Monday, June 13, 2022

लिंगायत फाउंडेशन,लिंगायत संघर्ष समिती, नाशिक .चांदवड मर्चंटस को ऑ.बँक यांचे वतीने चांदवड येथे दि 12 रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर


लिंगायत फाउंडेशन,लिंगायत संघर्ष समिती, नाशिक .चांदवड मर्चंटस को ऑ.बँक यांचे वतीने चांदवड येथे दि 12 रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर 
सातारा, दि.11 - प्रतिनिधी प्रा.अजय शेटे
लिंगायत फाउंडेशन,लिंगायत संघर्ष समिती, नाशिक .चांदवड मर्चंटस को ऑ.बँक ,लिंगायत जंगम व गोसावी समाज ,चांदवड यांचे मार्फत रविवार दि.12 जून,2022 रोजी स.10 ते सायं.4 वाजेपर्यंत महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,चांदवड, ता.चांदवड, जि.नाशिक येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तसेच चांदवड व आसपासच्या परिसरातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
  इतर शिबिरापेक्षा या शिबिराची काही खास वैशिष्टे असून मानवता कॅन्सर हॉस्पिटल,नाशिक यांचे तर्फे मॅमोग्राफी,ओरल स्क्रिनिंग,कोल्पोस्कोपी.सिरम क्रिएटनी ,साखर व संपूर्ण रक्ततपासणी करण्यात येणार आहे.
तसेच ॲशुअर्ड केअर प्लस हॉस्पिटल ,नाशिक यांचेतर्फे नामांकित डॉक्टरांचा सल्ला,रक्तातील साखर तपासणी, ई. सी.जी.,हॉस्पिटल मधील विविध आजार व डॉक्टरांच्या तपासण्यावर सूट देण्यात येणार आहे.
या शिबिराच्या बाबत अधिक माहितीसाठी डॉ.प्रकाश कबाडे 9423103942, मा.बाळासाहेब कबाडे 9226225152, मा. सुनील गोसावी 9422360961, मा.सुधीर कबाडे 9823031311, मा.जितू गोसावी 9762628951 यांचेशी संपर्क साधावा. व या महा आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन लिंगायत,जंगम,गोसावी समाज,चांदवड यांचे मार्फत करण्यात आले आहे.

Friday, June 10, 2022

जादुई आवाजाची खास शैली अनंतात विलीन मुंबई दूरदर्शनचे मराठी वृत्त निवेदक प्रदिप भिडे यांचे निधन


 जादुई आवाजाची खास शैली अनंतात विलीन 
मुंबई दूरदर्शनचे मराठी वृत्त निवेदक प्रदिप भिडे यांचे निधन 
सातारा, दि.8 - प्रतिनिधी प्रा अजय शेटे
आपल्या जादूई आवाजाच्या शैलीने मराठी बातम्या घराघरात व मनामनात पोहचविणारे मुंबई दूरदर्शनचे मराठी वृत्त निवेदक प्रदिप भिडे यांचे आज प्रदिर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.साल नव्वदच्या दशकातील ते एक अतिशय प्रसिद्ध असे वृत्त निवेदक होते 
सन 1974 पासून त्यांनी मुंबई येथे वृत्त विभागामध्ये अनुवादक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.तसेच त्यांनी कामगार विश्व व इ - मर्क या प्रसार माध्यम कंपनीत जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काही वर्षे काम केले.सन 1980 मध्ये त्यांनी खार येथे स्वतःच्या 'प्रियंका स्टुडिओ ' ची स्थापना केली होती.
मुंबई दूरदर्शन ची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972. ला म.गांधी जयंती दिवशी झाली .त्यानंतर 1974 मध्ये प्रदिप भिडे हे त्या दूरदर्शन केंद्रामध्ये दाखल झाले.वयाच्या 21 व्या वर्षापासून त्यांनी आपल्या वृत्त निवेदन कौशल्यास सुरुवात केली .मराठी अभिनेत्री स्मिता पाटील,भक्ती बर्वे,ज्योत्स्ना किरपेकर या सम व्यावसायिक वृत निवेदिकांबरोबर त्यांनी  दररोज आलटून पालटून मराठी बातम्या व इतर कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना दाखवले.
मराठी वांडमय ,नाटके ,कादंबऱ्या , एकांकिका या विषयांमध्ये त्यांना विशेष रुची होती.प्रसार माध्यम क्षेत्रात काम करण्याचा आपला मानस त्यांनी सत्यात उतरवून अखेर पूर्ण केला व मुंबई दूरदर्शनची नोकरी स्विकारली.
"संस्कृत भाषेमुळे उच्चार शुद्धी होते .वाणी सात्विक बनते.त्यामुळे सर्वांनी संस्कृत श्लोक पठण करावेत आणि आवाजाची विशिष्ठ चढ उताराची शैली जर वृत्त निवेदकाने जर आत्मसात केली .तर तो नक्कीच त्याच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊ शकतो." असे त्यांनी अतिशय ठामपणे एकदा सांगितले होते .
त्यांनी तब्बल 25 वर्षे वृत्त निवेद नाचे काम केले. 21 मे 1999 ला स्व. राजीव गांधी यांच्या निधनाची बातमी तत्कालीन वृत्त संपादिका विजया जोशी यांनी त्यांना खास पोलिसांच्या जीपने अचानक बोलावून सांगण्यास सांगितली होती. यावरून वृत्त निवेदनाच्या बाबतीत त्यांच्यावर असलेला वरिष्ठांचा विश्वास व त्यांचे खास कौशल्य यांचे प्रचिती देवून गेले होते.
असा हा अतिशय ओघावता भारदस्त  मराठी वृत्त बातम्या निवेदन करणारा आवाज प्रदिर्घ निवृत्तीनंतर आज आपल्यातून नाहीसा झाला आहे . कै.प्रदिप भिडे यांना लिंगायत टिव्ही च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व यांच्या मराठी वृत्त निवेदन सादरीकरण कार्यास विनम्र अभिवादन .ओम शांती 


