Monday, April 10, 2023

लिंगायत धर्म संस्थापक , क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

   लिंगायत धर्म संस्थापक , क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर  





लिंगायत धर्म संस्थापक , क्रांतिसूर्य  महात्मा बसवेश्वर 

                         

                 

सातारा, दि.21 -रविंद्र वाकडे 

 शनिवार दि.22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया ,शिवजयंती,परशुराम जयंती,रमजान ईद व वसुंधरा दिन या पार्श्भूमीवर म.बसवेश्वर जयंती यांची 918 वी जयंती संपूर्ण भारतभर तसेच परदेशात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.या निमित्त म.बसवेश्वर यांचे महान जीवनकार्य पाहणे  अमूल्य मोलाचे ठरते.

प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेताना म.बसवेश्वर यांचे कार्य त्या वेळच्या व आजच्या पण वेळी किती महान आहे.हे आपणास दिसून येते.

प्राचीन काळापासून ' लिंगायत ' हा एक स्वतंत्र धर्म असून तो कोणताही धर्म,जात व पंथाची पोट शाखा नाही.हे आपणास सप्रमाण दिसून येते.स्वतंत्र असण्याची जी सर्व लक्षणे असतात ती सर्व लक्षणे या धर्माबाबतही दिसून येतात.या धर्माचे आराध्य दैवत श्री शिवशंकर/ महादेव हे असून सृष्टीच्या ' उत्पती - स्थिती - लय ' या सर्व क्रियांचे ते कारक आहेत.वीरशैव लिंगायत धर्माची शक्तिपीठे संपूर्ण भारतभर व परदेशात पण  फार पूर्वीपासून असल्याची दिसून येतात.या मठ पिठातील वेदशास्त्र अभ्यासपूर्ण  मठाधिश /मठाधिपती  गुरु शिष्य परंपरा फार पूर्वीपासून प्रचलित आहे.या धर्माचा स्वतंत्र असा विजय ध्वज / विजय पताका फार पूर्वीपासून प्रचलित आहे.

इ. स.12 शतकाच्या पूर्वार्धात सन 1105 मध्ये कर्नाटक राज्यातील विजापूर जवळील इंगळेश्वर बागेवाडी येथे एका  शैव कर्म उपासक कुटुंबात वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेला म.बसवेश्वर यांचा  जन्म झाला.त्यांच्या वडिलांचे नाव मादिराज व आईचे नाव मदलांबिका असे होते.थोरल्या बहिणीचे नाव नागंबिका व भावाचे नाव देवराज असे होते.

       वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या कुटूंब कर्मात त्यांचा उपनयन संस्कार करण्याचे ठरले.त्यावेळी त्यांच्या पेक्षा थोरली बहीण असलेल्या नागक्का हिचा उपनयन संस्कार झाला नाही आणि आधी आपलाच तो का केला जात आहे ? असा प्रश्न त्यांनी विद्वान शास्त्री पंडीत यांना विचारला असता ती स्त्री असून,तिला शूद्र स्थान आहे.असे शास्त्रकारांनी त्यांना सांगितले असता.समाधान कारक उत्तर न मिळाल्यामुळे व स्त्री ला समान दर्जाचे मानले जात नसल्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या ही उपनयन संस्कारास विरोध करून तो टाळला.त्यांच्या मते प्रचलित समाजात आदिमाया स्त्रीला शूद्र स्थान असून तिला जर सर्व बाबतीत उपेक्षित ठेवली जात असेल तर तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पुरुषांना उच्च कसे समजायचे ? हा विरोधाभास सहन न झाले मुळे व आपल्या क्रांतिकारक विचारांमुळे कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग केला व ते पशुपात शैव ज्ञान भांडार असलेल्या कृष्णा व मल प्रभा नद्यांच्या संगमावर वसलेल्या व ईशान्य मुनींनी स्थापन केलेल्या ' कुडल संगम ' या तीर्थ क्षेत्री येवून राहिले.तेथून पुढे त्यांनी वेदशास्त्र , तत्वज्ञान व भाषा अभ्यास  सुरू केला.

   वयाच्या बाराव्या वर्षा पर्यंत सलग पाच वर्षे वेदाभ्यास केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मंगळवेढ्याच्या बिज्जळ राजाच्या पदरी असलेले त्यांचे मामा बलदेव यांनी त्यांचे लग्न आपली मुलगी गंगाबिका हिच्याशी लावून दिले . म.बसवेश्वर यांची विद्वत्ता पाहून राजाने त्यांना कारकून म्हणून राजकारभार करण्यास नेमले.पण  आपल्या अंगभूत विद्वत्तेमुळे अल्पावधीतच त्यांनी राज्याच्या प्रधान पदापर्यंत मजल मारली.

तेथे त्यांनी सलग एकतीस वर्षे महान असे कार्य केले. व ' कल्याण ' ला राज्याची राजधानी बनवली.

येथेच त्यांनी आपल्या जीवनातील महान कार्य असलेली शरण चळवळ सुरू केली .त्या चळवळीत अग्रज ते अंत्यज अशा सर्व घटकांना त्यांनी सामील करून घेतले.स्त्री पुरुष समानतेचे तत्व अंगिकारून पुरुषांना ' शरण ' व स्त्रियांना ' शरणी ' असे संबोधून धर्म कार्यात सहभागी करून घेतले.याच शरण चळवळीचे पुढे त्यांनी विश्वव्यापक अशा  लिंगायत धर्मात रूपांतर केले.त्यामुळे सर्वांच्यात समान पातळीवर ' रोजी - रोटी - बेटी ' व्यवहार सुरू झाला.समता,समानता,सरलता, बंधुत्व ,जातीभेद,लिंगभेद  निर्मूलन, निर्मोही,निजमुक्त,

' कायक वें कैलास '( कष्ट करून जगणे व श्रमाने अर्थप्राप्ती करणे )  अनुसरून   ' दासोह ' ( जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा अंगीकार करणे ) करणारी  ,विवेकवादी व सारासार विचारसरणी जागृत करणारी चर्चा घडवून प्रत्यक्ष अनुभव घेणारी शरण - शरणींची एक मोठी संघटनाच त्यांनी उभी केली.तिलाच त्यांनी ' अनुभव मंटप ' असे नाव दिले.

