणास रस्त्यात दगडात कोरलेली श्री गणपतीची एक प्राचीन स्त्री वेशधारी मूर्ती दिसते.( हिच कदाचित श्री गणेश लक्ष्मी अथवा श्री गजलक्ष्मी असावी.कारण उत्तरप्रदेश राज्यात आग्रा संस्थान मध्ये श्री गणेश लक्ष्मी अथवा श्री गजलक्ष्मी चे पूजन मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याचे आढळते .) पुढे डोंगरावर सुरुवातीला कमळ फुलांनी भरलेली 'श्री विश्वेश्वर पुष्करणी ' आहे.या पुष्करणीच्या एका भिंतीवर श्री शंकराची अतिशय दुर्मिळ अशी ' अज एकपाद ' मूर्ती कोरलेली आहे.या शिल्पातील मूर्तीला फक्त एकच पाय कोरलेला आहे.
या पुष्करणी जवळूनच पहिल्या लेण्याकडे जाण्याचा मार्ग आहे.या लेण्याला 'मरगळ म्हशीचे लेणे ' असे म्हणतात.असे जरी असले तरी या लेणी मध्ये जे शिल्प आहे.त्याला ' श्री नंदिकेश्वर ' असे नाव आहे.कारण तिथे नंदीचे म्हणजेच ' वृषभाचे वशिंड ' याला श्री शिवलिंगाचे रूप दिले आहे.या बरोबरच लेण्यात एकूण सहा शिवलिंगे ओळीने कोरलेली आहेत.त्यातील एक शिवलिंग हे दंडगोलाकार उंचवट्यासारखे कोरीव आहे.याच गुहेतील एका शिल्पपटात पाच शिवलिंगे कोरलेली आहेत.ती पृथ्वी,आप,तेज,वायू आणि आकाश या पंचमहाभुतांचे प्रतिनिधित्व करतात.अशी एक समजूत आहे 
या पुष्करणी जवळूनच दगडी पायऱ्यांचा एक मार्ग श्री पाटेश्वर मंदिराकडे जातो.या मार्गावर आणखी दोन शिवलिंगे आहेत.या तील एका पिंडीवर बरोबर मध्यभागी एक शिवलिंग व त्याच्या बाजूने आणखी सहा शिवलिंगे कोरलेली आहेत.तर दुसऱ्या शिवलिंगावर दाढीमिशा असलेला श्री शंकर कोरलेला आहे आणि त्याच्या बाजूने एक्का हत्तर इतर  दंड गोलाकार शिवलिंगे कोरलेली आहेत.
श्री पाटेश्र्वराचे हे मंदिर म्हणजे प्राचीन स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ठ नमुना आहे.या मंदिरातील दगडात कोरलेला नंदी व चार फूट उंचीचे श्री शिवलिंग यांची प्रमाणबद्धता व त्यावरील तकाकी , चकाकी व लकाकी  पाहण्यासारखी आहे.
       या श्री पाटेश्र्वराच्या मंदिरा नंतर पुढे पाच लेण्यांचा गट असलेले ' श्री बळीभद्र मंदिर ' लेणे आहे .यात एका ठिकाणी श्री शिवपिंडीच्या बाजूने चक्र,बदाम,गोल अशा प्रकारच्या दहा आकृत्या वेगवेगळ्या आकारात कोरलेल्या आहेत.त्यातील आठ आकृत्या ह्या आठ दिशा व उरलेल्या दोन आकृत्या म्हणजे श्री सूर्य व श्री चंद्र यांची प्रतीके आहेत.शिवाय या लेण्यात  श्री दशावतार, श्री अष्ठमातृका,श्री माहेश्वरी,श्री नवग्रह,श्री शेषधारी विष्णू ,श्री महिषासुरमर्दिनी,श्री कार्तिकेय,श्री चामुंडा इत्यादी शिल्पेही पहायला मिळतात.
