जिल्ह्यात असणारा ऐतिहासिक वारसा मात्र लोकनेत्या कडून दुर्लक्षित आनी विकासापासून वंचित
झाकले माणिक - श्री क्षेत्र पाटेश्र्वर
विशेष लेख - रवी वाकडे
जिल्ह्यात असणारा ऐतिहासिक वारसा मात्र लोकनेत्या कडून दुर्लक्षित आनी विकासापासून वंचित
झाकले माणिक - श्री क्षेत्र पाटेश्र्वर
विशेष लेख - रवी वाकडे
सातारा, दि.23 -
जिल्ह्यात असणारा ऐतिहासिक वारसा मात्र लोकनेत्या कडून दुर्लक्षित आनी विकासापासून वंचित
झाकले माणिक - श्री क्षेत्र पाटेश्र्वर
श्री क्षेत्र पाटेश्वर ला जाण्यासाठी आपणास सातारा पासून देगाव व तिथून पुढे सात कि.मी.पर्यंत गाडीने पुढे जावे लागते.तसेच पुढे दिड कि.मी.पायी चालल्या नंतर श्री क्षेत्र पाटेश्र्वर ला आपण पोहोचतो.तसेच दुसऱ्या मार्गाने म्हणजे कराड हून अजिंक्यतारा सूत गिरणी व एहसास मतिमंद शाळेच्या मधून बी व्हीं जी फूड मार्गे हायवे पासून ही आठ किमी. अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र
पाटेश्वर ला दर्शनासाठी जाता येते.
श्री क्षेत्र पाटेश्वर चे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले भगवान श्री शिवशंकराचे प्रतिक असलेले श्री शिवलिंगाचे दर्शन हे होय.येथील लेण्यांमध्ये व मंदिरात विविध आकारात व प्रकारात कोरलेल्या श्री शिवपिंडी होत.मानवी हाताच्या बोटांच्या पेरा एव्हढ्या लहान आकारापासून ते अंदाजे चार फूट उंचीच्या श्री शिवपिंडी येथे पहायला मिळतात.आणि अशीच विविधता त्यांच्या कोरीव कामात ही पहायला मिळते.
श्री पाटेश्वर ची ही लेणी ही हिंदू लेण्यांच्या प्रकारातील असून ती कोणी खोदली असावीत याची माहिती उपलब्ध होऊ शकत नाही.मात्र श्री पाटेश्वराचे मंदिर ई. स.अठराव्या शतकात सरदार
अनगळ यांनी बांधल्याचे ज्ञात आहे.
श्री पाटेश्वर चा डोंगर चढताना आपणास रस्त्यात दगडात कोरलेली श्री गणपतीची एक प्राचीन स्त्री वेशधारी मूर्ती दिसते.( हिच कदाचित श्री गणेश लक्ष्मी अथवा श्री गजलक्ष्मी असावी.कारण उत्तरप्रदेश राज्यात आग्रा संस्थान मध्ये श्री गणेश लक्ष्मी अथवा श्री गजलक्ष्मी चे पूजन मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याचे आढळते .) पुढे डोंगरावर सुरुवातीला कमळ फुलांनी भरलेली 'श्री विश्वेश्वर पुष्करणी ' आहे.या पुष्करणीच्या एका भिंतीवर श्री शंकराची अतिशय दुर्मिळ अशी ' अज एकपाद ' मूर्ती कोरलेली आहे.या शिल्पातील मूर्तीला फक्त एकच पाय कोरलेला आहे.
या पुष्करणी जवळूनच पहिल्या लेण्याकडे जाण्याचा मार्ग आहे.या लेण्याला 'मरगळ म्हशीचे लेणे ' असे म्हणतात.असे जरी असले तरी या लेणी मध्ये जे शिल्प आहे.त्याला ' श्री नंदिकेश्वर ' असे नाव आहे.कारण तिथे नंदीचे म्हणजेच ' वृषभाचे वशिंड ' याला श्री शिवलिंगाचे रूप दिले आहे.या बरोबरच लेण्यात एकूण सहा शिवलिंगे ओळीने कोरलेली आहेत.त्यातील एक शिवलिंग हे दंडगोलाकार उंचवट्यासारखे कोरीव आहे.याच गुहेतील एका शिल्पपटात पाच शिवलिंगे कोरलेली आहेत.ती पृथ्वी,आप,तेज,वायू आणि आकाश या पंचमहाभुतांचे प्रतिनिधित्व करतात.अशी एक समजूत आहे
या पुष्करणी जवळूनच दगडी पायऱ्यांचा एक मार्ग श्री पाटेश्वर मंदिराकडे जातो.या मार्गावर आणखी दोन शिवलिंगे आहेत.या तील एका पिंडीवर बरोबर मध्यभागी एक शिवलिंग व त्याच्या बाजूने आणखी सहा शिवलिंगे कोरलेली आहेत.तर दुसऱ्या शिवलिंगावर दाढीमिशा असलेला श्री शंकर कोरलेला आहे आणि त्याच्या बाजूने एक्का हत्तर इतर दंड गोलाकार शिवलिंगे कोरलेली आहेत.
श्री पाटेश्र्वराचे हे मंदिर म्हणजे प्राचीन स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ठ नमुना आहे.या मंदिरातील दगडात कोरलेला नंदी व चार फूट उंचीचे श्री शिवलिंग यांची प्रमाणबद्धता व त्यावरील तकाकी , चकाकी व लकाकी पाहण्यासारखी आहे.