' अनुभव मंडप ' सारख्या संघटनेची स्थापना करून त्यांनी क्रौर्य व चौर्य विरोधी विचार प्रणाली रुजवली.त्यामुळे अनेक चोर, लुटारू आपला वाईट मार्ग सोडून शरण आले व अनुंभव मंडप मध्ये सामील झाले.दारू विकणारा म्हाऱय्या आपले वाईट कर्म सोडून वाटसरू यात्रिकांसाठी दूध, ताक,पाणी पुरवू लागला. कायक वे कैलास मुळे श्रम प्रतिष्ठेला महत्त्व प्राप्त झाले. भीक,भिक्षा अथवा विना कर्म फुकट खाणे बंद होऊन श्रम संस्कार रुजले गेले.अनुभव मंडपात जी वचने लिहिली गेली तीच पुढे भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे व स्वातंत्र्य,समता व बंधुता अंगीकार करणारी जीवन मूल्ये ठरली गेली  सदाचारी आचरण करताना कोणाची चोरी,असंग, राग,तिरस्कार, हत्या, खुश मस्करी,परनिंदा नको . अशी वर्तणूक जपली तरच कुडल संगमेश्वर देव प्रसन्न होऊन कृपादृष्टी ठेवेल अशी समाज धारणा तयार झाली. 

म. बसवेश्वर जातीभेद निर्मूलन अनुभव देण्यासाठी  स्वतः हरळय्या शरण -  कल्याणीम्मा शरणींच्या घरी  ' दासोह ' ( कष्ट केल्यानंतर चे पोटाचे यज्ञकर्म अर्थात गरजेपुरते आवश्यक  जेवण )  करण्यासाठी गेले असता  ,अन्न दात्याना त्यांनी ' शरणू - शरणार्थी ' म्हणून दोन्ही हात जोडून नमस्कार केला.तेव्हा या दांपत्याने म.बसवेश्वर यांच्या नमस्कारा मधून उतराई होण्यासाठी पती पत्नीने चर्चा करून हरळय्या यांनी डाव्या व कल्याणीम्मा यांनी आपल्या उजव्या मांडीवर कातडे  कमावून व वळून वळून  त्यापासून सुंदर सुबक असे  डाव्या व उजव्या पायांचे  जोडे तयार केले . संपूर्ण जोडे तयार होई पर्यंत त्यांनी त्या जोड्याना जमिनीचा स्पर्श होवून दिला नाही . त्यात दोघांच्याही मांडीचे कातडे पार सोलवटून निघाले . व त्यांना खूप जीवघेण्या यातना सोसाव्या लागल्या पण गुरु प्रेमासाठी त्यांनी त्या  सो स ल्या. मग  जोडे तयार झाल्यावर त्यांनी  ते म.बसवेश्वर यांना भेट दिले.ते जोडे पाहिल्यानंतर  व त्या मागची कथा ऐकल्या नंतर  म.बसवेश्वर म्हणाले की,हे जोडे कोणत्या पशू पक्षांच्या कातडी पासून बनलेले नसून ते माझ्या शरण शरणीच्या कातडीचे बनलेले आहेत. हे मला माझ्या प्राणा हूनही प्रिय राहतील. असे म्हणून त्यांनी ते जोडे हातात घेवून नमस्कार केला व दोघांना साश्रू पूर्ण नयनांनी हृदयाशी कवटाळ ले. गुरुशिष्य यांचे एकमेका प्रती असलेले महान प्रेम यातून दिसून येते.

म.बसवेश्वर यांच्या या महान कार्यामुळे माझ्यापेक्षा कोणी लहान नाही आणि कुडल संगमेश्वर देवा पेक्षा कोणी महान नाही.ह संदेश सर्वत्र पसरला गेला.त्यामुळे शिवभक्त करलय्या ,शरणय्या,हरळ य्या ,व्यंकय्या, चेन्नय्या, शरण आदय्या, अबीर चांद य्या, घटी वाळ य्या ,माचीदेव माचय्या,बहुरूपी चौंड य्या,बुरुड केतय्या,विदर्भ ढोरकय्या,सोलापूरचे सिद्ध रामेश्वर, मडी याळ माचय्या ,काश्मीर चे महादेव ,अफगाणिस्तानचे मंगरूळ शंकरदेव,महाराष्ट्राचे ओरी लिंगदेव , अक्कमहादेवी   असे अनेक मानवतावादी शरण शरणी म.बसवेश्वर यांचे शिष्य बनले 

म.बसवेश्वर यांनी ' अनुभव मंडप ' ची स्थापना करून ते श्री अल्लंम प्रभू यांच्या अधिपत्याखाली चालविले.यात एकूण 700 शरण व 70 शरणी असे एकूण 770 साधक सामील झाले. व वेद शास्त्र व धर्म कार्यात स्त्री पुरुष समानता निर्माण झाली . यात निर्वस्त्र अशी व केवळ आपल्या केश संभाराचेच  वस्त्र  निर्माण करून तेच  परिधान करणारी, महान अशी शरणी अक्कंमा म्हणजे शुचिर्भूत दिगंबर साधनेचे मानाचे पान  ठरली.  अन्यायी राजा कौशिक याने  तिच्या स्त्री सुलभ  लज्जेला  अपमानित केल्यामुळे  तिने आपल्या साधनेच्या जोरावर फक्त श्री चेन्न मल्लिकार्जुन देवालाच आपले पती मानले . व सोलापूरचे सिद्ध रामेश्वर तिच्या सर्व देव व अध्यात्म कार्यात मदत करत असत म्हणून त्यांना आपला मुलगा मानले होते. म.बसवेश्वर आणि श्री अल्लम प्रभू यांच्या मुळे तिला 'अक्का ' म्हणजेच सर्वांची थोरली बहीण असा मान मिळाला .तिचे क्रांतिकारी वर्तन व प्रगत विचार यामुळे तिने अनुभव मंडपला वेगळ्या वैचारिक व तात्विक उंचीवर नेवून ठेवले.स्त्री म्हणजे ती नुसती स्त्री नसून ती मोह आहे .पण त्याची पेक्षा ती  ' माया '  आहे.माया म्हणजे हृदयाच्या अंतरहृदयातील अप्रतिम कलाकृती.तीच गुप्त मनाची सुप्त जाणीव जागृती असते.असे तिने आपल्या वाचनात निक्षूण  सांगितले आहे.तेव्हा अनुभव मंडप च्या कार्यात  ती स्वतः 70 शरणींचा आदर्श  ठरली. तिचे हे स्त्रीत्वा चे तत्वज्ञान त्या वेळच्या आणि आजच्या काळाच्या कितीतरी पुढे असे प्रगत आहे. एकापेक्षा एक सरस शरण शरणी अनुभव मंडप ने वेदशास्त्र व धर्म अभ्यासाला तयार केल्या.

