भारतातील नंबर एकचे लिंगायत उद्योजक मा.बाबासाहेब कल्याणी .
Sunday, January 8, 2023
भारतातील नंबर एकचे लिंगायत उद्योजक मा.बाबासाहेब कल्याणी .
Friday, January 6, 2023
डिजिटल मिडिया ऑर्गनायझेशनऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी रविंद्र वाकडेजिल्हा अध्यक्ष पदी प्रा .अजय शेटे यांची निवड , नवीन कार्यकारीणी जाहीर .
डिजिटल मिडिया ऑर्गनायझेशनऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी रविंद्र वाकडेजिल्हा अध्यक्ष पदी प्रा .अजय शेटे यांची निवड , नवीन कार्यकारीणी जाहीर .
डिजिटल मिडिया ऑर्गनायझेशनऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी रविंद्र वाकडे,जिल्हा अध्यक्ष पदी प्रा .अजय शेटे यांची निवड , नवीन कार्यकारीणी जाहीर .

कराड , दिं.6 - दिलीप महाजन कराड प्रतिनिधी
डिजिटल मिडियाऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्रच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी प्रा. अजय शेटे, जिल्हा उपाध्यक्ष पदी दिलीप महाजन आणी कुलदिप मोहिते यांची निवड करण्यात आली ,
मधूबन ऍग्री टुरिझम ,नाडे नवारस्ता येथे काल आयोजित करण्यात आलेल्या मिटिंग मध्ये या निवडी करण्यात आल्या , या वेळी सांगली जिल्ह्या अध्यक्ष पदी ॲडव्हान्स न्यूज चे संपादक, ॲड. अंश खलीपे आणि महिला अध्यक्ष पदी ॲड शीतल बेद्रे सांगली यांची निवड करण्यात आली . कडेगाव तालुका अध्यक्ष पदी कुलजीत महाजन यांची निवड झाली, तर डिजिटल मि डिया ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्र च्या अध्यक्ष पदी रविंद्र वाकडे यांची निवड केली, आहे तसेच कराड तालुका पदी दैनिक सांजवात चे प्रल्हाद गुजले यांची निवड पाटण तालुका पदी आपला सातारा न्यूज चे विक्रम पवार यांची निवड खटाव तालूका पदी सचिन पवार यांची निवड करण्यात आली आहे,
या वेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष प्रा. अजय शेटे म्हणाले सद्या सर्वत्र डिजिटल मिडिया चे काम मोठ्या प्रमाणात चालत आहे .मात्र त्यांच्या समस्या आणि अडचणी साठी कोणी ही पुढाकार घेत नाही , तेव्हा आम्ही या संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडिया मध्ये काम करत असणाऱ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींच्या हक्कासाठी लढणार आहोत. महाराष्ट्रात सर्वत्र या संघटनेच्या माध्यमातून काम चालू करण्यात येणार असून ,लवकरच प्रत्येक जिल्ह्यात उर्वरित पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे तरी इच्छुकांनी आम्हाला संपर्क करावा असे आवाहन या वेळी करण्यात आले
Wednesday, January 4, 2023
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा,16000 पतसंस्थांची शिखर संघटना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या अध्यक्षपदी लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा,16000 पतसंस्थांची शिखर संघटना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या अध्यक्षपदी लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा,16000 पतसंस्थांची शिखर संघटना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या अध्यक्षपदी लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड.
सातारा, दि.5 -रविंद्र वाकडे.
लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे समन्वयक, वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे अध्यक्ष, लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे यांची सहकार क्षेत्रातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाने सहकार क्षेत्रात आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा 16000 पतसंस्था, एकुण 1.5 लाख कोटी रुपयांच्या ठेवी,2 लाख कर्मचारी अशा पतसंस्थांची शिखर संघटना
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.संपू र्ण लिंगायतांचा अभिमान असणाऱ्या लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे यांचे याबद्दल भारतातील सर्वच सहकार क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या निवडीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आपल्या या यशाबद्दल पुन्हा एकदा वीरशैव लिंगायत समाज संघटना,लिंगायत संघर्ष समिती ,लिंगायत व बसव विचार टिव्ही यांचेमार्फत हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. तसेच याचा आम्हाला खरोखर मान व अभिमान वाटत आहे.असे प्रकटन
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे समनव्यक मा. प्रदीपजी साखरे यांनी जाहीर प्रसिद्ध केले आहे.**
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान , श्री . तीर्थक्षेत्र पालीचा खंडोबा ,गुरुवार दि ५ रोजी पाली यात्रा या निमित्ताने विशेष लेख .
