Wednesday, June 28, 2023
वडिलोपार्जित व्यवसाय सोडून सुरू केली स्वतःची कंपनी आज आहेत 5 हजार वाहनांचे मालक.
Wednesday, June 21, 2023
लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्रच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पत्रकार आत्मलिंग शेटे यांची नियुक्ती.
Sunday, June 11, 2023
वीरशैव लिंगायत समाज , कोल्हापूरच्या वतीने स्नेह मेळावा उस्थाहात संपन्न,
Tuesday, June 6, 2023
हैदराबाद येथील लिंगायत महामोर्चात लाखो समाज बांधव मागण्यासाठी रस्त्यावर. भारत देशा जय बसवेशा या घोषणाने शहर दुमदुमले ,
हैदराबाद येथील लिंगायत महामोर्चात लाखो समाज बांधव मागण्यासाठी रस्त्यावर.भारत देशा जय बसवेशा या घोषणाने शहर दुमदुमले ,
हैदराबाद येथील लिंगायत महामोर्चात लाखो समाज बांधव मागण्यासाठी रस्त्यावर.भारत देशा जय बसवेशा या घोषणाने शहर दुमदुमले ,
सातारा दि. ४ जून
लिंगायत धर्माला स्वतंत्र संवैधानिक मान्यता, अल्पसंख्यक दर्जा, विविध राज्यात ओबीसी आरक्षण या प्रमुख मागण्यासाठी लिंगायत महामोर्चा आयोजित केली होती. तेलंगणा राज्यातील पहिली महारैली अभूतपूर्व यशस्वी झाली. बीदर पासून मुंबई महामोर्चा पर्यंत २३ महामोर्चा कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या. २४वी हैद्राबाद महामोर्चा तेलंगाना राज्यात असल्यामुळे कन्नड,मराठी आणि तेलगू माध्यमाचा सर्रास वापर झाला.
महामोर्चाची सुरवात जगद्गुरु चन्नबसवण्णा स्वामीजी बंगळुरू यांचे हस्ते प्रथम महात्मा बसवण्णा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली.नंतर धर्म ध्वजारोहण करण्यात आले. बसव धर्मपिठाच्या द्वितीय महिला जगद्गुरु गंगा माताजी यांनी दीपप्रज्वलन केले.याप्रसंगी जगद्गुरु बसवलिंग पटदेवरू भालकी, जगद्गुरु हुलसुर आप्पाजी, माता गंगाबिका, परमपूज्य बसव प्रभू महास्वामी, जगद्गुरु सिद्धरामेश्वर महास्वामीजी बसवकल्याण आदी सह कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध मठाधीश तसेच हैदराबाद महामोर्चा चे संयोजक शंकर पटेल, लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर,राज्य समन्वयक विजयकुमार हत्तुरे, राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष बसवराज धनुर, श्रीकांत स्वामी, लिंगायत धर्म महासभेचे बी एस पाटील, सांगलीचे प्रदीप वाले, लातूरचे सुनील हेंगणे, वर्ध्याचे कैलास वाघमारे,जतचे तुकाराम माळी, बसव ब्रिगेडचे सिद्धेश्वर औरादे,बसवेश्वर हेंगणे, चन्नम्मा ब्रिगेडचे अध्यक्ष शितल महाजन,नांदेडचे पिंटू बोंबले,कुराडे,सोलापूरचे राधाकृष्ण पाटील, नागेश पडनुरे,आदी उपस्थित होते
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे विश्वगुरू बसवण्णां यांचे अनुयायी असून ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अधिकार पदी आल्याबरोबर त्यांनी कर्नाटक राज्यातील सरकारी कार्यालयात विश्वगुरू बसवण्णा यांचे फोटो लावण्याचे आदेश काढून अमलबजावणी केली. आणि लिंगायत धर्माला केंद्र सरकारकडून स्वतंत्र संवैधानिक मान्यता मिळण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. त्या आयोगाने सखोल संदर्भांचा अभ्यास करून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याची शिफारस कर्नाटक राज्य सरकारला केली. कर्नाटक राज्य सरकारने ती शिफारस राज्याचे मंत्री मंडळ बैठकीत मंजूर करुन केंद सरकारला लिंगायत धर्माला त्वरीत स्वतंत्र संवैधानिक मान्यता द्यावी म्हणून शिफारस केली. त्याचप्रमाणे तेलंगणा सरकारचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्य मंत्रिमंडळात सर्व मागण्या मान्य करून तात्काळ केंद्राकडे शिफारस करावे अशी मागणी जगद्गुरु चेन्नबसवानंद महास्वामीजी यांनी केले आहे.
या महामोर्चास केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा माजी केंद्रीय मंत्री, किशन रेड्डी खासदार जनार्दन रेड्डी, आमदार ती राजा सिंग, तेलंगणा कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी माणिकराव ठाकरे आधी सह आजी-माजी खासदार यांनी भेट दिली. मोर्चा यशस्वी करण्यासाठी तेलंगणा लिंगायत समन्वय समितीचे श्री मधु,श्री विजयकुमार पटणे,भीमराव बिरादार आदी सह विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेतले.
Saturday, June 3, 2023
वीरशैव इंटरनॅशनल (व्हाया) लिंगायत प्रिमीयर लीग महाराष्ट्र 2023 मोठ्या उत्साहात संपन्न . उद्घाटन ते बक्षिस वितरण सोहळ्याची सर्व नेत्रदिपक क्षणचित्रे .
वीरशैव इंटरनॅशनल (व्हाया) लिंगायत प्रिमीयर लीग महाराष्ट्र 2023 मोठ्या उत्साहात संपन्न .
उद्घाटन ते बक्षिस वितरण सोहळ्याची सर्व नेत्रदिपक क्षणचित्रे .
वीरशैव इंटरनॅशनल (व्हाया) लिंगायत प्रिमीयर लीग महाराष्ट्र 2023 मोठ्या उत्साहात संपन्न .
उद्घाटन ते बक्षिस वितरण सोहळ्याची सर्व नेत्रदिपक क्षणचित्रे .
सातारा, दि.3 -
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (व्हाया) व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र आयोजित व व्हाया चे अध्यक्ष लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे, लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे अध्यक्ष सुनीलशेठ रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय व्हाया लिंगायत प्रिमीयर लीग या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रातून सुमारे 20 जिल्ह्याच्या 12 टिमने आपला सहभाग नोंदविला,
या लिगच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना नेते मा .खा .चंद्रकांतजी खैरे साहेब,मा. आ. राहूलजी बोंन्द्रे , राजाभाऊ आबा मुंडे, शिवाजी अप्पा कपाळे, रवींद्रजी कानडे, ओंकार खुरपे, गणेशजी भोरे, तसेच नगर, नासिक, संभाजीनगर, धाराशिव, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, मुंबई, लातूर, कोकण, सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते .
ऐतिहासिक व अतिशय उत्साहवर्धक झालेल्या या स्पर्धेत सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट सांघिक खेळ केला .त्याबद्दल सर्वांचेच हार्दिक अभिनंदन होत आहे.या सामन्या मध्ये कोकण संघाने विजेतेपद ,एक लाख रुपये बक्षीस व विश्वेश्वर चषक जिंकला तर सोलापूर संघाने उपविजेेते पद पटकावून 50 हजार रुपये चे बक्षिस मिळविले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व्हाया लिंगायत प्रिमीयर लिग महाराष्ट्र चे अध्यक्ष, व्हाया युथवींग अध्यक्ष मा.प्रदिपजी साखरे, लिंगायत संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. चंद्रशेखर दंदणे,
भगवान कोठावळे, सौरभ दंदणे, क्रीडा संघटक नितीनजी हिंगमिरे, समता इंटरनॅशनल स्कूलचा सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
लिंगायत समाजाच्या क्रिकेटच्या इतिहासात एक नव्या पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.असेच यावेळी सर्व मान्यवर व खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले.
Tuesday, May 30, 2023
पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर ,विशेष लेख - प्रा.अजय शेटे.
पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर ,विशेष लेख - प्रा.अजय शेटे.
मा.विनयजी कोरे साहेब यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन
मा.विनयजी कोरे साहेब यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन
मा.विनयजी कोरे साहेब यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन
कराड , दि.30 - रविंद्र वाकडे
लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी जगदज्योती म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात सिंहाचा वाटा असणारे महाराष्ट्र राज्याचे विकासाभिमुख नेतृत्व , माजी मंत्री तथा आमदार मा.विनयजी कोरे ( सावकर) साहेब यांचा तमाम लिंगायत समाजाच्या वतीने बुधवार दि.31 मे 2023 रोजी , सायं.5 वा.हुतात्मा स्मृती मंदिर पार्क चौक,सोलापूर येथे भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बसव ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अविनाश भोसीकर ( भाऊ ),प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणाचे लिंगायत नेते मा. पी.संगमेश्वर, मा. वेण्णा ईश्र्वराप्पा हे लाभणार आहेत.
तसेच मा. राज्यमंत्री व आ.विजयकुमारजी देशमुख, मा. आ.प्रणितीताई शिंदे,जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ चे चेअरमन मा.शिवाजी सावंत साहेब, जि. प.सदस्य मा.अमरजी पाटील, छत्रपती फाऊंडेशनचे मा.संतोषभाऊ पवार, युवा नेत्या मा.शितलताई म्हेत्रे, मा. स्वागताध्यक्ष खलीलभाई शेख,मा.डीपीडीसी सदस्य जुबेर बागवान, एम.के.फाऊंडेशनचे मा.महादेवजी कोगणुरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष बसव ब्रिगेड प.महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.संतोषजी वायचळ,निमंत्रक बसवब्रिगेड सोलापूर शहर अध्यक्ष मा.अमित राजशेखर रोडगे हे असून ,सदर कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहून या सोनेरी क्षणाचे साक्षीदार व्हावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम अ...
-
महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,दि. 18 रोजी बसव भूषण पुरस्कार 2024 चे वितरण. सातारा, दि.16 - रविंद्र वाकडे महात...









