Wednesday, September 22, 2021

* महाराष्ट्र सहकार महर्षी..आणि लिंगायत समाजाचे लोकनेते मा.काकासाहेब कोयटे *

* महाराष्ट्र सहकार महर्षी..आणि लिंगायत समाजाचे लोकनेते  मा.काकासाहेब कोयटे  *



    वडूज.दि लिंगायत TV live विशेष प्रतिनिधी  प्रा.अजय शेटे.. 

.


.वीरशैव लिंगायत  संघर्ष समितीचे समन्वयक मा. ओमप्रका या श उर्फ काकासाहेब कोयटे यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या सदस्य पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे..
..अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील व्यापारी वर्गांने  मिळून 1986 साली समता को. ऑप.क्रेडिट सोसाय टीची स्थापना केली..त्यामध्ये सिंहाचा वाटा हा मा.काकासाहेब कोयटे यांनी उचलून चे अरमन होण्याचा मान पटकावला..
..सन 2020..21 या आर्थिक वर्षात या सोसायटीने 1000 कोटींचा व्यावसायिक उद्दिष्ट टप्पा पार केला.यावरून या संस्थेची प्रगती आपल्या लक्षात येते..याचे सर्व श्रेय मा. ओमप्रकाश कोयटे याना जाते..त्यांच्या या कार्याची दखल घेवून च त्यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या अध्यक्ष पदी त्यांची प्रथम त्यांची निवड झाली..
..समता को. ऑप. सोसायटी च्या  एकूण 13 व्यावसायिक शाखा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत व अजून 10 शाखांचा विस्तार लवकरच होणार आहे..
..या सोसायटीने ग्रामीण भागात कार्यक्षेत्र असूनही जवळजवळ 600 कोटींचे डि पाँ झि ट मिळवले असून इतर व्यवसायात 1000 कोटींचे रेकॉर्ड ब्रेक उद्दिष्ट पार केले आहे..
..प्रगत बँकिंग प्रणालीचा वापर करत या संस्थेने अल्पावधीतच हे यश मिळवले आहे. 
RTGS..NEFT..IMPS यासारख्या वेगवान  व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत..मोबाईल बँकिंग..QR कोड.. चॅनेल फायनांसशियल सिस्टीम..याद्वारे ऑनलाईन मेसेज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. व सर्व व्यवहार विंना पावती व विना कागद करण्यात आला आहे.शिवाय ही सुविधा फक्त इतर सोसायटी क्षेत्रापुरती मर्यादित नसून सर्व मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकांशी जोडली गेली आहे.
..सन 2020..21 या आर्थिक वर्षात सोने तारण व्यवहार हा एक 100 कोटीच्या घरात पोहचला आहे व येत्या पुढील वर्षात तो 200 कोटींच्या घरात पोहच विण्याचा मानस आहे..सोसायटीच्या बाबतीत अधिक माहिती हवी असल्यास www.samatapat.com या वेबसाईटवर संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे..
..समता संस्थेच्या या सर्व प्रगतीत मा.लोकनेते काकासाहेब उर्फ ओमप्रकाश कोय टे यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांना तंत्र सल्लागार संचालक संदीप कोयटे यांचीही मोलाची साथ मिळाली आहे..
..त्यांच्या या बँकिंग प्रणालीतील उल्लेखनीय कार्याची दखल घेवून
नव्यानेच स्थापन झालेल्या स्वतंत्र  सहकार मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री  मा. अमितजी शहा.. मा.शरदराव जी पवार साहेब यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर सदस्य म्हणून नेमणूक करून त्यांच्या उचित कार्याचा गौरव करून अभिनंदन ही केले आहे.
..महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समिती व वीरशैव लिंगायत समाज संघटना यांच्या वतीनेही त्याच्या कार्याच्या कौतुकाचा ठराव करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. मा.काकासाहेब उर्फ ओमप्रकाश कोयटे यांची भावी आयुष्यात अशीच प्रगती होत राहो हिच समाज बांधवां तर्फे हार्दिक शुभेच्छा **

Sunday, September 19, 2021



           लिंगायत समाजातील एक आदर्श शिक्षीका सिंधुताई सुकरे





      लिंगायत समाजातील एक आदर्श शिक्षीका सिंधुताई सुकरे

नांदगाव तालुका कराड येथील  दक्षिण मांड व्हॅली  शिक्षण   संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ  तुकाराम सुकरे  गुरुजी  यांच्या पत्नी  आणि पत्रकार प्रमोद सुकरे ,ग्रामपंचायत सदस्य  प्रशांत सुकरे यांच्या मातोश्री स्व. सौ सिंधुताई  सुकरे  यांच्या तृतीय पुण्यसम्रान निमित्त त्यांच्या कार्याचा आढावा,