अशा प्रकारे म.बसवेश्वर यांचे कार्य हे क्रांति प्रवन ठरले. ई.स.1167 ला नागपंचमी न च्या दिवशी म.बसवेश्वर नावाचा मानवतेचा पुजारी ,क्रांतिसूर्य शिवैक्य / लिंगैक्य झाला.श्री अल्लं म प्रभू यांनी शरण चळवळ व अनुभव मंडप यांचे वर्णन करताना लिहिले आहे की,'  कल्याण पूर झाले पणती,त्यात तेल ही भक्ती,आचाराची वळली वाती,अनुभव वचन प्रकाश,बसव ज्योती दिव्य तेज, स्थळ भक्ती सदन, भारत देश परंपरा महान,या श्री घृष्णेश्वर लिंगाचे  मज अर्चन ,त्यात झाले मज  श्री बसव दर्शन ,श्री बसव दर्शन '.अशा या म.बसवेश्वर यांच्या लिंगायत धर्म कार्यास  म. बसवेश्वर जयंती निमित्त सर्वांना वीरशैव लिंगायत समाज संघटनेच्या वतीने बसवमय हार्दिक शुभेच्छा..हार्दिक शुभेच्छा. शरणू शरणार्थी !श्री बसवेश्वर महाराज की जय,ओम नमः शिवाय!


महात्मा बसवेश्वर महाराज यांचा आश्वारुढ पुतळा “जैसे थे” ठेवावे, हटवू नये... ! -सकल लिंगायत समाज महात्मा बसवेश्वर अश्वारूढ पुतळा बचाव आंदोलकांची मागणी..

  महात्मा बसवेश्वर महाराज यांचा आश्वारुढ पुतळा “जैसे थे” ठेवावे, हटवू नये... ! -सकल लिंगायत समाज महात्मा बसवेश्वर अश्वारूढ पुतळा बचाव आंदोलकांची मागणी..

                   


 महात्मा बसवेश्वर महाराज यांचा आश्वारुढ पुतळा “जैसे थे” ठेवावे, हटवू नये... ! -सकल लिंगायत समाज महात्मा बसवेश्वर अश्वारूढ पुतळा बचाव आंदोलकांची मागणी..या साठी लातूर आणि परिसरातील सर्व लिंगायत संमाज एक झाला असून महात्मा बसवेश्वर महाराज यांचा आश्वारुढ पुतळा “जैसे थे” ठेवावे, हटवू नये...  वेळ प्रसंगी तीव्र आंदोलन  झेडण्याचा इशारा   ये वेळी देण्यात  आला .




सातारा  दि १० :-रविंद्र वाकडे 

 महात्मा बसवेश्वर महाराज यांचा आश्वारुढ पुतळा “जैसे थे” ठेवावे, हटवू नये... ! -सकल लिंगायत समाज महात्मा बसवेश्वर अश्वारूढ पुतळा बचाव आंदोलकांची मागणी..या साठी लातूर आणि परिसरातील सर्व लिंगायत संमाज एक झाला असून महात्मा बसवेश्वर महाराज यांचा आश्वारुढ पुतळा “जैसे थे” ठेवावे, हटवू नये...  वेळ प्रसंगी तीव्र आंदोलन  झेडण्याचा इशारा   ये वेळी देण्यात  आला .

 रत्नागिरी-सोलापूर-नागपूर एन एच ३६१ राष्ट्रीय महामार्ग हा  लातूर शहरातून जात आहे. या मार्गांवर लातूर शहरात महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे. हा पुतळा रस्ते विकास महामार्ग कामाच्या नावाखाली काढू नये, “जैसे थे” जशाच तसे, where is, As is “ ठेवावे. या मागणीचे निवेदन सकल लिंगायत समाज महात्मा बसवेश्वर पुतळा बचाव आंदोलन लातूर च्या वतीने जिल्हाधिकारी यांना आज सोमवार १० एप्रिल २०२३ रोजी दिले.


       

या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले की हा महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा स्थलांतरीत करणे बाबतचा निर्णय हा समाजाला विश्वासात घेऊन व बैठक घेवून घेऊ , या बाबत बैठक कधी होईल याची वर्तमानपत्रात  तारीख जाहीर करू असे आश्वासन दिले. 

या वेळी लिंगायत समाजाचे जेष्ठ बसवंतप्पा भरडे,  प्रा सुदर्शन बिराजदार, माजी महापौर स्मिता खानापूरे, माजी उपमहापौर चंद्रकांत बिरादार, नितीन मोहनाळे, नगरसेविका पुजा पंचाक्षरी, नगरसेविका भाग्यश्री कौळखेरे, राजकुमार नाईकवाडे, प्रा. संगमेश्वर पानगावे, अँड. निलेश करमुडी, विश्वनाथ खोबरे, कावेरी विभूते, चंद्रशेखर कत्ते, मुन्ना राचट्टे, नागेश कलसे,  अँड सचिन हुरदळे, बालाजी पिंपळे, बसवेश्वर हालकुडे, प्रकाश कोरे , मनोज राघो, लक्ष्मण मुकडे , शिवहार वाडकर, संजय महाजन, संकेत उटगे, ओम धरणे, डॉ अरविंद भातांबरे, सोनू डगवाले, प्रकाश कोरे, वैजनाथ जट्टे आप्पा, रोहित चवळे, लिंगेश्वर बिरादार, नरेश पेद्दे, संजय बावगे, दिनेश लोखंडे, शंकर वाघमारे पाटील, कल्याण औरादे, दिपक अजनसोंडकर, शिव राजमाने, विरभद्र कामठाणे, गजानन यादव, अमर आळंगे, सिध्देश्वर पटणे, सचिन सलगरे, निखिल मळगे, बालाजी कामजवळगे, शरणाप्पा आंबुलगे, संगमेश्वर रासुरे, बसवेश्वर रेकुळगे, बसवेश्वर हेंगणे, शिवहार वाडकर, मल्लिकार्जून सोमपुरा,  सुरज विभूते, सदाशिव हसनाबादे, राहूल जवळे, वामन अंकुश, इत्यादी समस्त लिंगायत बांधव व विविध संघटनाचे प्रमुख व बसव प्रेमी बसव भक्त उपस्थित होते.