या श्री पाटेश्र्वराच्या मंदिरा नंतर पुढे पाच लेण्यांचा गट असलेले ' श्री बळीभद्र मंदिर ' लेणे आहे .यात एका ठिकाणी श्री शिवपिंडीच्या बाजूने चक्र,बदाम,गोल अशा प्रकारच्या दहा आकृत्या वेगवेगळ्या आकारात कोरलेल्या आहेत.त्यातील आठ आकृत्या ह्या आठ दिशा व उरलेल्या दोन आकृत्या म्हणजे श्री सूर्य व श्री चंद्र यांची प्रतीके आहेत.शिवाय या लेण्यात श्री दशावतार, श्री अष्ठमातृका,श्री माहेश्वरी,श्री नवग्रह,श्री शेषधारी विष्णू ,श्री महिषासुरमर्दिनी,श्री कार्तिकेय,श्री चामुंडा इत्यादी शिल्पेही पहायला मिळतात.
याच लेण्यात एक मानव व बैल यांची एकत्रित अशी ' श्री अग्नी- वृष ' ची अप्रतिम मूर्ती आहे.या मूर्तीला सात हात असून या हातात आयुधे व मुद्रा धारण केलेल्या आहेत.समोरून पाहिल्यास ही मूर्ती दाढीधारी माणसाची असल्यासारखी दिसते तर एका बाजूने पाहिल्यास चेहऱ्यात श्री नंदी ( बैल ) दिसतो हा दुहेरी आभास साधण्यासाठी शिल्पाच्या दाढी मध्ये दोन खोल खाचा कोरलेल्या आहेत.त्या नेमक्या बैलाच्या नाकपुडी सारख्या दिसतात.या ' अग्नी - वृष् ' मूर्तीचे सौंदर्य ,प्रमाणबद्धता व शिल्पकाराची कल्पकता मोठी अद्भुत अशी आहे .
'श्री बळीभद्र ' लेण्यानंतर वर ' हाडघर ' हा तीन लेण्यांचा समूह आहे.त्यातील मुख्य लेण्यातील पूर्वेच्या भिंतीवरील शिल्पपटात श्री पार्वतीची मूर्ती व बाजूला एकूण नऊशे बहात्तर श्री शिवलिंगे कोरलेली आहेत. ही नऊशे बहात्तर ही संख्या श्री देवीची एकशे आठ शक्तीपीठे व या प्रत्येक पिठाची एकूण नऊ वेळा पूजा करण्याचा संकेत दर्शवितात. दक्षिणेकडील भिंतीवरील शिल्पपटात श्री विष्णूची मूर्ती व त्याच्याच बाजूला एक हजार श्री शिवलिंगे कोरलेली आहेत. हि एक हजार संख्या श्री विष्णूच्या एक हजार नावांचे प्रतीक आहे.याच दक्षिणेकडील भिंतीवरील शिल्प पटात श्री सूर्य देवाची मूर्ती व त्याच्या बाजूला पुन्हा एक हजार श्री शिवलिंगे कोरलेली आहेत.
या शिवाय या लेण्यात श्री भालचंद्र शिवाची व श्री ब्रम्ह देवाची मूर्ती कोरलेली आहे.याच लेण्यांमध्ये एका ठिकाणी श्री शंकराच्या पिंडी ऐवजी दोन इतर कुंभ कोरलेले आहेत.याच बरोबर श्री एकमुखी,श्री चतुर्मुखी,श्री सहस्त्रमुखी अशा अनेक प्रकारातील श्री शिवलिंगे कोरलेली आहेत.
या शिवाय या लेण्यात 'श्री कुंडली न' शिल्प व देवनागरी लिपीतील संस्कृत / प्राकृत शिलालेख आहेत.परंतु पुसट झाल्यामुळे ते नीट वाचता येत नाहीत .
प्राचीन भारतात अनेक हिंदू मंदिरे व शक्तिस्थळांचे रूपांतर परकीय मोगली व ब्रिटिश आक्रमकांनी त्यांच्या प्रार्थना स्थळात करून टाकले.त्याचे दुष्परिणाम आपण आजही सोसत आहोत. व त्या आपल्या शक्तिस्थळाना कायदेशीररित्या माघारी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे .श्री शिवलिंगाच्या समोरचा श्री नंदी श्र्वर हा ध्यान,आसन,एकाग्रता , संयम व शक्तीचे प्रतीक आहे.हे लक्षात घेवून आपण सर्व जणांनी
श्री पाटेश्वर हे लिंगायत धर्म व वीरशैव लिंगायत समाज व समस्त भारतीयांचे आराध्य दैवत आहे.तसेच ते निसर्गरम्य पण दूर दुर्लभ अशा निर्मनुष्य स्थानी आहे .आपल्या समस्त समाज बांधवांनी सलग सदर देवस्थानच्या सानिध्यात जाऊन त्याची पूजा अर्चा , देखभाल दुरुस्ती व विकास यावर कायम देखरेख ठेवणे अत्यावश्यक बनले आहे.तर इथून पुढे काळाच्या ओघात या शक्ती स्थळाचे योग्य प्रकारे रक्षण होऊन त्याचे दर्शन सर्व भाविक भक्तांना घेता येईल व श्री पाटेश्वराच्या कृपाशीर्वादाचा लाभ करून घेता येईल.याची सर्वांनी जाणीव जागृती करून घेणे काळाच्या ओघात अत्यंत अत्यावश्यक बनले आहे .जय पाटेश्वर .ओम नमः शिवाय !
No comments:
Post a Comment