लिंगायत TV Live  शब्दांकंन दिलीप महाजन



लिंगायत समाजातील एक आदर्श शिक्षीका सिंधुताई सुकरे

नांदगाव तालुका कराड येथील  दक्षिण मांड व्हॅली  शिक्षण   संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ  तुकाराम सुकरे  गुरुजी  यांच्या पत्नी  आणि पत्रकार प्रमोद सुकरे ,ग्रामपंचायत सदस्य  प्रशांत सुकरे यांच्या मातोश्री स्व. सौ सिंधुताई  सुकरे  यांच्या तृतीय पुण्यसम्रान निमित्त त्यांच्या कार्याचा आढावा,

 एक आदर्श शिक्षिका , आदर्श गृहीणी  ,आदर्श माता, आदर्श संघटीका ,हौशी ,मनमिळाऊ  आणि अजात शत्रू  अशी स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी नांदगाव आणि परिसरात  निर्माण केली होती , त्यांना गावात आणि परिसरात सुकरे बाई  या नावानी सर्वजण ओळखत होते , त्यांचा जन्म   सांगली  जिल्ह्यातील  तडसर या गावी  एका शेतकरी कुटुंबात झाला  ,आई वडील ,आणि चार भाऊ एक बहीण  या कुटुंबातील  त्या सर्वात  मोठ्या  होत्या   प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले  तर d ed  चे शिक्षण  कस्तुरबा अध्यापक  विद्यालय  सांगली  येथे झाले ,शिक्षण पूर्ण होताच  माहुली तालुका  खानापूर  या ठिकाणी   शिक्षिका   या पदी  त्यांची कामाची सुरुवात झाली  नंतर  1972 साली त्यांचा विवाह  नांदगाव तालुका कराड येथील विश्वनाथ   सुकरे गुरुजी  यांचे सोबत झाला  दीर जावा अशा  अशा  मोठ्या कुटुंबात  घर आणि  नोकरी   करत  होत्या  सण 1985 मध्ये  सासूबाई  यांची सावली गेल्यावर  सर्व कुटुंबाची जबाबदारी आणि नोकरी  केली , सुमारे  38 वर्ष शिक्षिका  म्हणून  काम केले  या मध्ये 30 वर्षे   च्या कालावधी मध्ये   अनेक  विद्यार्थी  डॉक्टर , वकीलउद्योजक  इंजिनिअर  तयार झाले , नोकरी कालावधीत  त्यांचा सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील  योगदानाबद्दल  आदर्श शिक्षिका चे पुरस्कार त्यांना मिळाले सुकरे  गुरुजी आणि सुकरे परिवाराचा   सामाजिक  शैक्षणिक   राजकीय   क्षेत्रातील  कराड तालुक्यातील नावलौकिकाचे  सर्व श्रेय  हे स्व सौ सिंधुताई सुकरे  यांचे कडे जाते  त्यांचा या कार्यानि लिंगायत समाजाचे नाव  कराड तालुक्यात उज्वल केले आहे त्यांना  अभिवादन




 







 

Friday, September 17, 2021



साताराची सुकन्या जान्हवी हिने केला योगविश्वातला सलग तिसरा विश्वविक्रम , सातारचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर

सातारच्या जान्हवीने योगविश्वातला ८तास १३ मिनिटे २१ सेकंद  स्थिर राहून तिसरा विश्वविक्रम करत रचला इतिहास



सातारा दि ८  प्रणाली  वाकडे  विशेष प्रतिनिधी 

सातारच्या जान्हवी जयप्रकाश इंगळे हिने सुप्त बद्ध कोनासन या आसन मध्ये ८तास १३ मिनिटे २१ सेकंद स्तब्ध,काहीही हालचाल न करता स्थिर राहून तिसरा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे...या विश्वविक्रमाची नोंद योगा बुक आँफ रेकाँर्ड मध्ये झाली असून नुकतेच कुरियर ने गोल्ड मेडल,सर्टीफिकेट,बँच होल्डर,टी-शर्ट आदी प्राप्त झाले..