Wednesday, April 5, 2023

उंब्रज तालुका कराड येथील लिंगायत समाजातील पत्रकार रविंद्र वाकडे यांना केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान .

 उंब्रज तालुका कराड येथील लिंगायत समाजातील  पत्रकार  रविंद्र वाकडे यांना  केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान .





उंब्रज तालुका कराड येथील लिंगायत समाजातील  पत्रकार  रविंद्र वाकडे यांना  केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान .




कराड , दि.27 - दिलीप महाजन 

 केंद्र शासनाची शाखा असलेल्या ,भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा सन 2023 सालाचा उल्लेखनीय सामाजिक कार्य पुरस्कार उंब्रज , ता.कराड  जि.सातारा येथील रहिवासी रविंद्र वाकडे यांना नुकताच प्रदान करण्यात आला . शाल,श्रीफळ, मानाचा फेटा,सन्मान चिन्ह, पदक ,प्रशस्तीपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

रविवार दि.26 रोजी  सौभाग्य मंगल कार्यालय,,उंब्रज येथे दुपारी 11 ते 3 या वेळेत झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना भारतीय मजदूर सेवा संघाच्या पुणे मंडलच्या अध्यक्षा श्रीमती मिनाक्षीताई पोळ,संघाचे राष्ट्रीय ऑर्गनायझिंग सेक्रेटरी मा. शैलेश कुमार गौतम , गव्हर्निंग बॉडी महाराष्ट्र अध्यक्ष शांती कुमार बोडके,प्रदेशाध्यक्ष बनसोडे सर्,सातारा जिल्हा महासचिव गोरख खाडे,जिल्हा अँक्शन कमिटी अध्यक्ष योगेश पोळ,दिशा केंद्रीय समिती सदस्या संगीता साळुंके,, छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सुनंदा देसाई या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.



भारतीय मजदूर संघाच्या वतीने संपूर्ण देशात विविध उपक्रम राबविले जातात. मजदूर लोकांसाठी सामाजिक,आर्थिक व कौटुंबिक विकासाचे अनेक उपक्रम राबवले जातात.त्यासाठी समाजातील तडफदार  व उल्लेखनीय काम करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांच्या कार्याची यथोचित दखल हा संघ घेत असतो.त्यामुळेच अशा व्यक्ती या संघाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरतात.

या पुरस्काराबद्दल रविंद्र वाकडे म्हणाले की,समाजात कार्य करताना चांगले काम करत रहायचे व अन लगेच सोयीस्कर रित्या विसरून जायचे,फळाची अपेक्षा ठेवायची नाही.रोज चांगले पेरत रहायचे.किती उगवल याचा विचार करायचा नाही.समक्ष चांगले काम होत असताना सुद्धा लोक त्याकडे डोळेझाक करतात.कौतुकाचे चार शब्द पण बोलत नाहीत. अशी जळकट विचारांची कंजस माणसे  पावलोपावली आढळतात. समाजात अमाप पैसा असलेली अनेक  गरीब दरिद्री माणसे आपण  पाहिली आहेत.पण भारतीय मजदूर संघ  या संघटनेने व त्यांच्या समतुल्य संघटनाच्या  पदाधिकाऱ्यांनी माझ्या सामाजिक कार्याची दखल घेवून , माझे कौतुक करून  मला खरोखर आणखी चांगल्या कार्यासाठी प्रेरणा दिली आहे.ती कायम स्मरणात राहील. एवढी महान  विचारांची श्रीमंती या संघटनेत आढळली.त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.

कार्यक्रमाला संघटनेचे संपूर्ण भारत व महाराष्ट्र राज्यातील अनेक पदाधिकारी स्त्री - पुरुष उपस्थित होते.या कार्यक्रमात भारत देशप्रेम ,शिवगर्जना ,प्रतिज्ञा,राष्ट्रगीत असे अनेक उपक्रम सादर करण्यात आले.


बंडखोर दिगंबर शरणी - अक्कमहादेवी यांची 6 एप्रिल जयंती ,विशेष लेख -

 बंडखोर दिगंबर शरणी - अक्कमहादेवी यांची 6 एप्रिल जयंती ,विशेष लेख - 






बंडखोर दिगंबर शरणी - अक्कमहादेवी यांची 6एप्रिल जयंती ,विशेष लेख - 




सातारा, दि.16 -रविंद्र वाकडे 
 आज चैत्र पौर्णिमा लिंगायत शरणी अक्कमहादेवी यांची जयंती.वीरशैव लिंगायत धर्मियांच्या दृष्टीने या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे.
म. बसवेश्र्वर यांना सर्व जन बसवण्णा असे म्हणतात. ' आण्णा ' या शब्दाचा अर्थ आहे सर्वात मोठा भाऊ.ज्याचा आदर्श घ्यावा.ज्याचे अनुकरण करावे.ज्याचा सल्ला मानावा असा केवळ नात्यानेच नव्हे तर मनाने विश्वास असणारा आदर्श थोरला भाऊ.
तसेच अक्कमहादेवी ही महान अशी थोरली बहीण आहे.म्हणून तिला 'आक्का ' असे म्हटले जाते.म्हणून तिचा महादेवी ते अक्कमहादेवी होण्याचा जीवन प्रवास अभ्यासण्या सारखा आहे.