याच लेण्यात एक मानव व बैल यांची एकत्रित अशी ' श्री अग्नी- वृष ' ची अप्रतिम मूर्ती आहे.या मूर्तीला सात हात असून या हातात आयुधे व मुद्रा धारण केलेल्या आहेत.समोरून पाहिल्यास ही मूर्ती दाढीधारी माणसाची असल्यासारखी दिसते तर एका बाजूने पाहिल्यास चेहऱ्यात श्री नंदी ( बैल ) दिसतो हा दुहेरी आभास साधण्यासाठी शिल्पाच्या दाढी मध्ये दोन खोल खाचा कोरलेल्या आहेत.त्या नेमक्या बैलाच्या नाकपुडी सारख्या दिसतात.या ' अग्नी - वृष् ' मूर्तीचे सौंदर्य ,प्रमाणबद्धता व शिल्पकाराची कल्पकता मोठी अद्भुत अशी आहे .
'श्री बळीभद्र ' लेण्यानंतर वर ' हाडघर ' हा तीन लेण्यांचा समूह आहे.त्यातील मुख्य लेण्यातील पूर्वेच्या भिंतीवरील शिल्पपटात श्री पार्वतीची मूर्ती व बाजूला एकूण नऊशे बहात्तर श्री शिवलिंगे कोरलेली आहेत. ही नऊशे बहात्तर ही संख्या श्री देवीची एकशे आठ शक्तीपीठे व या प्रत्येक पिठाची एकूण नऊ वेळा पूजा करण्याचा संकेत दर्शवितात. दक्षिणेकडील भिंतीवरील शिल्पपटात श्री विष्णूची मूर्ती व त्याच्याच बाजूला एक हजार श्री शिवलिंगे कोरलेली आहेत. हि एक हजार संख्या श्री विष्णूच्या  एक हजार नावांचे प्रतीक आहे.याच दक्षिणेकडील भिंतीवरील शिल्प पटात श्री सूर्य देवाची मूर्ती व त्याच्या बाजूला पुन्हा एक हजार  श्री शिवलिंगे कोरलेली आहेत.
या शिवाय या लेण्यात श्री भालचंद्र शिवाची व श्री ब्रम्ह देवाची मूर्ती कोरलेली आहे.याच लेण्यांमध्ये एका ठिकाणी श्री शंकराच्या पिंडी ऐवजी दोन इतर कुंभ कोरलेले आहेत.याच बरोबर श्री एकमुखी,श्री चतुर्मुखी,श्री सहस्त्रमुखी अशा अनेक प्रकारातील श्री शिवलिंगे कोरलेली आहेत.
या शिवाय या लेण्यात 'श्री कुंडली न' शिल्प व देवनागरी लिपीतील संस्कृत / प्राकृत शिलालेख आहेत.परंतु पुसट झाल्यामुळे ते नीट वाचता येत नाहीत .
प्राचीन भारतात अनेक हिंदू मंदिरे व शक्तिस्थळांचे रूपांतर परकीय मोगली व ब्रिटिश आक्रमकांनी त्यांच्या प्रार्थना स्थळात करून टाकले.त्याचे दुष्परिणाम आपण आजही सोसत आहोत. व त्या आपल्या शक्तिस्थळाना कायदेशीररित्या माघारी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे .श्री शिवलिंगाच्या समोरचा श्री नंदी श्र्वर हा ध्यान,आसन,एकाग्रता , संयम व शक्तीचे प्रतीक आहे.हे लक्षात घेवून आपण सर्व जणांनी
श्री पाटेश्वर हे लिंगायत धर्म व वीरशैव लिंगायत समाज व समस्त भारतीयांचे आराध्य दैवत आहे.तसेच ते निसर्गरम्य पण दूर  दुर्लभ अशा निर्मनुष्य स्थानी आहे .आपल्या समस्त समाज बांधवांनी सलग सदर देवस्थानच्या सानिध्यात जाऊन त्याची पूजा अर्चा , देखभाल दुरुस्ती व विकास यावर कायम देखरेख ठेवणे अत्यावश्यक बनले आहे.तर इथून पुढे काळाच्या ओघात या शक्ती स्थळाचे योग्य प्रकारे रक्षण होऊन त्याचे  दर्शन सर्व भाविक भक्तांना घेता येईल व श्री पाटेश्वराच्या कृपाशीर्वादाचा लाभ करून घेता येईल.याची सर्वांनी जाणीव जागृती करून घेणे काळाच्या ओघात अत्यंत अत्यावश्यक बनले आहे .जय पाटेश्वर .ओम नमः शिवाय !

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...