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान , श्री . तीर्थक्षेत्र पालीचा खंडोबा ,गुरुवार दि ५ रोजी पाली यात्रा या निमित्ताने विशेष लेख .
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री . तीर्थक्षेत्र पालीचा खंडोबा ,गुरुवार दि ५ रोजी पाली यात्रा या निमित्ताने विशेष लेख .
Tuesday, January 3, 2023
कर्नाटकातील सिद्धेश्वर स्वामी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्याबाबतची काही आठवणी.
कर्नाटकातील सिद्धेश्वर स्वामी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्याबाबतची काही आठवणी.
कर्नाटकातील सिद्धेश्वर स्वामी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्याबाबतची काही आठवणी.
सिद्धेश्वर स्वामी हे जरी कर्नाटकात जन्मले तरी त्यांचे शिक्षण कोल्हापूरला झाले होते
1968 या काळामध्ये दसरा चौकाजवळील सध्याच्या टायटन शोरूम च्या माडीवर डॉक्टर माई चव्हाण यांचा दवाखाना होता आणि त्याच्या तिसऱ्या मजल्यावर एक छोटे सभागृह होते तेथे एमआर देसाई यांचे द्वितीय चिरंजीव विचारवंत श्री दत्ता बाळ यांची दर रविवारी व्याख्याने होत असत ही व्याख्याने तत्त्वज्ञान पर असल्यामुळे त्याला अनेक लोक जमत असत .नजीकच लिंगायत बोर्डिंग मध्ये राहणारे सिद्धेश्वर स्वामी काही वेळेला आपली हजेरी लावत ते राजाराम कॉलेजमध्ये एम ए तत्त्वज्ञान विषय घेऊन शिकत होते आणि त्यांच्या मागे मी एक वर्ष तेथेच शिकत होतो माझाही विषय तत्त्वज्ञान होता आणि आम्हा दोघांना तत्त्वज्ञान शिकवणारे प्राध्यापक श्रीनिवास दीक्षित होते आमचे भाग्य की श्रीनिवास दीक्षित यांच्यासारख्या एका नामवंत प्राध्यापकाकडून आम्ही तत्त्वज्ञानाचे धडे गिरवले पुढे श्रीनिवास दीक्षित मला पीएचडी साठी सुद्धा गाईड होते शेवटपर्यंत दीक्षित सरांची कृपादृष्टी लाभली.
यानंतर बरेच वर्ष सिद्धेश्वर स्वामींची भेट नव्हती कणेरी मठाचे अदृष्यकाडसिद्धेश्वर यांचे ज्ञानदीप मासिक मी संपादन करत होतो. तिथे त्यांचे येणै चालू होते. एकदा भोज येथे सिद्धेश्वर स्वामींची प्रवचन मालिका होती आणि त्यातल्या एका कार्यक्रमाला मी गेलो त्यावेळी त्यांच्या निवासस्थानी थोडी चर्चा झाली जुन्या आठवणी निघाल्या त्यानंतर प्रवचनाच्या अगोदर त्यांनी मला बोलण्याची विनंती केली मी थोडा वेळ बोललो वक्तशीरपणाबद्दल सिद्धेश्वर स्वामींची ख्याती होती बरोबर ठराविक वेळेला त्यांचे व्याख्यान सुरू असायचे त्याला खूप लांबून लोक यायचे यानंतर एकदा ते इचलकरंजीला उद्योगपती मालूंच्या फार्म हाऊस वर होते त्या वेळेला माझे महायोगी गौतम बुद्ध हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते त्यावर बऱ्यापैकी चर्चा होत्या मी त्याची प्रत सिद्धेश्वर स्वामींना दिली आणि गौतम बुद्धांच्या अस्थिरक्षेचा स्तूप कोल्हापूरमध्ये होता याबद्दलच्या संशोधनाची माहिती दिली पुढे काही दिवसानंतर मला अदृश्य कार् सिद्धेश्वर स्वामींचा निरोप आला सिद्धेश्वर स्वामीना तुमचं बुद्धा वरचे व्याख्यान ऐकायचं आहे आणि कनणेरी मठ मध्ये ते आलेले आहेत त्यावेळी खाली माझे व्याख्यान लोकांसमोर सुरू होते आणि तिथला स्पीकर ची वायर गेस्ट हाऊसला सिद्धेश्वर स्वामींच्या खोलीमध्ये नेलेली होती मी साधारणपणे सकाळ आणि दुपारी चार तास गौतम बुद्ध या विषयावर मांडणी केली .पहिले सत्र झाल्यावर अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीं व मी त्यांना गेस्ट हाऊस वर भेटायला गेलो त्यावेळी त्यांनी सांगितले "डॉक्टर देसाई तुम्ही केलेली बुद्ध तत्त्वज्ञानाची मांडणी ही बिनचुक आहे .मला खूप आवडली."