    या अक्कमहादेवी ला कल्याण पर्वातील महा नायिका मानले जाते. व त्यामुळे तिला महत्वाचे स्थान आहे.तिचा जन्म आजच्या शिमोगा जिल्ह्यातील विथणी/उड जारी येथे झाला.तिचे वडील निर्मल शेट्टी हे रत्नपारखी सराफ होते.अनेक रत्ने व मोती यांचा व्यापार ते करत असत.आईं सुमती ही गृहपत्नी होती.महादेवी लहानपणापासून अतिशय सुंदर,बुद्धिमान,हुशार व चुनचूनित व चन्नमल्लिकार्जुन श्री शंकराची निस्सीम भक्ती करणारीहोती.ती जशी तरुण होत चालली.तसे तिचे मानसिक व शारीरिक साैंदर्य आणखीनच खुलत गेले.

  तिच्या या रूप सौंदर्याची व भक्तीची महती कौशिक राजाला समजली.त्याने तिला पाहिल्यावर तो तिच्यावर लुब्ध झाला. व त्याने तिच्यावर चे प्रेम व्यक्त करण्यासाठी तिच्या आईवडिलांकडे लग्नाची मागणी घातली.राजाच्या या मागणीला तिच्या आईवडिलांनी नकार दिला.त्यावेळी राजाने मोठा दबाव आणून लग्नास परवानगी मिळवली. त्यावेळी राज हट्टा समोर हतबल होऊन त्यांनी होकार दिला.त्यावेळी महादेवी ने लग्न करण्यासाठी राजासमोर दोन अटी ठेवल्या.राजाने प्रेमाच्या भरात अविचाराने त्या मान्य केल्या.

