वडूज नगरपंचायत निवडणूक ओबीसी राजकीय आरक्षण निर्णय झाल्यावरच घ्यावी
वडूज नगरपंचायत निवडणूक ओबीसी राजकीय आरक्षण निर्णय झाल्यावरच घ्यावी
वडूज दि.9.. ..प्रा.अजय शेटे..
सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे 27 टक्के राजकीय आरक्षण अतिरिक्त होत आहे.या सबबीखाली ओबीसी प्रभागातील निवडणूक घेण्यास परवानगी नाकारली.यासाठी भारतीय जनता पार्टी .. वडूज व खटाव तालुक्याच्या वतीने मा.निवडणूक अधिकारी श्री. राम हरी भोसले साहेब व सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री.अमित पंडित साहेब यांना निवेदन देण्यात आले व ओबीसी राजकीय आरक्षण निश्चित झाल्याशिवाय वडूज नगर पंचायतीची निवडणूक घेण्यात येवू नये अशी मागणी करण्यात आली..त्याच बरोबर इतर अनेक मागण्या करण्यात आल्या .त्याच बरोबर दि.12 नोव्हेंबर रोजी अज्ञानातून जाहीर करण्यात आलेल्या वडूज नगरपंचायतीच्या पहिल्या आरक्षण सोडतीचा जाहीर निषेध करण्यात आला.
..शासन..प्रशासन व न्याय व्यवस्था यांच्या दृष्ट चक्रात ओबीसी समाजावर अन्याय होवू नये..
..केंद्र शासन व राज्य शासन आरक्षण हे सर्व जाती .. धर्मांना समान असावे..केंद्रात एक व राज्यात दुसऱ्या प्रवर्गा चे आरक्षण हि पद्धत बंद व्हावी..
..निवडणूक नियमानुसार उमेदवार हा कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा हे सूत्र असताना ज्यांनी मार्च 2021 मध्ये नगरपंचायती चा सर्व कर भरला आहे.ते उमेदवार डिसेंबर 2021च्या नगरपंचायत निवडणुकीवेळी कायद्याने थकबाकीदार ठरू शकत नसतानाही त्यांचा मार्च 2022 अखेर सर्व कर भरून घेतला जात आहे व हेतुपूर्वक पणे आर्थिक लूट केली जात आहे.. हि प्रथा बंद व्हावी.
..कोणत्याही पक्षाचा उमेदवारी अर्ज भरताना त्या प्रभागातील एक सूचक आवश्यक करण्यात आला आहे..परंतु अपक्ष उमदेवार म्हणून अर्ज भरताना 5 सूचक असावे असा नियम आहे.तो जाचक आहे.तेव्हा त्यासाठी फक्त 2 च सूचक ची अट ठेवण्यात येवुन अतिरिक्त 3 सदस्यांची अट रद्द करण्यात यावी..
..निवडणूक आयोग स्थानिक निवडणूक प्रक्रियेसाठी अतिशय कमी असा एक महिन्याचा कालावधी निश्चित करत आहे.तो वाढवून दिड महिन्याचा केला जावा .
..अधिकारी वर्गाने स्वतःच्या स्टाफ च्या माहिती बैठका घेताना सर्व विभागांच्या एकामागोमाग सलग घेवू नयेत.तर दोन बैठकी मध्ये अर्ध्या तासांचे अंतर ठेवून त्या अर्ध्या तासात बाहेर ताटकळत बसलेल्या ग्राहकांचे समस्या निराकार ण करावे..
..निवडणूक कार्यासाठी अंतर्गत प्रतिक्रिया राबविणारे अधिकारी अथवा शिक्षक हे स्थानिक पातळीवरील ओळखीचे नेमू नयेत तर ते बाहेरगावचे नेमले जावेत.
..सर्व धर्म व सर्व जातींची निवडणूक प्रक्रिया हि एकाच वेळी राबवली जावी..
..सदोष मतदार यादी पूर्णपणे निर्दोष झाल्यावरच निवडणूक प्रक्रिया राबवावी ..
..अशा विविध प्रकारच्या मागण्या यावेळी लेखी स्वरूपात करण्यात आल्या..
..या निवेदनावर ओबीसी सेल प्रमुख प्रा.संजय कुंभार..श्रीकांत बनसोडे काका.. इकबाल शेख..शिवशंकर चव्हाण..राहुल लोहार..साजित मुलाणी..प्रा.अजय शेटे यांची प्रतिनिधी म्हणून स्वाक्षरी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment