Monday, February 28, 2022

आज महाशिवरात्री या निमित्ताने सर्व देशभर हा दिवस अत्यंत उस्ताहात साजरा केला जातो , त्याचे महत्त्व .श्री महाशिवरात्री व्रत महात्म्य व कथासार

आज  महाशिवरात्री या निमित्ताने सर्व देशभर हा दिवस अत्यंत उस्ताहात साजरा केला जातो , त्याचे महत्त्व 
.श्री महाशिवरात्री व्रत महात्म्य व कथासार 
.सातारा दि 1 .प्रा.अजय शेटे..वडूज.लिंगायत TV live
.. मंगळवार.. दि.1मार्च 2022..रोजी माघ मासी कृष्ण पक्ष चतुर्दशी ..14..रोजी सर्व हिंदू धर्म व  वीरशैव लिंगायत धर्माला अतिशय पवित्र असणाऱ्या श्री महाशिवरात्रीचा उत्सव संपन्न होत आहे..याचा निशिथ काल मध्य रात्री 12.36 ते 1.15 असा आहे.त्यानंतर दर्श अमावस्या सुरू होत आहे..
..भगवान श्री शंकर..महादेव यांचे  प्रतीक म्हणून शिवलिंगाचे पूजन केले जाते.या शिवलिंगाचा खालील भाग श्री ब्रम्हा असून मध्य भाग श्री विष्णु नारायण आहेत व वरील भाग हा श्री शिवशंकर आहेत. हे शिवलिंग उत्पत्ती..स्थिती आणि लय यांचेही द्योतक आहे.तसेच सर्व विश्व व्यापी  ब्रम्हांडा चे  पण प्रतीक आहे.
..एका पौराणिक कथेनुसार याच रात्री श्री भगवान शंकराने  देव आणि दानव यांच्या समुद्र मंथनातून निघालेले ,' काल कूट ' नावाचे विष प्राशन करून त्याचे अमृत बनविले..तसेच श्री शिव पुराणा मधील कोटी रुद्र आख्याना नुसार जी कथा आहे.ती पुढीलप्रमाणे..
..एका जंगल वनात भिल्लांची वस्ती होती. त्यात गुरुद्रुप नावाचा अतिशय बलवान व रागीट शिकारी भिल्ल रहात होते होता..त्याच्या कुटुंबात त्याचे आईवडील..पत्नी व मुले होती. तो रोज त्या जंगलात शिकारीला जाई व हरीण अथवा इतर प्राण्यांची हत्या करी व त्यांचे मांस खाऊन आपली व कुटुंबाची उपजीविका पूर्ण करत असे.शिवाय तो चोऱ्या व दरो डे घालण्याचे काम करून लूटमार पण करत असे..असेच एकदा त्याच्या कुटुंबाने त्याच्या जवळ हरणाचे मांस खाण्याची इच्छा व्यक्त केली.. त्या शिकारीच्या शोधात तो जंगलात धनुष्यबाण व प्यायला  फक्त पाणी घेवून गेला..दिवसभर त्याने प्रयत्न करून पण त्याला हरिण दिसले नाही त्यामुळे त्याच्या शोधात तो खूप आतपर्यंत अनभिज्ञ अशा दाट जंगलात शिरला. व त्याला हरीण दिसले नाही.संध्याकाळ..रात्र होऊन खूप अंधार पडला पण रिकाम्या हाताने गेलो तर कुटुंबाची भूक आपण भागवू शकणार नाही.त्यामुळे शिकार सापडे पर्यंत रात्रभर तेथेच राहण्याचा निर्धार त्याने केलं व तो एका पाण्याच्या तळ्या जवळ आला.रात्री नक्कीच इथे पाणी पिण्यासाठी एखादे हरीण येईल आणि आपल्याला शिकार मिळेल या हेतूने तो फक्त प्यायला पाणी व हाती धनुष्यबाण घेवून शेजारच्या एका  बेल वृक्षाच्या झाडावर चढून बसला..परंतु रात्रीचा पहिला प्रहर सुरू होऊन बराच वेळ झाला तरी तिथे हरीण आले नाही..परंतु बऱ्याच वेळाने अचानक एक हरिणी तिथे पाणी पिण्यास आली.त्या बरोबर त्याने सावध पवित्रा घेण्यासाठी हालचाल केली. त्याच्या हाताच्या व शरिराच्या  हालचाली मुळे काही बेलाची पाने व हातातील पाणी त्या झाडाखाली दडून असलेल्या श्री शिवलिंगावर पडले आणि अनावधनाने त्याच्या हातून पहिल्या रात्र प्रहराची पूजा पूर्ण झाली.ती रात्र नेमकी श्री  महाशिवरात्री ची होती.श्री शिवलिंग पूजनाचे पुण्य नकळत त्याच्या हातून घडले व त्याच्या विचारात परिवर्तन होऊ लागले.पण त्याच्या  हालचाली च्या आवाजाने त्या हरिणीचे लक्ष त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने शिकारीसाठी तिच्यावर बाण उगारला होता.