सोलापूर मध्ये लवकरच मेडिकल कॉलेज उभारणार - डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी जी
सातारा, दि.24 -प्रतिनिधी प्रा.अजय शेटे
काशी पिठाचे विद्यमान जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी मठ,मंदिरे उभी करण्यापलीकडे समाजहिताचे ही काम केले आहे.धर्म कार्याबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपले मोठे योगदान दिले आहे.सध्या याचाच फायदा समाजातील गरजूंना मोठ्या प्रमाणावर होत आहे.
भविष्यात शिक्षणातील बाजारीकरण संपवून वैद्यकीय शिक्षणावर भर देण्यात येणार आहे.त्यामुळे भविष्यात काशी पिठातून डॉक्टर घडणार असल्याचे विधान श्री क्षेत्र काशी पिठाचे नूतन जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी नुकतेच केले आहे.
श्री क्षेत्र होटगी मठाची जबाबदारी माझ्यावर असल्याने सोलापूर येथेही लवकरच मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार असून, त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे.असेही ते म्हणाले .सोलापूर येथील पट्टाभिषेक कार्यक्रम झाल्यानंतर ते सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते .
ते म्हणाले विद्यमान जगद्गगुरूंनी शिक्षणासाठी पुण्यासह इतर महत्त्वाच्या शहरात गरीब विद्यार्थ्यांना किफायतशीर आणि मोफत निवास आणि भोजन व्यवस्था करण्याचे मोठे काम केले आहे.याचा फायदा आज अनेकांना होत आहे.श्री क्षेत्र होटगी मठाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था चालवल्या जात आहेत.त्यामुळे आता त्याच माध्यमातून वैद्यकीय शिक्षण सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.लवकरच हे कार्य पूर्णत्वास जाईल.
हे सर्व नियोजन सुरू असतानाच श्री क्षेत्र काशी पिठाची मोठी जबाबदारी आपणावर आली .आज श्रीशै्ल पिठा अंतर्गत असलेले होटगी मठ आणि काशी पिठाचे जगद्गुरु म्हणून समाजातील गरीब,वंचित व गरजू घटकांना वैद्यकीय शिक्षण मिळावे .यासाठी आपण आता काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment