मा.पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे प्रशिक्षण शिबिर संपन्न
सातारा, दि.6 -प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा.पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे पहिले दोन दिवसीय निवासी अधिवेशन व प्रशिक्षण शिबिर पालघर (महाराष्ट्र ) येथे दि.4 व 5 जून रोजी पार पडले.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. मुकेशजी शर्मा ,कार्यकारी अध्यक्ष मा. रामकुमार पाल साहेब, सरचिटणीस मा.भगवानराव बागुल साहेब,महामंत्री मेजर मा. सरसचंद्र त्रिपाठी, मा.दिलीप क्षीरसागर,प्रवक्ते प्रेम कुमार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.
या अधिवेशन व शिबिरास राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.शिवाजीराव देवकर साहेब, महामंत्री मा.अशोक सिन्हा, मा.स्नेहल शाह , मा.सुरेंद्रकुमार गुप्ता यांचेही सहकार्य लाभले आहे.
या शिबिरात आत्मनिर्भर भारत अभियान, अंतर्गत येणाऱ्या शासकीय योजना,बँक कर्ज,अनुदान मंजूरी ,परतफेड ,कागदपत्रे,लाभार्थी पात्रता,निकष,अटी,नियम , प्रकल्प अहवाल,आर्थिक अंदाजपत्रक, सुश्म लघुउद्योग,उत्पादन प्रक्रिया,कौशल्य विकास,बचत गट विकास ,गो आधारित उत्पादने,सेंद्रिय खते व उत्पादने,ग्रामीण लघुउद्योग,नारी शक्ती,मेक इन इंडिया,स्त्री सुलभ उत्पादने,व्यसनमुक्ती उत्पादने,तुळस उत्पादने , खादी ग्रामोद्योग,कृषी व कृषी पूरक उद्योग,घरकुल बांधकाम,पाणी योजना, औंषधे व लशी, कुशल शिक्षण,माहिती अधिकार व मा.पंतप्रधान, केंद्रीय विकास योजना प्रसार व प्रचार कार्यक्रम ईत्यादी बाबत खास माहिती देण्यात आली.
पालघर जिल्हा रुग्णालय उभारणीचा खात्रीशीर संकल्प करण्यात येवून मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले.
राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.भारत शाह, मा.भावेश दोशी , राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम आयोजक मा.संदीप सिंह , मा.सुलोचना ताई चौधरी, श्री. जनाडे,, मा .राहुल ,सुरेखा मॅडम, मा.मनिषा मुरुडकर, मा.कुलकर्णी, ॲड.आगरकर मॅडम, मा.सुनिता जानवेकर, मा. कृपाली संख्ये, मा. यु. टी.राऊत मॅडम, मा.पूजा मंडवाले डॉ.सुनील पाटील,ज्योती गोरे , यांनीही हजेरी लावून आपले अनमोल मार्गदर्शन केले. मा. कल्पना देवडीगा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन व संयोजन मा. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रामकुमार पाल साहेब यांनी पालघर,मनोर येथील स्वमालकीच्या 'माधवधाम ' या शूटिंग बंगल्यावर अतिशय निसर्गरम्य प्रसन्न वातावरणात केले होते.सर्व स्त्री पुरुष पदाधिकारी,पदाधिकारी कार्यकर्ते प्रशिक्षणार्थी यांची संपूर्ण दोन दिवसांची चहापाणी,नाष्टा,जेवण , निवास व्यवस्था यांचे उत्तम नियोजन त्यांनी केले होते.
या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वर्गशाखा घेण्यात आली.यावेळी मा.रहाळकर यांचे मार्गदर्शन,सांघिक खेळ यांचा लाभ झाला. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ' फिट इंडिया ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवून व्यायाम,समुपदेशन,आरोग्य काळजी यांचे मार्गदर्शन करण्यात येवून सर्व प्रशिक्षणार्थी व मदतनीस यांना टी शर्ट वाटप करण्यात आले.उत्साहपूर्ण वातावरणात घोषणा देण्यात आल्या.
त्यानंतर कार्यक्रमाच्या अखेरीस प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व पदाधिकऱ्यांना मा.मान्यवरांच्या हस्ते ' प्रशस्ती पत्र ' प्रदान करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमात गौतम बुद्धाचे तत्वज्ञान व विचार , प्रभू श्रीराम जयघोष,उत्तम शिस्त ,शिष्टाचार,भारतीय संस्कृती आचरण,प्रार्थना व राष्ट्रगीत गायन ,मान्यवरांची अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शनपर भाषणे,स्वावलंबन केले जाऊन अतिशय पवित्र वातावरणात हे अधिवेशन व प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले.
उत्तम सुशोभित व्यासपीठ,आकर्षक डिजिटल बोर्ड मांडणी ,सुशोभित रचना,सुटसुटीत बैठक व्यवस्था,उत्तम ध्वनिवर्धक यंत्रणा, उत्तम झुंबर स्पॉट प्रकाश व्यवस्था, खेळती स्वयंचलित पंख्यांची हवा, प्रशस्त फॉर्म हाऊस,सुशोभित बंगला व राहण्यासाठी सर्व सोयींनी युक्त इमारत खोल्या,घनदाट वृक्ष राजी खालील बैठक व्यवस्था, झुलत्या खुर्च्या, झोपाळा,अंडरग्राऊंड विस्मयकारक चकित करणारे बंदिशाळा बांधकाम, स्विमिंग पूल,सुशोभित रंगीत दगड रचना शिल्पे,भव्य हिरवळीचे लॉन,वृक्षवेली,नदी पाणी दर्शन,च झाडाखाली हिरवळीच्या सहवासात चवदार शुद्ध सात्विक शाकाहारी जेवणाचा हसतखेळत वातावरणात सहभोजनाचा लाभघेवून ,आनंददायी फोटो सेशन करून या शिबिरात सर्व पदाधिकारी प्रशिक्षणार्थी यांनी उत्तम चैतन्यमयी सकारात्मक सहभाग नोंदवून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाची साथ दिली.शिबिर समारोपावेळी अतिशय सुह्रदय पूर्ण वातावरणात पुन्हा लवकरच यशस्वीरीत्या एकत्र भेटण्याचे अभिवचन देवून एकमेकांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
No comments:
Post a Comment