जान्हवी या सातारा जिल्ह्यामधून योगविश्वात जागतिक विश्वविक्रम करणार्या पहिल्या युवती आहेत.. जान्हवी हिने या आधी सलग ५ तास १ मिनिट १७ सेकंदा स्थिर राहून सिद्धासन आसन मध्ये पहिला विश्वविक्रम केला आहे..तसेच मार्च महिन्या मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून नऊवारी साडी मध्ये १ तास १९ मिनिटे ३४सेकंदामध्ये दहा हजार वेळा तितली क्रिया करून  दुसरा नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करत तो समस्त महिलांना समर्पित केला...नऊवारी साडी मध्ये योगविश्वात विश्वविक्रम करणार्या पहिल्या युवती आहेत... 

जान्हवी या गेली १४वर्षे योगसाधना करत असून त्या आयुष मिनिस्ट्री सर्टिफाईड योगा टिचर आहेत... इंटरनँशनल आणि काँर्पोरेट योगा ट्रेनर आहेत...त्याच बरोबर जान्हवी यांनी देशविदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्राविण्य मिळवले आहे....जान्हवी या मँराथाँन रनर हि आहेत...जान्हवी कि योगशाला याच्या त्या संस्थापक असून  सर्ववयोगटासाठी आँनलाईन पद्धतीने सध्या योगवर्ग घेत आहेत ..जान्हवी कि योगशाले मार्फत एप्रिल२०२० पासून आज पर्यंत कोरोना काळात सर्वांसाठी आणि कोरोना पेशेंट होम क्वाँरनटाईन ,आयसोलेट पेंशेट साठी मोफत योगा सेशन घेत असून याची दखल  लंडन बुक आँफ रेकाँर्डने घेतली असून लंडन बुक आँफ रेकाँर्डने कमिटमेंट सर्टिफिकेट देऊन गौरव केला आहे....

आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त सामाजिक संस्था,एनजिओ,डाँक्टर,पत्रकार,आरोग्यसेवक,नर्स,पोलिस विद्यार्थी आणि पालक अशा एक हजार लोकांना आँनलाईन मोफत योगा सेशन घेऊन योग दिवस साजरा केला...जान्हवी यांना द ग्लोबल आयकाँन आँफ इंडिया,महाराष्ट्र आदर्श युवती क्रिडा रत्न पुरस्कार,द प्राईड आँफ इंडिया,द बेस्ट योगा गुरु,महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार  तामिळनाडू योग असोसेशन तर्फे योगाचारिणी अवाँर्ड,इंटरनँशनल इंस्पिरेशन वुमन अवाँर्ड,निशान ए हिंद इंटरनँशनल अवाँर्ड,क्रिडा पुरस्कार ,कलाम्स स्पार्कलिंग डायमंड अवाँर्ड,आयुष मिनिस्ट्री Ycb  तर्फे प्लाटिनम टिचर अवाँर्ड, वुमन्स पाँवर अँंड वाँईस अवाँर्ड,अमृत संतान इंटरनँशनल अँवार्ड...अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे...अमेरिका,लंडन कँनडा येथील संस्थानी देखील त्यांचा गौरव केला आहे..त्याच बरोबर इतर हि विश्वविक्रमा मध्ये त्यांनी भाग घेतला असून हायरेंज बुक, इंटरनँशनल बुक मध्ये नोंद झाली आहे.....जान्हवी यांचे सर्व स्तरातून कौतक होत असून खा.श्री.छ.उदयनराजे भोसले,राजमाता आईसाहेब कल्पनाराजे भोसले,खा.श्रीनिवास पाटील..मा.नगराध्यक्षा रंजना रावत,नगरसेविका सौ.दिपाली गोडसे,श्री.राजू गोडसे,नगराध्यक्षा सौ.माधवी कदम,सौ.रचनाताई पाटील,सौ.चेतना सिन्हा,कराड नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे.,कृषी बाजार समितीचे सदस्य श्री राजेंद्र भिलारे, सर सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वशंज जयाजीराव मोहिते...रविंद्र झुटिंग, श्री.राजेंद्र चोरगे,श्री.वसंतशेठ जोशी,श्री.किशोर शिंदे,श्री.दत्ता बनगर,श्री.सुनिल काटकर,,श्री चंद्रशेखर घोरपडे,योगा बुकचे फाऊंँडर &सिईओ श्री राकेश  भारद्वाज,जिल्हा क्रिडा अधिकारी श्री.युवराज नाईक आणि आपला सातारा न्यूज ,आदी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या ...