त्यातील पहिली अट होती की, राजा महादेवीच्या देव कार्य उपासनेत कोणताही अडथळा निर्माण करून विरोध करणार नाही.आणि दुसरी म्हणजे राजा कधीही तिच्या मना विरोधात तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवणार नाही.राजाने या दोन्हीही अटी मान्य केल्यावर लग्न झाले.
    बरेच दिवस राजा आणि ती फक्त गप्पा गोष्टीचं करत राहिले.या कालखंडात महादेवी ची देव भक्ती अजिबात कमी न होता वाढीस च लागली.राजाने बरेच दिवस संयम ठेवला.परंतु नंतर त्याला मोह अनावर होऊ लागला तसा तो महादेवी ला त्रास देवू लागला.महादेवी मात्र प्रत्येक वेळी त्याच्या वचनांची आठवण त्याला करून देवू लागली.
   एकदा राजाचा राग अनावर झाला तेव्हा त्याने तिला राजसभेत पाचारण केले व याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. व जबरदस्तीने सर्वांसमोर तिच्याशी वाईट वर्तन सुरू केले.
तेव्हा ती राजाला म्हणाली तू जबरदस्ती करून माझे शरीर घेवू शकतोस पण मला मनाने जिंकू शकत नाहीस.असे म्हणून बंडखोर वृत्तीने तिने आपली सर्व वस्त्रे राजदरबारात सर्वा समक्ष उतरविली व ती दिगंबर झाली. व हात जोडून, डोळे मिटून चन्न मल्लिकार्जुन देवाचे नामस्मरण करू लागली.तिच्या या भर सभेतील वर्तनाला राजा व राजसभा काहीच करू शकली नाही.सर्वजण रागाने लज्जित होऊन तिथून निघून गेले.तशी ती तशीच पूर्ण नग्नावस्थेत राजदरबार सोडून बाहेर नगरातून चालू लागली.सर्व नगर प्रजाजन हे दृश्य पहात होते नगर सोडून ती जंगलात गेली व तिथे एका गुहेत तिने आश्रय घेतला.तिथून पुढे रोज दिवसभर ती गुहेत वास्तव्य करायची व रात्रीचा प्रवास करून पुढे वाटचाल करायची .थंडीच्या दिवसात अंगावर फक्त काळे घोंगडे घ्यायची.
तिच्या कानावर फार पूर्वीपासून ' अनुभव मंटप' , म.बसवेश्वर,श्री अल्लम प्रभू यांची माहिती आली होती.त्यामुळे तिथे जाण्याची तिला आसक्तीच लागून राहिली होती.ती श्री क्षेत्र कुडल संगम च्या दिशेने प्रवास व वाटचाल करू लागली.
आणि तो दिवस उजाडला .सकाळच्या प्रहरी ' अनुभव मंडप ' ची नित्य विचारसभा चालू असताना श्री अल्लम प्रभू निरूपण करत होते आणि मंडपात एकूण 770 विद्वान चर्चेत सामील झाले होते.त्यावेळी दिगंबर अवस्थेतील महादेवी भर सभेत अवतरली व व्यासपीठाच्या समोर मधोमध येवुन उभी राहिली.तसे सर्वजण  उठून उभे राहिले.श्री अल्लमप्रभू यांनी सर्वांना शांतपणे खाली बसण्यास सांगितले आणि महादेवी कडे पाहून म्हणाले,' आक्का ,तुला माझा नमस्कार असो.तू तुझ्या आसनावर विराजमान हो.आजपासून तू अनुभव मंडपची पहिली महिला सदस्या असून सर्व शरणांबरीबर तुलाही शरणी म्हणून मी मान्यता देवून  या विचार कार्यात सामील करून घेत आहे.असे म्हणून  त्यांनी तिला नमस्कार केला.आपल्याला थोरली बहिण ( आक्का ) असे संबोधून साक्षात श्री अल्लंम प्रभूंनी आपला गौरव केला व अशा अवस्थेतील स्त्री असून सुद्धा त्यांनी आपल्या शब्दांनी सर्वांच्या मनातील आपल्या बद्दलचा भाव बदलला याचा तिला खूप आनंद झाला.श्री अल्लंम प्रभू आणि तेथील विचारवंतांचे वैचारिक सौंदर्य पाहून ती आसनावर जावून बसली.
त्या दिवसापासून तिचे धार्मिक  अध्यात्मिक कार्य आणखी वाढले व ती कुडल संगमेश्र्वराच्या भक्तीत रमून गेली.त्यातच ती तिच्या  मनापासून मानलेल्या पतीस म्हणजेच श्री चन्न मल्लिकार्जुन, श्री शंकर महादेवास् पाहू लागली.श्री अल्लंम प्रभुं सारखा गुरु लाभला.आणि लहान भावा प्रमाणे मार्गदर्शन करणारे अनेक शरण भेटले.साहजिकच तिच्या कडून अनेक ग्रंथ व वचनांचे लेखन झाले. व त्यांचे निरूपण करण्याची संधी तिला अनुभव मंडप मध्ये मिळाली.
तिच्या वचनांचा अभ्यास करताना तिचे विचार आपणास पुढील प्रमाणे समजतात.
ती सांगते की,एकाच  प्रकारच्या समुद्राच्या पाण्यात मीठ, गोटे,शिंपले व मोती आढळतात. लाटांशी संपर्क येवून येवून मीठ विरघळून जाते.दगडगोटे ,शिंपले झिजून नष्ट होतात.पण मोती रत्न मात्र तेजस्वी, साैंदर्य वान चकचकीत कठीण बनते.तसेच परमेश्वर व चांगले गुरु .भक्त व भाविक यांच्या सानिध्यात माणसांचे होत असते.मी अशा नवऱ्याची बायको आहे.जो कधी जन्मला नाही आणि त्याचा मृत्यू पण होणार नाही.साक्षात देव मल्लिकार्जुन माझा पती असून मी त्याची पत्नी आहे.मी मनापासून च्या भक्तिभावाने त्यालाच पती मानून त्याचाशी लग्न केले आहे.त्यामुळे शरीराने मला कोणी जरी प्राप्त केले तरी मनाने मी त्याच्या शिवाय कोणाची होऊ शकत नाही.माझ्या सुंदर शरीर कायेला मी काजळा ची किंमत देते.बाह्य स्वरूपात ती कितीही चकचकीत चमकली तरी माझ्या मनावर ती अधिकार गाजवू शकत नाही.माझ्या मनाचे सौंदर्य अप्रतिम प्रेमभाव असलेले आहे.अंगभक्ती पेक्षा मी लिंग भक्तीत रमणारी आहे.शिवलिंग माझा संसार आहे.पृथ्वी तत्व जलतत्वात,जल तत्व तेज तत्वात,तेज तत्व वायू तत्वात आणि वायू तत्व आकाश तत्वात विलीन होते.तसे सर्व पंचेंद्रियाच्या भावना भक्तिभावांत विलीन झाल्या पाहिजेत.माझ्या भक्ती भावाने प्रसन्न होऊन रोज मला सिद्ध रामेश्वर दर्शन देतो.तेच माझे बाळ आहे.
एकदा श्री अल्लंमप्रभू यांनी तिला  भर दरबारात 770 शरणांसमोर प्रश्न केला की,तू पूर्ण नग्न दिगंबर अवस्था स्वीकारली आहेस तर मग इतका लांब केशसंभार शरीरावर धारण करून तू का वावरत आहेस? त्यामुळे तुझे सर्वांग झाकले जात आहे.
 तेव्हा तिने अतिशय धाडसाने उत्तर दिले की,मी खूप सुंदर आहे.माझे  एका स्त्रीचे रुपसाैंदर्य व मदन अंग पाहून तुमच्या सर्व पुरुष शरणींच्या भक्तीमध्ये अडथळा येईल. व मला तसे करून तुमची साधना खंडित करण्याची इच्छा नाही.अनेक दिवसांच्या प्रवासात माझे दाट केस खूप लांब गुढग्यापर्यंत  वाढले. आहेत.आणि तेच माझे वस्त्र बनून माझे शरीर झाक तात.पिकलेले रसाळ फळ नुसते पाहून अथवा त्याचा नुसता तृप्ती गंध जरी जाणवला तर  ते खाण्याची इच्छा होते त्यामुळे तुमची भक्ती साधना अडचणीत येईल.
वय वर्षे 18 ला महादेवी ते अक्कमहादेवी हा तिचा झालेला जीवनप्रवास, तिचे ज्ञान निरूपण थक्क करणारे आहे. भार ताच्याच  नव्हे तर जगाच्या व पर्यायाने वीरशैव लिंगायत धर्माच्या इतिहासात हे असे एकमेव उदाहरण असेल जे निंदकासाठी वज्र प्रहार आहे तर शरणांसाठी फुलासाखे कोमल आहे. नसानसांत बंडखोर वृत्ती भिनलेले, ऊर्मी व कष्टाळू वृत्ती,कर्मकांड करताना सुशोभित दिखा वू पणा न करणारी,प्रेम या विश्वातील भावनेला उदात्त करणारी,पशू,पक्षी,निसर्ग यांना जवळ करून जन्म निसर्ग अवस्थेत राहणारी आणि समर्पित मधुरा भक्तीत अखंड ज्ञान पूर्ण जीवन व्यतीत करणारी एकमेव शरणी श्री अक्कमहादेवी . तिच्या धाडसी.बंडखोर , क्रांती प्रवण जीवन कार्यास आजच्या तिचा जयंती दिनी .. शिवशरणार्थ. जय बसवा.ओम नमः शिवाय !

Monday, April 3, 2023

वडूज येथील जागृत श्री हनुमान मंदिरात गुरूवार दि.6 एप्रिल 2023 रोजी श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

 वडूज येथील जागृत श्री हनुमान मंदिरात गुरूवार दि. 6 एप्रिल 2023 रोजी श्री  हनुमान जन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

वडूज येथील जागृत श्री हनुमान मंदिरात गुरूवार दि.6 एप्रिल 2023 रोजी श्री  हनुमान जन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.



  सातारा, दि.5 - विशेष लेख - प्रा.अजय शेटे.

वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथील मुख्य पेठेत श्री हनुमानाचे भव्यदिव्य असे मंदिर असून, येथील श्री मारुतीची मूर्ती अतिशय बलदंड असून वीर मारुतीची असून, जवळ जवळ सहा फूट उंच आहे.

