लिंगायत टि. व्ही .यवतमाळ चे प्रतिनिधी संकेत हरसुलकर यांना स्काऊट चा राष्ट्पती पुरस्कार .
.सातारा.. दि.११.; - प्रतींनिधी प्रा अजय शेटे
.लिंगायत टि. व्ही .यवतमाळ चे प्रतिनिधी श्री.संकेत ज्योती गजानन हरसुलकर यांना भारत स्काऊट & गाईड चा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.श्री. संकेत हे संघाचे संघनायक असून त्यांच्या बरोबर इतर तीन सदस्य होते..
..हा राष्ट्रीय पुरस्कार हा स्काऊट ची राष्ट्रीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्काऊटर ला दिला जातो.हा पुरस्कार प्राप्त करणे हे प्रत्येक स्काऊट र चे अंतिम ध्येय असते.हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी आधी राज्यस्तरीय परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.त्यानंतर हा राज्य पुरस्कार दिला जातो.हा पुरस्कार राज्य स्तरावरील सर्वोच्च सन्मान समजला जातो.
..संकेत यांची हि राष्ट्रपती पुरस्काराची परीक्षा नागार्जुन बेस कॅम्प ..रामटेक .. जि.नागपूर येथे झाली होती.त्यामध्ये एकूण चार जणांच्या संघातील तीन जण उत्तीर्ण झाले.
..त्यांना यासाठी स्काऊट मास्टर श्री. मान गावकर सर् यांचे खूप सहकार्य व मार्गदर्शन लाभले.या बद्दल त्यांना मा.राज्यपाल ..महाराष्ट्र राज्य यांच्या सहीचे प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे.लवकरच त्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या सहीचे प्रमाणपत्र प्राप्त होईल व ते राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे कार्यक्रमात ते प्रदान करण्यात येईल..
..श्री.संकेत गजानन हरसूल कर यांचे या यशाबद्दल त्यांचे भारत स्काऊट & गाईड संघटना पदाधिकारी.. शिक्षक..लिंगायत समाज संघटना व लिंगायत टि. व्ही.च्या सर्व चमू कडून हार्दिक अभिनंदन व भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा **
No comments:
Post a Comment