वडूज नगरपंचायत निवडणूक पुर्वीच विरोधकांचे राजकारण सुरू ,?????? विरोधकांकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या उमदेवार यादीवर आक्षेप
.. वडूज दि.15.प्रणाली वाकडे लिंगायत TV live प्रतिनिधी
. वडूज नगरपंचायत निवडणूक मध्ये दि.13 रोजीची उमेदवार अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख झाल्यानंतर राहिलेल्या उर्वरित उमेदवारांची यादी काही विरोधकांनी नगरपंचायत मधील कागद घेवून त्यावर पेन ने लेखी स्वरूपात लिहिली. व ती सोशल मीडिया वरून बेकायदा प्रकाशित केली जात आहे.
..यामध्ये प्रभाग क्र.7 मधील खुल्या पुरुष गटातील अपक्ष उमेदवार श्री.सुयोग विजय शेटे यांचे नाव हेतुपूर्वक पणे वगळून सदर यादी प्रकाशित करण्यात येवुन मतदारांची दिशाभूल करण्यात येत आहे..
..त्यावर बा श्री.सुयोग शेटे यांनी मा.निवडणूक अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करून दाद मागितली आहे.त्यावर तातडीने कार्यवाही करत सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री.अमित पंडित यांनी उत्तर देत लेखी स्वरूपा त सदर तक्रार पोलीस प्रशासन सायबर गुन्हे शाखा यांचेकडे दाखल करण्यासाठी रीतसर लेखी परवानगी पत्र दिले आहे.
.. सदर मतदार यादी साठी नगरपंचायतीच्या नावाचे कागद कसे प्राप्त झाले.शिवाय सदर अक्षर कोणाचे आहे. व सदर यादी कोणी प्रसिद्ध केली.याची कायदेशीर चौकशी होऊन संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.**
No comments:
Post a Comment