Tuesday, June 7, 2022

इष्टलिंग पूजन वीरशैवांचे मुख्य आचरण : श्री काशी जगद्गुरु काशीपीठात शाहीस्नान व धर्मसभा


इष्टलिंग पूजन वीरशैवांचे मुख्य आचरण : श्री काशी जगद्गुरु          
काशीपीठात शाहीस्नान व धर्मसभा
            
वाराणसी दि 7  : 
प्रतिनिधी 
जो इष्टलिंगाची भक्तिपूर्वक पूजन करतो. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याच्यावर येणारी संकटे टळतात. त्यामुळे इष्टलिंग पूजा हा वीरशैवांचे प्रमुख आचरण होय असे प्रतिपादन काशी जंगमवाडी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
          काशी जंगमवाडी मठातील शाहीस्नान व धर्मसभेचे उद्घाटन करून ते आशीर्वचन देत होते. याप्रसंगी नूतन काशी जगद्गुरु डॉ. मलिकार्जुन विश्वाराध्य महास्वामी, शाकापुर तपोवन मठाचे डॉ. सिद्धाराम शिवाचार्य स्वामी उपस्थित होते.
          पुढे बोलताना काशी जगद्गुरु म्हणाले की आज वीरशैव इष्टलिंग पूजेपासून विमुख होऊन धर्माबाहेर आचरण करताना दिसून येत आहेत हे उचित नाही. नित्य इष्टलिंग पूजा करत योग्य मार्गाने चालले पाहिजे. काम, क्रोध, मोह, मध आणि मत्सर हे अवगुण सोडून दया, शांती, भक्ती, देव आणि धर्म हे लिंगगुण आत्मसात करायला पाहिजे. श्रद्धेने लिंगपूजा करणारा स्वतः लिंगच होतो. इष्टलिंग पूजा शरीराला लिंगमय शरीर बनवण्याचे उत्कृष्ट साधन आहे. यासाठी प्रत्येक वीरशैवांनी गुरूकडून इष्टलिंग गळ्यात धारण करून दररोज इष्टलिंग पूजा केले पाहिजे.
           याप्रसंगी कलबुर्गी जिल्ह्यातील जेऊरगी  तालुक्यातील शाकापुर तपोवन मठाचे डॉ. सिद्धाराम शिवाचार्य स्वामी यांना मठाचे उत्तराधिकारीपदी चि. सिद्धलिंग मरिदेव यांची नेमणूक केल्याचे पत्र जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी प्रदान केले. तसेच बाळामठाचे डॉ. गुरुमुर्ती शिवाचार्य स्वामी यांना 'शिष्य मानस हंस' हा पुरस्कार काशी जगद्गुरूंनी प्रदान केले. 
          सकाळी ब्राम्ही मुहूर्तावर काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी व नूतन काशी जगद्गुरु डॉ. मलिकार्जुन विश्वाराध्य महास्वामी यांना दशाश्वमेध घाट येथे शाहीस्नान घालण्यात आले. त्यानंतर शाकापुर मठ येथून आलेले 2 हजार भक्त वाद्यवृंदासह जलकुंभ घेऊन  यांची बग्गीमधून दशाश्वमेध घाट ते जंगमवाडी मठापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूकीतील सुवासिनींनी डोक्यावर घेतलेले जलकुंभ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.      


सहकार भारती चे मा.पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियानास सर्व सहकार्य राहील - मा. शशीताई अहिर


 सहकार भारती चे मा.पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियानास सर्व सहकार्य राहील - मा. शशीताई अहिर 
सातारा, दि.7 - प्रतिनिधी प्रा.अजय शेटे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरू स्व.लक्ष्मणरावजी इनामदार यांच्या स्वप्नातील सहकार चळवळ प्रत्यक्ष उतरविण्यासाठी आपण अखेरपर्यंत कार्य करणार आहोत . असे मत  सहकार भारतीच्या अध्यक्षा मा.शशीताई अहीर यांनी मा. पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेच्या पहिल्या अधिवेशन व प्रशिक्षण शिबिरात पालघर,मुनोर येथील माधवधाम रिसॉर्ट येथे बोलताना व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या की, यशस्वी सहकार क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी मला अनेक वेळा परदेशात जावे लागले.' विना सहकार, नही उद्धार - विना संस्कार नही सहकार ' या उक्तीला न्याय देण्यासाठी खास वेगळ्या सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून, ऑल इंडिया बँक फेडरेशन मध्ये आता आपले दहा सदस्य कार्य करत आहेत.आणि सहकार क्षेत्राची प्रगती करण्याबरोबरच त्याला सुरक्षित बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.हेच सहकार भारतीचे सध्याचे खूप मोठे यश आहे.सहकार भारती मा.पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेला केंदिय योजना प्रसार व प्रचार कार्यात संपूर्णपणे सहकार्य करणार आहे.
या कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी मा.पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ.मुकेश जी शर्मा साहेब,कार्यकारी अध्यक्ष रामजी पाल साहेब ,  सरचिटणीस भगवानराव जी बागुल साहेब मा.रामजी,झारखंड डॉ.राजन पाटील, मा.सुलोचना ताई चौधरी,मा.किन्नरी सोनार, मा.मनिषा मुरुडकर, मा.सुनिता जानवेकर, मा.पूजा मंडवाले, मा. कृपाली संखे , मा.भरत ताकवाणी, मा.जितेंद्र पुरोहित, मा.योगिता चव्हाण, मा.सातप्पा कांबळे, मा.यशोदा पर्वतकर, मा.प्रकाश खतकर हे पदाधिकारी हजर होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष मा.शिवाजीराव देवकर साहेब यांनी अमेरिकेत असून सुद्धा तेथून खास मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ.मुकेश जी शर्मा साहेब यांनी  राष्ट्रीय मानवाधिकारा बाबतही खास मार्गदर्शन केले व प्रशस्तीपत्र वितरण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महामंत्री दिलीप क्षीरसागर यांनी केले.आभार महाराष्ट्र  राज्य सचिव प्रा.अजय शेटे यांनी मानले.


Monday, June 6, 2022

लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही पूर्ण करण्याचे मा.शरदरावजी पवार साहेब यांचे आश्वासन


 लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत  तात्काळ कार्यवाही  पूर्ण करण्याचे मा.शरदरावजी पवार साहेब यांचे आश्वासन 
सातारा, दि.3 - रवी वाकडे.
 लिंगायत समाजाच्या मागण्या रास्त असून त्या प्रलंबित आहेत.त्या संबंधी त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही केली जावी.असा पत्रव्यवहार मा.शरदरावजी पवार साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांना केला आहे.
या मध्ये लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा,लिंगायत वाणी लोकांना आरक्षणाचा लाभ मिळावा, म.बसवेश्वर स्मारक,मंगळवेढा बाबत तातडीने अनुदान मंजूर होऊन कार्यवाही सुरू करावी,अकरा पोट जातींचा लिंगायत म्हणून समावेश व्हावा.लिंगायत समाजाच्या मठ स्थावर संपत्ती वरील अतिक्रमणे हटविली जावीत. म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.लातूर येथील विमानतळाला म.बसवेश्वर यांचे नाव द्यावे.अशा स्वरूपाच्या या काही मुख्य मागण्या आहेत.
त्या बाबत तातडीने कार्यवाही करून मा.मुख्यमंत्री साहेब यांनी संबंधित सर्व वेगवेगळ्या विभागाकडून तातडीने अहवाल मागविले आहेत व त्या बाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या बद्दल सांगली राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.संजयजी शेटे यांनी मा.शरदरावजी पवार साहेब व मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांचे लिंगायत समाज संघटने तर्फे आभार व्यक्त केले आहेत 