सन 1969 मध्ये वडूज मधील काही प्रतिष्ठित व्यापारी मंडळीनी  एकत्र येवून सार्वत्रिक वर्गणी व वस्तू दान रूपातून येथील मुख्य चौकातील मोठ्या जागेत  पंच क्रोशी तील अतिशय भव्य दिव्य अशा श्री मारुती मंदिराचे बांधकाम नामांकित कारागीर गवंड्या कडून पूर्ण करून घेतले व मंदिरातील भव्य मूर्ती ही मौजे सातेवाडी या गावातून मिरवणुकीने आणून स्थानापन्न केली .

    हे मंदिर उत्तरा मुखी असून ,  पंचक्रोशीतील पाहिले आर.सी.सी. स्ट्रकचर स्वरूपाचे आहे. मंदिरा बाहेर भव्य सभा मंडप असून,आत मुख्य मंदिराचा मोठा हॉल आहे. व आत मध्ये उंच गाभारा असून तो फुलांची  कलाकुसर व नक्षीने खुलवला आहे.त्यात बरोबर मध्यभागी उंच जागेवर श्री वीर हनुमान उजव्या एका पायावर विजयी मुद्रेेत उभे असून त्यांनी  डाव्या पायाखाली राक्षस दाबून धरला आहे.

मंदिराच्या बाहेरील उजव्या बाजूला प्रदक्षिणा मार्गावर श्री गणेश,श्री लक्ष्मी,श्री पंच नाग,श्री नंदी व शिवलिंग यांच्या दगडी मूर्ती आहेत.

संपूर्ण मंदिर अतिशय सुशोभित व पूर्ण पणे रंगकाम केलेले आहे. त्यात रंगीबेरंगी नक्षी,फुले काढली आहेत.मंदिरात श्री मारुती स्तोत्र,श्री मारुती नमस्कार  यांचे लेखन केले आहे. मंदिरा मध्ये  श्री गणपती,श्री शंकर,श्री दत्त,श्री गजलक्ष्मी,श्री हनुमान यांचे फोटो असून,श्री बसवेश्वर महाराज व श्री शिवाजी महाराज यांचे पुतळे सुरक्षितरित्या काच लावलेल्या कपाटात प्रेरणा मूर्ती म्हणून स्थानापन्न केल्या आहेत.श्री बसवेश्वर जयंती व श्री शिवाजी महाराज यांची जयंती अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर एकत्र  पूजा करून साजरी केली जाते व नंतर मिरवणूक काढली जाऊन विचार मार्गदर्शन कार्यक्रम करून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. श्री संत शिरोमणी  नामदेव महाराज यांची मूर्ती ,धर्मवीर संभाजी राजे यांचे  डिजिटल फ्लेक्स बॅनर पण मंदिरात आहे.संपूर्ण मंदिर अत्याधुनिक दिव्यांनी उजळले आहे.  मंदिरात विद्युत माळांची आरास व रोषणाई असून फुलांच्या सुशोभित माळा आहेत.दररोज सुगंधी द्रव्ये ,धूप,अगरबत्ती दरवळत असतात.दर शनिवार व दररोज भाविक भक्तांची वर्दळ असते.हा वीर हनुमान भक्तांच्या नवसाला पावणारा आहे.मंदिर प्रांगणात दर शनिवारी पूजा साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असते.भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर दक्षिणा,प्रसाद ,वस्तू दान करतात.




  मंदिरातील श्री हनुमान हा वीर हनुमान असून त्याच्या सर्व पराक्रमाचे द्योतक आहे.या वीर हनुमाना साठी सव्वातीन किलो वजनाचे चांदीचे दागिने बनवण्यात आले असून प्रत्येक सण उत्सव वेळी ते परिधान केले जातात.या दागिण्यात चांदीची गदा,मुकुट,हार, वाळे, तोडे यांचा समावेश आहे.मूर्तीला चांदीचे डोळे असून  काळ्या मिशा व भुवया श्री हनुमानाचे करारी पराक्रमी रूप प्रतीत करते. श्री मूर्तीस भरजरी रेशमी वस्त्रे परिधान केली जातात. दर अमावस्या पौर्णिमेला श्री मूर्तीस शेंदूर व तेल यांचे माजने केले जाते.पुरुष भक्त  गाभाऱ्यात जाऊन जवळून व महिला गर्भगृहा बाहेरून थोडे दुरून  दर्शन घेतात.पुजारी व स्थानिक भक्त सेवाभाव करतात.

गुरुवार, दि.6 रोजी पहाटे 4 वाजले पासून  श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन केले असून,पहाटे पाच वाजता किर्तन होणार असून,त्यानंतर शिव योगिनी महिला मंडळा तर्फे पाळणा होईल ,त्यानंतर सूर्योदया चे वेळी प्रभू श्री हनुमान जन्म घेतील व लगेच  आरती,भजन,प्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे. आदल्या दिवशी रात्री पासून भजन सुरू करून वातावरण निर्मिती केली जाते.त्यामुळे भक्तीचा दुग्ध शर्करा योग जुळून येत असतो.तरी या पुण्य काळ जन्मोत्सव कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती नित्य कार्यक्रम आयोजक व्यापारी गणेशोत्सव मंडळ व ग्रामस्थ  वडूज यांनी केले आहे.

 श्री.हनुमान जयंती नंतर दुसरे दिवशी  मंदिर प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मंदिराच्या बाहेर दोन प्राचीन वीर गळी असून त्यावर कोरीव मूर्ती आहेत.सदर मंदिराचा उपयोग अनेक सामाजिक व धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी खूप पूर्वीपासून केला जातो. सभा मंडपात बाहेर बैठक कठडे आहेत. जवळच सूचना फलक आहे. मंदिरा बाहेर शक्तीचे प्रतीक असलेली 120 किलो वजनाचा दगडी गोल गोटा आहे. याच श्री मारुतीच्या साक्षीने अनेक वरांनी आपली भावी नववधू निश्चित केली आहे. त्यामुळे सर्व तालुका व वडूज पंचक्रोशी तील भाविक भक्तांची या श्री वीर मारुती वर विशेष श्रद्धा आहे.

सदर श्री हनुमान जन्म पुण्य काळात सर्वांनी वेळेत हजर श्री मारुतीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.असे आवाहन उत्सव संयोजक समिती ने केले आहे.

