Thursday, December 9, 2021

सुजाता वाकडे यांचा सेवा गौरव पुरस्काराने सन्मान

सुजाता वाकडे यांचा सेवा गौरव पुरस्काराने सन्मान
कोरेगाव दी 9 प्रतींनिधी : कोरेगाव शहरातील आदर्श कॉलनी येथील अंगणवाडी क्रमांक ३३३ च्या उपक्रमशील अंगणवाडी सेविका सौ. सुजाता संतोष वाकडे यांच्या उत्कृष्ठ शिक्षण सेवेचा सातारा येथील भक्ती रिसर्च सेंटरच्या वतीने सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. माजी पोलीस अधिकारी सौ. राधा चंद्रकांत महामुनी यांच्या हस्ते शाल व सन्मानपत्र देवून हा गौरव करण्यात आला. यावेळी साप्ताहीक धनसंतोषच्या संपादिका सौ. विमलताई नलावडे, भाऊसाहेब नलावडे, भक्ती रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. अशोक पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी श्रीमती कुसुमताई मोहिते व संतोष वाकडे यांची विशेष उपस्थिती होती. सौ. सुजाता वाकडे यांनी अंगणवाडीच्या माध्यमातून केलेल्या सेवेचा आजवर अनेक पुरस्कारानी सन्मान झाला असून कोरेगाव तालुक्यातील एक आदर्श व उपक्रमशील अंगणवाडी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे, शिक्षणाचा पाया भक्कम करत असताना मुलांवर चांगले संस्कार करत दर्जेदार उपक्रम आजवर त्यांनी राबविले आहेत, शासनाचे अनेक प्रबोधन कार्यक्रमही त्यांनी राबविले आहेत, संपूर्ण कोरोना काळातही त्यांनी आरोग्य जागृतीचे प्रभावी कार्य केले आहे. क्रांती महिला मंडळ, संस्कृती ग्रुप, सोनेरी सखी मंच या माध्यमातूनही त्या अनेक सामाजिक उपक्रमात कार्यरत आहेत, त्यांच्या या सेवाभावी कार्याचा भक्ती सेंटरच्या वतीने सन्मान करण्यात आला असून या सन्मानाने त्यांना अधिक उत्तमरित्या काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले, शिवाय शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा त्यांचे पती संतोष वाकडे यांच्या मुळेच मिळाल्याचं त्यानी आवर्जुन सांगितलं. यापुढेही कायम उत्कृष्ट कार्य करत राहणार असल्याचे सांगून त्यांनी या सन्माना बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सौ. सुजाता वाकडे यांना मिळालेल्या या गौरवाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...