मा.पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे प्रशिक्षण शिबिर संपन्न


मा.पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे प्रशिक्षण शिबिर संपन्न 
सातारा, दि.6 -प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी
 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे पहिले दोन दिवसीय निवासी अधिवेशन व प्रशिक्षण शिबिर पालघर (महाराष्ट्र ) येथे दि.4 व 5 जून रोजी पार पडले.
   या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. मुकेशजी शर्मा ,कार्यकारी अध्यक्ष मा. रामकुमार पाल साहेब, सरचिटणीस  मा.भगवानराव बागुल साहेब,महामंत्री मेजर  मा. सरसचंद्र त्रिपाठी, मा.दिलीप क्षीरसागर,प्रवक्ते प्रेम कुमार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.
या अधिवेशन व शिबिरास राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.शिवाजीराव देवकर साहेब, महामंत्री  मा.अशोक सिन्हा, मा.स्नेहल शाह , मा.सुरेंद्रकुमार गुप्ता यांचेही सहकार्य लाभले आहे.

या शिबिरात आत्मनिर्भर भारत अभियान, अंतर्गत येणाऱ्या शासकीय योजना,बँक कर्ज,अनुदान मंजूरी ,परतफेड ,कागदपत्रे,लाभार्थी पात्रता,निकष,अटी,नियम , प्रकल्प अहवाल,आर्थिक अंदाजपत्रक, सुश्म लघुउद्योग,उत्पादन प्रक्रिया,कौशल्य विकास,बचत गट विकास ,गो आधारित उत्पादने,सेंद्रिय खते व उत्पादने,ग्रामीण लघुउद्योग,नारी शक्ती,मेक इन इंडिया,स्त्री सुलभ उत्पादने,व्यसनमुक्ती उत्पादने,तुळस उत्पादने , खादी ग्रामोद्योग,कृषी व कृषी पूरक उद्योग,घरकुल बांधकाम,पाणी योजना, औंषधे व लशी, कुशल शिक्षण,माहिती अधिकार व मा.पंतप्रधान, केंद्रीय विकास योजना प्रसार व प्रचार कार्यक्रम ईत्यादी बाबत खास माहिती देण्यात आली.
पालघर जिल्हा रुग्णालय उभारणीचा  खात्रीशीर संकल्प करण्यात येवून मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले.
राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.भारत शाह, मा.भावेश दोशी , राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम आयोजक मा.संदीप सिंह , मा.सुलोचना ताई चौधरी, श्री. जनाडे,, मा .राहुल ,सुरेखा मॅडम, मा.मनिषा मुरुडकर, मा.कुलकर्णी, ॲड.आगरकर मॅडम, मा.सुनिता जानवेकर, मा. कृपाली संख्ये, मा. यु. टी.राऊत मॅडम, मा.पूजा मंडवाले डॉ.सुनील पाटील,ज्योती गोरे , यांनीही हजेरी लावून आपले अनमोल मार्गदर्शन केले. मा. कल्पना देवडीगा यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन व संयोजन  मा. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रामकुमार पाल साहेब यांनी पालघर,मनोर येथील स्वमालकीच्या  'माधवधाम ' या शूटिंग बंगल्यावर  अतिशय निसर्गरम्य प्रसन्न वातावरणात केले होते.सर्व स्त्री पुरुष पदाधिकारी,पदाधिकारी कार्यकर्ते प्रशिक्षणार्थी यांची संपूर्ण दोन दिवसांची चहापाणी,नाष्टा,जेवण , निवास व्यवस्था यांचे उत्तम नियोजन त्यांनी केले होते.
या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वर्गशाखा घेण्यात आली.यावेळी मा.रहाळकर यांचे मार्गदर्शन,सांघिक खेळ यांचा लाभ झाला. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ' फिट इंडिया ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवून व्यायाम,समुपदेशन,आरोग्य काळजी यांचे मार्गदर्शन करण्यात येवून  सर्व प्रशिक्षणार्थी व मदतनीस यांना टी शर्ट वाटप करण्यात आले.उत्साहपूर्ण वातावरणात घोषणा देण्यात आल्या.
त्यानंतर कार्यक्रमाच्या अखेरीस प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व पदाधिकऱ्यांना मा.मान्यवरांच्या हस्ते ' प्रशस्ती पत्र ' प्रदान करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमात गौतम बुद्धाचे तत्वज्ञान व विचार , प्रभू श्रीराम जयघोष,उत्तम शिस्त ,शिष्टाचार,भारतीय संस्कृती आचरण,प्रार्थना व राष्ट्रगीत गायन ,मान्यवरांची अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शनपर भाषणे,स्वावलंबन केले जाऊन अतिशय पवित्र वातावरणात हे अधिवेशन व प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. 
उत्तम सुशोभित व्यासपीठ,आकर्षक डिजिटल बोर्ड मांडणी ,सुशोभित रचना,सुटसुटीत बैठक व्यवस्था,उत्तम ध्वनिवर्धक यंत्रणा, उत्तम  झुंबर स्पॉट प्रकाश व्यवस्था, खेळती स्वयंचलित पंख्यांची हवा, प्रशस्त फॉर्म हाऊस,सुशोभित बंगला व राहण्यासाठी सर्व सोयींनी युक्त इमारत खोल्या,घनदाट वृक्ष राजी खालील बैठक व्यवस्था,  झुलत्या खुर्च्या, झोपाळा,अंडरग्राऊंड विस्मयकारक चकित करणारे बंदिशाळा बांधकाम, स्विमिंग पूल,सुशोभित रंगीत दगड रचना शिल्पे,भव्य हिरवळीचे लॉन,वृक्षवेली,नदी पाणी दर्शन,च झाडाखाली हिरवळीच्या सहवासात चवदार शुद्ध सात्विक शाकाहारी जेवणाचा हसतखेळत वातावरणात सहभोजनाचा लाभघेवून ,आनंददायी फोटो सेशन करून  या शिबिरात सर्व पदाधिकारी प्रशिक्षणार्थी यांनी उत्तम चैतन्यमयी सकारात्मक सहभाग  नोंदवून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाची साथ दिली.शिबिर समारोपावेळी अतिशय सुह्रदय पूर्ण वातावरणात पुन्हा लवकरच यशस्वीरीत्या  एकत्र भेटण्याचे अभिवचन देवून एकमेकांना  भावपूर्ण निरोप देण्यात आला.


