Wednesday, April 5, 2023

उंब्रज तालुका कराड येथील लिंगायत समाजातील पत्रकार रविंद्र वाकडे यांना केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान .

 उंब्रज तालुका कराड येथील लिंगायत समाजातील  पत्रकार  रविंद्र वाकडे यांना  केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान .





उंब्रज तालुका कराड येथील लिंगायत समाजातील  पत्रकार  रविंद्र वाकडे यांना  केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान .




कराड , दि.27 - दिलीप महाजन 

 केंद्र शासनाची शाखा असलेल्या ,भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा सन 2023 सालाचा उल्लेखनीय सामाजिक कार्य पुरस्कार उंब्रज , ता.कराड  जि.सातारा येथील रहिवासी रविंद्र वाकडे यांना नुकताच प्रदान करण्यात आला . शाल,श्रीफळ, मानाचा फेटा,सन्मान चिन्ह, पदक ,प्रशस्तीपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

रविवार दि.26 रोजी  सौभाग्य मंगल कार्यालय,,उंब्रज येथे दुपारी 11 ते 3 या वेळेत झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना भारतीय मजदूर सेवा संघाच्या पुणे मंडलच्या अध्यक्षा श्रीमती मिनाक्षीताई पोळ,संघाचे राष्ट्रीय ऑर्गनायझिंग सेक्रेटरी मा. शैलेश कुमार गौतम , गव्हर्निंग बॉडी महाराष्ट्र अध्यक्ष शांती कुमार बोडके,प्रदेशाध्यक्ष बनसोडे सर्,सातारा जिल्हा महासचिव गोरख खाडे,जिल्हा अँक्शन कमिटी अध्यक्ष योगेश पोळ,दिशा केंद्रीय समिती सदस्या संगीता साळुंके,, छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सुनंदा देसाई या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.



भारतीय मजदूर संघाच्या वतीने संपूर्ण देशात विविध उपक्रम राबविले जातात. मजदूर लोकांसाठी सामाजिक,आर्थिक व कौटुंबिक विकासाचे अनेक उपक्रम राबवले जातात.त्यासाठी समाजातील तडफदार  व उल्लेखनीय काम करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांच्या कार्याची यथोचित दखल हा संघ घेत असतो.त्यामुळेच अशा व्यक्ती या संघाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरतात.

या पुरस्काराबद्दल रविंद्र वाकडे म्हणाले की,समाजात कार्य करताना चांगले काम करत रहायचे व अन लगेच सोयीस्कर रित्या विसरून जायचे,फळाची अपेक्षा ठेवायची नाही.रोज चांगले पेरत रहायचे.किती उगवल याचा विचार करायचा नाही.समक्ष चांगले काम होत असताना सुद्धा लोक त्याकडे डोळेझाक करतात.कौतुकाचे चार शब्द पण बोलत नाहीत. अशी जळकट विचारांची कंजस माणसे  पावलोपावली आढळतात. समाजात अमाप पैसा असलेली अनेक  गरीब दरिद्री माणसे आपण  पाहिली आहेत.पण भारतीय मजदूर संघ  या संघटनेने व त्यांच्या समतुल्य संघटनाच्या  पदाधिकाऱ्यांनी माझ्या सामाजिक कार्याची दखल घेवून , माझे कौतुक करून  मला खरोखर आणखी चांगल्या कार्यासाठी प्रेरणा दिली आहे.ती कायम स्मरणात राहील. एवढी महान  विचारांची श्रीमंती या संघटनेत आढळली.त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.

कार्यक्रमाला संघटनेचे संपूर्ण भारत व महाराष्ट्र राज्यातील अनेक पदाधिकारी स्त्री - पुरुष उपस्थित होते.या कार्यक्रमात भारत देशप्रेम ,शिवगर्जना ,प्रतिज्ञा,राष्ट्रगीत असे अनेक उपक्रम सादर करण्यात आले.


No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...