 

Wednesday, September 15, 2021

पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणारडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारीमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तातडीने कार्यवाही


पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारी
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तातडीने कार्यवाही
मुंबई दिनांक १५: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेंव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सुचना केली होती त्यानुसार  उच्च व तंत्रशिक्षण विभागाने  यासंबंधीचा शासननिर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळाला आहे.

पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, संत संप्रदाय, संत साहित्य, किर्तन, प्रवचन, तत्वज्ञान आदी बाबींशी संबंधित प्रमाणपत्र,पदविका,पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यासाठी संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडे ५ वर्षांसाठी  किंवा पुढील आदेश होईलपर्यंत जे लवकर होईल त्या काळासाठी सोपवण्याचा निर्णय  काही अटींच्या अधीन राहून घेण्यात आला आहे.

*अभ्यासक्रमाविषयी...*
यानिर्णयानुसार विविध प्रमाणपत्र, पदविका,पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना आवश्यक त्या प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागेल. निरनिराळ्या संप्रदायांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास घटकांची निवड करून अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात येईल. संतपीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येक संप्रदायाच्या अभ्यासक्रमांना योग्य ते स्थान देण्यात येणार असून तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम चालवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आवश्यकतेनुसार तज्ज्ञ व्यक्तींची मानधन किंवा तासिका तत्वावर तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपात बाह्य स्त्रोतामार्फत करता येऊ शकेल. यासाठीचा खर्च विद्यापीठाला स्व निधीतून करावा लागणार असून  संतपीठाच्या जागेची तसेच इमारतीची मालकी शासनाकडेच राहील. फक्त शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी ही इमारत विद्यापीठाकडे सोपविण्यात आली आहे.

*संतपीठाविषयी...*
मराठवाडा विकासाच्या ४२ कलमी कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे संतपीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. या संतपीठाची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा १९५० नुसार करण्यात आली असून यासाठी ज्ञानेश्वर उद्यानानजीकची १७.८ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे.  संतपीठाच्या प्रशासकीय इमारत, वसतीगृह आणि वाचनालय इमारत बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली होती त्यानुसार संतपीठाची प्रशासकीय इमारत,दोन वसतीगृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.सुरुवातीला सांस्कृतिक कार्य विभागाकडे असलेला हा विषय नंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला होता.
...

Sunday, September 12, 2021

उमदीत ओढा पात्रात बुडून दोघी बहिणींचा मृत्यू लहान भाऊ बचावला


उमदीत ओढा पात्रात बुडून दोघी बहिणींचा मृत्यू लहान भाऊ बचावला
सांगली प्रतिनिधी 
उमेश पाटील 
          उमदी ता.जत येथे ओढा पात्रात पोहायला गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. कु.रेणुका शिवानंद ऐवळे (वय -७) व  कु.लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय-११) अशी दुर्दैवी बहिणींची नावे आहेत.  तर त्याच्या सोबतच पोहायला गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे (वय-६) हा बचावला गेला.

         अधिक माहिती अशी की, ऐवळे कुटुंबिय हे काही दिवसापासून उमदी गावात ओढ्यालगत असणाऱ्या आपल्या घरात रहात होते. तसेच मोलमजुरी करून ऐवळे कुटुंब घर चालवतात.. आज रविवारी सकाळी घरातील सर्व लोक दुसऱ्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. घरात दोन मुली व एक मुलगा यांना घरात सोडले होते. दुपारी आंघोळ करण्यासाठी दोन्ही बहीणी व एक भाऊ असे तिघे मिळुन वडापात्रात आंघोळी करण्यासाठी गेले . परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने रेणुका शिवानंद ऐवळे (वय-७) व लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय-१२) या दोन्ही सख्ख्या बहीणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचवेळी त्यांच्या सोबतच गेलेला लहान भाऊ  मायाप्पा शिवानंद ऐवळे (वय-६) याने दोन्ही बहीणीला पाण्यात बुडताना पाहून आरडाओरडा सुरू केला. 