🚩** भारताच्या इतिहासातील सुवर्ण क्षण शिवराज्याभिषेक सोहळा **🚩 विशेष लेख - प्रा.अजय शेटे


🚩** भारताच्या इतिहासातील सुवर्ण क्षण शिवराज्याभिषेक सोहळा **🚩 
विशेष लेख - प्रा.अजय शेटे.
सातारा, दि.6 -  ज्युलियन 6 जून 1674  'राज्याभिषेक दिन ' म्हणून निश्चित करण्यात आला.या
शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू करण्यात आली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्ववानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला व त्यानुसार विधी निश्चित करण्यात आला  शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सर्व लोक मिळून जवळपास लाखभर लोक ' रायगड ' या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे भोजन असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले. शिवराज्याभिषेक दरबार, जुलिअन तारीख ६ जून १६७४. या दिवशी पहिले  'अष्टप्रधान मंडळ ' स्थापण्यात आले. शिवराज्याभिषेक दरबार तयार करण्यात आला.  त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवर्शन केले. देवके दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ला परत आले. तुळजापूरला  श्री भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या  श्री भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री  श्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मे ला पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली. दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. काही धातूंची विशेष नाणी तयार करण्यात आली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. तयार केली गेली. ६ जून १६७४ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून,  श्री कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध सप्त नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्या जलकुंभांनी शिवाजीमहाराजांवर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्ये निनादत होती. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली.मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला. राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते.  ' सभासद बखर '  म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे ( जवळजवळ १४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकूण सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत  'अष्टप्रधान  मंडळ ' आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.अशा या हिंदवी स्वराज्य निर्मात्या - 
" शिवरायांचे आठवावे रूप ,
शिवरायांचा आठवावा प्रताप!! " 
हिंदवी स्वराज्य संस्थापक,क्षत्रिय कुलावतंस ,बहुजन ,गो ब्राम्हण प्रतिपालक ,राजाधिराज,श्रीमंत योगी छ.शिवाजी महाराज की - जय."
" जय भवानी - जय शिवाजी 

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...