सिद्धेश्वर स्वामींची माझी शेवटची भेट तीन /चार वर्षांपूर्वी कनेरी मठावर झाली .माजी राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील साहेबांनी मला सांगितले की आपण कणेरी मठावर जायचे आहे तिथे एक मोठे योगी येणार आहेत त्यांना भेटायचं आहे मी त्यांच्याबरोबर गेलो आणि एका शेतामध्ये सिद्धेश्वर स्वामीच बसलेले होते डी वाय साहेब माझी ओळख करून देताना ते म्हणाले "अहो त्यांचा माझा फार जुना परिचय आहे आम्ही एकाच गुरूकडे तत्त्वज्ञान शिकलेलो आहोत आणि त्यांनी सुंदर हास्य दिलं ते हास्य आजही मला आठवतं त्या बैठकीत त्यांच्याबरोबर नेहमी असणारे एकसंबाचे स्वामी मात्र नव्हते ते योग शिक्षक होते आणि एका रस्त्या अपघातामध्ये त्यांचे निधन झालं होतं सिद्धेश्वर स्वामींच्या बरोबर थोडी चर्चा झाली आणि आम्ही निघालो त्यानंतर मात्र सिद्धेश्वर स्वामींची माझी भेट झाली नाही कोरोनाचा काळ होता त्यामुळे आम्ही लांबच राहिलो आणि आज या दुःखद बातमीने तत्त्वज्ञान क्षेत्रातला एक तपस्वी निघून गेला याचं मनस्वी दुःख आहे अध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक व्याख्याते, प्रवचनकार आहेत पण तत्त्वज्ञानाचा भरभक्कम वैचारिक आधार असणारे मात्र जवळजवळ नाहीत .ती उणीव सिद्धेश्वर स्वामी गेल्यानंतर भरून निघणे कठीण आहे .
सौजन्य :- डॉ. सुभाष देसाई कोल्हापूर ९४२३० ३९९२९, संकलन महादेव मेंडगिरी सातारा
Monday, January 2, 2023
ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी यांचं सोमवारी वृद्धापकाळाने निधन.
ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी यांचं
सोमवारी वृद्धापकाळाने निधन.
ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी यांचं
सोमवारी वृद्धापकाळाने निधन.
सातारा दि. ३ :- रविंद्र वाकडे
ज्ञानयोगाश्रम विजयपूरच्या सिद्धेश्वर स्वामीजी यांचं सोमवारी वृद्धापकाळाने निधन झालं. आपल्या वाणीने त्यांनी लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले. माणुसकीच्या विचारांनी भारावून टाकले. कशाचेही स्तोम नाही, अवडंबर नाही अशी त्यांची साधी राहणी होती. ते जसे उच्च पदस्थ, धनिकांना जवळचे वाटत तसेच गोरगरीबांनाही आपले वाटत. कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र सीमावर्ती भागात त्यांचे असंख्य अनुयायी आहेत. ज्ञानयोगी आश्रम, विजयपूर (कर्नाटक) येथील परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजी यांचे काल रात्री देहावसन झाले. तत्वज्ञानाचे थोर अभ्यासक, विचारवंत आणि महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या माणुसकीच्या विचारांचा प्रसारक आपल्यातून हरपले . शिवैक्य झाले .
कर्नाटक सरकारनं मंगळवार, 3 जानेवारीला विजयपुरा येथील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीये.कर्नाटक सरकारनं सिद्धेश्वर स्वामींचं अंतिम संस्कार राज्य सन्मानानं करण्याचा निर्णय घेतलाय. आज, मंगळवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्वामीजींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदींसह कर्नाटक चे मुख्यमंत्री बोम्बई, अन्य नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्कार नाकारल्यानंतर स्वामीजी प्रकाशझोतात आले होते. याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून माहिती दिली होती.
आज स्वामीजी देहरूपाने आपल्यात नाहीत पण त्यांनी कानडी भाषेत लिहिलेली पुस्तके, त्यांची रेकॉर्ड केलेली व्याख्याने आपल्यासोबत कायम आहेत.हा आपल्यासाठी अमूल्य ठेवा आहे. सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या निधनाने समस्त लिंगायत समाजातील बांधवांकडूनशोक व्यक्त केला जात आहे त्यांच्या निधनाने समाजात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे .
वीरशैव व्हीजनतर्फे यंदाही 'सिद्ध सजावट स्पर्धा' , घरबसल्या विजेत्यांना मिळणार हजारोंची बक्षिसे
वीरशैव व्हीजनतर्फे यंदाही 'सिद्ध सजावट स्पर्धा' , घरबसल्या विजेत्यांना मिळणार हजारोंची बक्षिसे
वीरशैव व्हीजनतर्फे यंदाही 'सिद्ध सजावट स्पर्धा' , घरबसल्या विजेत्यांना मिळणार हजारोंची बक्षिसे
सोलापूर दि २ : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त वीरशैव व्हीजनतर्फे यंदाही सलग तिसऱ्या वर्षी 'सिद्ध सजावट स्पर्धे'चे आयोजन करण्यात आल्याची माहिती वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेवर निर्बंध आले होते. अशावेळी घरबसल्या भक्तांना सिद्धेश्वरांची भक्ती करता यावी, त्यांचे जीवन चरित्र समजून घेता यावे, त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय व्हावा तसेच भक्तांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला वाव मिळावा यासाठी गेली दोन वर्षे 'सिद्ध सजावट स्पर्धा' घेण्यात आली होती. यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात होणार आहे. तरीही स्पर्धकांच्या मागणीनुसार यंदाही सिद्ध सजावट स्पर्धा घेण्याचे ठरले आहे.
स्पर्धेसाठी सिद्धरामेश्वरांचे अध्यात्मिक आणि धार्मिक कार्य, सिद्धरामेश्वरांचे विचार, सिद्धरामेश्वरांचे समाजीक कार्य, सिद्धरामेश्वर यात्रेतील विधी, गड्डा यात्रा, सिद्धरामेश्वर मंदिर परिसर, असे 5 विषय ठेवले आहेत. स्पर्धेसाठी एक अट आहे. ती म्हणजे घरामध्ये सिद्धेश्वर यांची प्रतिमा अथवा मूर्ती स्थापन करूनच त्यासमोर सजावट करावयाची आहे.
सदरहू स्पर्धा संपूर्ण कुटुंबासाठी असून सर्वांसाठी खुली आहे. 8 जानेवारी पर्यंत या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करता येईल. स्पर्धकांनी 9604045418, 9657096190 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस 15 हजार रु एम. के. फाउंडेशनतर्फे महादेव कोगनुरे यांच्यावतीने, द्वितीय बक्षीस 11 हजार रु स्व. बाळासाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ माजी विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांच्याकडून, तृतीय बक्षीस 9 हजार रु कै. गीताई गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या स्मरणार्थ श्रीरंग महाराज औसेकर यांच्याकडून, चतुर्थ बक्षीस 7 हजार रु कै. रावसाहेब ढेपे यांच्या स्मरणार्थ प्रवीण ढेपे यांच्याकडून, पाचवे बक्षीस 6 हजार रु अजित खाडिलकर यांच्याकडून, सातवे बक्षीस 5 हजार रु कै. गंगाधर शेटे यांचे स्मरणार्थ शिवानंद शेटे यांच्याकडून, आठवे बक्षीस 4 हजार रु कै. टोपणप्पा कल्लूरकर यांच्या स्मरणार्थ सिद्धेश्वर कल्लूरकर यांच्याकडून, नववे बक्षीस 3 हजार रु गिरजाबाई कल्लूरकर यांच्या स्मरणार्थ सिद्धेश्वर कल्लूरकर यांच्याकडून तर उत्तेजनार्थ 1 हजार रुपयांची 5 बक्षिसे कै. बसवराज दुलंगे यांच्या स्मणार्थ आशिष दुलंगे यांच्याकडून दिली जाणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना स्व. धर्माजी भोसले यांच्या स्मणार्थ माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्याकडून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू व सहभाग प्रमाणपत्र कै. काशिनाथ दुलंगे यांचे स्मरणार्थ डॉ. अजित दुलंगे यांच्यावतीने देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सोलापूरवासियांनी व समस्त सिद्धेश्वरभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, सोमेश्वर याबाजी, विजय बिराजदार, राजेश नीला, बसवराज जमखंडी, सचिन विभुते आदी उपस्थित होते.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम अ...
-
महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,दि. 18 रोजी बसव भूषण पुरस्कार 2024 चे वितरण. सातारा, दि.16 - रविंद्र वाकडे महात...