   त्यावेळी ओढ्यालगत जनावरे राखणारा संभाजी माने व प्रकाश वाघमारे यांनी मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारून बाहेर काढले परंतु दुर्दैवाने मुलींचा मृत्यू झाला होता. तर लहान भाऊ मायप्पा यास वाचवण्यात यश आले. या घटनेने  उमदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Saturday, September 11, 2021

लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते तसेच साप्ताहिक पोलीस तपास महाराष्ट्र प्रमुख क्राईम रिपोटर ( चिफ ) श्री.गणेश शांतीलाल देशमुख (मनमाड जि.नाशिक ) यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करणेत आला


लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते तसेच साप्ताहिक पोलीस तपास महाराष्ट्र प्रमुख क्राईम रिपोटर ( चिफ ) श्री.गणेश शांतीलाल देशमुख (मनमाड जि.नाशिक ) यांचा कोरोना  योद्धा पुरस्काराने  सन्मान करणेत आला
नाशिक दि प्रतिनिधी :- 
लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते तसेच साप्ताहिक पोलीस तपास महाराष्ट्र प्रमुख क्राईम रिपोटर ( चिफ ) श्री.गणेश शांतीलाल देशमुख (मनमाड जि.नाशिक ) यांचा कोरोना  योद्धा पुरस्काराने  सन्मान करणेत आला
सन्मान निस्वार्थी समाजकार्याचा              सन्मान लिंगायत संघर्ष समिती नासिक जिल्ह्याचा  सन्मान साप्ताहिक पोलीस तपासचा
साप्ताहिक पोलीस तपासचे मालक व संपादक मा.श्री.राजु.ग.जाधव ( सर ) मुंबई व लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते तसेच साप्ताहिक पोलीस तपास महाराष्ट्र प्रमुख क्राईम रिपोटर ( चिफ ) श्री.गणेश शांतीलाल देशमुख (मनमाड जि.नाशिक ) यांचा कोरोना काळातील महामारीशी लढत असतांना.अशा कठीण परिस्थीतीत आपण आपल्या जिवाची पर्वा न करता,समाज व समाजातील सामान्य नागरीकांन साठी करत असलेले सेवा कार्य अतुलनिय आहे,आपल्या सेवेने सर्वांसमोर मानवतेचे एक नविन उदाहरण ठेवलेले आहे,कोरोना काळात आपण केलेल्या धैर्याला व उर्मिला आम्ही सलाम करतो,आणि आपले " कोरोना योध्दा सन्मान पञ " देऊन  स्टार वेल्फेअर फाऊडेशन ( डोबिवली पश्चिम जिल्हा ठाणे ) याचा पुरस्काराने सन्मानीत करत आहे, आपल्या हातुन नेहमीच असे समाजकार्य घडत राहो आणि उभा कठीण काळात आपणास व आपल्या परीवारास निरोगी तसेच उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा*     *शुभेच्छुक*  *लिंगायत संघर्ष समिती* *महाराष्ट्र, नासिक जिल्हा* *सर्व सदस्य व पदाधिकारी.*

विरभद्र विरशैव गणेश मंडळाची तिस वर्षांची परंपरा कायम


विरभद्र विरशैव गणेश मंडळाची तिस वर्षांची परंपरा कायम
खानापूर प्रतिनिधी: शिवकुमार कल्याणी लिंगायत TV live
 करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवावर मर्यादा आल्या असल्या तरी देगलूर तालुक्यातील, विरभद्र विरशैव गणेश सार्वजनिक मंडळांने भक्तीच्या वेगळ्या वाटा चोखाळत मागील तिस वर्षांची उत्सवाची परंपरा आणि मांगल्य कायम ठेवण्याच्या प्रयत्न केला आहे. सरकारी नियमांप्रमाणे लहान मूर्ती ठेवण्यात आली असून, देखावे, चलचित्र आदींना फाटा देण्यात आला आहे. मुखदर्शन तथा आरती प्रसाद साठी गर्दी होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाते आहे, येत्या सोमवारी गणेश मंडळातर्फे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन गावातील तथा खानापूर परिसरातील अधिकाधिक जनतेने या उपक्रमात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे, अवांतर सजावट व इतर खर्च टाळून समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मंडळाचे मार्गदर्शक व आयोजक निळकंठ पटणे, विनोद रायकोडे  यांनी सांगितलं आहे यामुळे खानापुरात यंदा गणेशोत्सवातून आरोग्य आणि समाजसेवेच्या माध्यमातून गणरायाच्या भक्तीचे सूर आळवले जाणार आहेत. या मंडळाची स्थापना ई.स १९९१ साली येथील मठाचे मठपती कै.बाबुअप्पा स्वामी व मंडळाचे प्रथम अध्यक्ष उमाकांत अटकळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली  होती व आज तिस वर्षापासुन ते अखंडित आहे,व सामाजिक बांधिलकी जपत असल्याचं दिसतं आहे.व या करिता मंडळाचे सर्वच कार्यकर्ते, संघटक, मार्गदर्शक मेहनत घेत आहेत..

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...