Monday, March 27, 2023

प्रा.अजय शेटे यांना केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार प्रदान .

 प्रा.अजय शेटे यांना  केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार प्रदान .




 प्रा.अजय शेटे यांना  केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार प्रदान .


                                                         


सातारा, दि.27 - रविंद्र वाकडे  

 केंद्र शासनाची शाखा असलेल्या ,भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा सन 2023 सालाचा उल्लेखनीय सामाजिक कार्य पुरस्कार वडूज , ता.खटाव, जि.सातारा येथील रहिवासी प्रा.अजय शेटे यांना नुकताच प्रदान करण्यात आला . शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ,मानाचा फेटा,सन्मान चिन्ह, पदक ,प्रशस्तीपत्र व रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.




रविवार दि.26 रोजी , सौभाग्य मंगल कार्यालय, पाटण रोड,उंब्रज येथे दुपारी 11 ते 3 या वेळेत झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना भारतीय मजदूर सेवा संघाच्या पुणे मंडलच्या अध्यक्षा श्रीमती मिनाक्षीताई पोळ,संघाचे राष्ट्रीय ऑर्गनायझिंग सेक्रेटरी मा. शैलेश कुमार गौतम , गव्हर्निंग बॉडी महाराष्ट्र अध्यक्ष शांती कुमार बोडके,प्रदेशाध्यक्ष बनसोडे सर्,सातारा जिल्हा महासचिव गोरख खाडे,जिल्हा अँक्शन कमिटी अध्यक्ष योगेश पोळ,दिशा केंद्रीय समिती सदस्या संगीता साळुंके,, छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सुनंदा देसाई या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

भारतीय मजदूर संघाच्या वतीने संपूर्ण देशात विविध उपक्रम राबविले जातात. मजदूर लोकांसाठी सामाजिक,आर्थिक व कौटुंबिक विकासाचे अनेक उपक्रम राबवले जातात.त्यासाठी समाजातील तडफदार  व उल्लेखनीय काम करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांच्या कार्याची यथोचित दखल हा संघ घेत असतो.त्यामुळेच अशा व्यक्ती या संघाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरतात.

या पुरस्काराबद्दल प्रा.अजय शेटे म्हणाले की, मी समाजाच्या निकोप प्रगतीसाठी अनेक प्रकारच्या अत्यावश्यक मागण्या शासन दरबारी करून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केला. समाजात कार्य करताना चांगले काम करत रहायचे व अन लगेच सोयीस्कर रित्या विसरून जायचे,फळाची अपेक्षा ठेवायची नाही.रोज चांगले पेरत रहायचे.किती उगवल याचा विचार करायचा नाही.समक्ष चांगले काम होत असताना सुद्धा लोक त्याकडे डोळेझाक करतात.कौतुकाचे चार शब्द पण बोलत नाहीत.प्रसंगी  स्व -  स्वार्थासाठी अन्याय करण्यास पण मागे पुढे पहात नाहीत. अशी जळकट विचारांची कंजूस माणसे पावलोपावली आढळतात.तसेच समाजात अमाप पैसा असलेली अनेक गरीब दरिद्री माणसे  असतात .पण भारतीय मजदूर संघ  या संघटनेने व त्यांच्या समतुल्य संघटनाच्या  पदाधिकाऱ्यांनी माझ्या सामाजिक कार्याची अप्रत्यक्ष  दखल घेवून माझ्या ध्यानीमनी नसताना सुद्धा माझी या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करून मला खरोखर आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसेच माझे कौतुक करून  मला खरोखर आणखी चांगल्या कार्यासाठी प्रेरणा दिली आहे.ती कायम स्मरणात राहील. या संघटनेत खऱ्या अर्थाने विचारांची श्रीमंती आढळली आहे.त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.या पुरस्कार प्राप्ती बद्दल श्री.युवराज काटकर,सौ.काटकर मॅडम,श्रीमती पद्मिनी कळसकर, सौ.शारदा भस्मे,श्री.शिंदे ,सौ.शिंदे मॅडम यांनी खास अभिनंदन केले आहे.

कार्यक्रमाला संघटनेचे संपूर्ण भारत व महाराष्ट्र राज्यातील अनेक पदाधिकारी स्त्री - पुरुष उपस्थित होते.या कार्यक्रमात भारत देशप्रेम ,शिवगर्जना ,प्रतिज्ञा,राष्ट्रगीत असे अनेक उपक्रम सादर करण्यात आले.

सर्वांना चहा,पाणी,नाष्टा,जेवण,थंड पेये ,यांची सोय संघटने तर्फे उत्तम प्रतीने केली गेली होती.



Thursday, March 16, 2023

म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लिंगायत समाजाच्या वतीने विशेष सत्कार.

म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लिंगायत समाजाच्या  वतीने विशेष सत्कार.





म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लिंगायत समाजाच्या  वतीने विशेष सत्कार.



सातारा, दि.16 - रविंद्र वाकडे 
लिंगायत समाजातील तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी बरीच वर्षे  मागणी असलेले म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ,राज्याच्या 2023.24 मधील अर्थसंकल्पात भरीव अशा 50 कोटी रुपये निधीची तरतूद केल्याबद्दल  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा लिंगायत समाजातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.


यामध्ये  श्री ष ब्र 108 शांतवीर शिवाचार्य महाराज,औसा.श्री ष ब्र 108 महादेव शिवाचार्य महाराज, वाई. श्री ष ब्र 108 श्रीकांत शिवाचार्य महाराज, नागणसूर.श्री ष ब्र 108 निळकंठ शिवाचार्य महाराज,मैदर्गी. श्री ष ब्र 108 सुगरेश्वर शिवाचार्य स्वामीजी ,कर्नाटक.या वंदनीय गुरुजनांनी मा.अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार करून,आशीर्वाद दिले.




यावेळी माजी मंत्री व आ.सुभाष देशमुख, आ.ज्ञानराज चौगुले, आ.सचिन कल्याणशेट्टी, भाजप प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे अभिमन्यू पवार उपस्थित होते.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...