त्यावर त्या हरिणी ने त्याची याचना करून सांगितले की माझ्या कुटुंबात माझी दोन लहान पिल्ले ..माझी एक बहिण व माझे पती असे आहेत..तेव्हा त्यांना भेटून  त्यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी सोपवून मी माघारी येते.नंतर तू तुझा कार्यभाग साधं .परंतु यास त्याने नकार दिला. व तू खोटे बोलून पळून जाणार आहेस असे ठणकावले..तेव्हा तिने मी जर असे खोटे वागणे  केले तर मला महापाप लागेल.असे म्हणून नक्की माघारी येण्याचे वचन देवून ती परत गेली.. तिने आपल्या पिल्लांना दूध पाजून सर्व कुटुंबात हि गोष्ट सांगितली व ती आपले वचन पूर्ण करण्यास माघारी निघाली.तेव्हा तिची बहिण तिला म्हणाली तू आई आहेस ..तुझ्या लहान पिल्लांना अजून तुझी खूप गरज आहे.तेव्हा तू थांब तुझ्या ऐवजी मी जाते .असे म्हणून ती त्या तळ्यावर पाणी पिण्यास गेली..तोपर्यंत महाशिवरात्रीचा दुसरा प्रहर पूर्ण झाला होता व भिल्लाच्या हालचालीने जवळील पाणी व बिल्वपत्रे खाली श्री शिवलिंगावर पडत होती.अशा प्रकारे त्याची ती पण पूजा नकळत पूर्ण झाली..तेव्हा त्याने त्या तरुण हरिणी वर शिकारीसाठी बाण उगारला त्यावर ती म्हणाली मला आत्ता मारू नकोस.माझे घरी माझी थोरली बहीण..भाऊजी व त्यांची मुले आहेत.तेव्हा त्यांना एकदा भेटून येते.तेव्हा तू माझी शिकार कर तेव्हा सुरुवातीला त्याने विरोध केला पण तिने हे वचन जर मी पूर्ण केले नाही तर मला महापाप लागेल असे सांगितल्यावर  अचानक  मतपरिवर्तन होऊन या घटनेला पण त्याने परवानगी दिली.ती कुटुंबात माघारी आलेली पाहून सर्वांना आनंद झाला.तिने सर्व हकिकत सांगितली त्यावर मोठा नर हरीण त्यांना म्हणाला आपली पिल्ले अजून लहान आहेत.तेव्हा तुमच्या महिलांची त्यांना खूप गरज आहे.तेव्हा आता मी जंगलात जातो.असे म्हणून तो जंगलात त ळ्या जवळ पाणी पिण्यास पोहचला .त्याला पाहून या शिकाऱ्याला खूप आनंद झाला..मध्ये बराच वेळ वाट पाहण्यात गेल्या मुळे तो वेळ जावा म्हणून बेलाची पाने तोडून खाली टाकत होता.आणि त्याच्या जवळील पाणी श्री शिवलिंगावर पडत राहिल्यामुळे त्याची रात्रीच्या तिसऱ्या प्रहराची पूजा पण त्याच्या नकळत घडून आली व त्याच्या विचारात बदल होत गेला..त्याने त्या तरुण नर हरणा वर शिकारीसाठी धनुष्य बाण रोखला .त्यावेळी तो हरण त्याला म्हणाला घरी माझे कुटुंब आहे.तेव्हा त्यांची एकदा शेवटची भेट घेवून लगेच येतो.नंतर तू माझी खुशाल शिकार कर.तेव्हा त्याने नकार देवून तुम्ही सर्व जण मला खोटे बोलून फसवत आहात व स्वतःचा जीव वाचवत आहात असे म्हटले.त्यावर त्या हरिणाने आम्ही जर असे केले तर आम्हाला सात जन्माचे पाप लागेल.तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेव असे सांगितले.त्यावर त्याने त्या नर हरणास पण माघारी येण्याच्या बोलीवर जावू दिले.
..इकडे घरी पोहचल्यावर भिल्लाला दिलेल्या वचन पूर्तीची खूप चर्चा हरिणा च्या  कुटुंबात झाली.तेव्हा  वचन पूर्ती करण्यासाठी ते सर्वच कुटुंब आपल्या पिल्लांसह त्या तळ्या जवळ पोहचले त्यांनी पाणी पिले.. व आम्ही सर्वजण तुझी वचन पूर्ती करण्यासाठी आलो आहे. तेव्हा तू आमची शिकार करून तुझ्या सह सर्व कुटुंबाची भूक भाग व असे  त्या भिल्लास सांगितले
.त्यावर इतक्या सर्व हरिणा ना  पाहून त्याला सुरुवातीला  खूप आनंद झाला. पण यावेळी रात्रीचा चौथा प्रहर ही पूर्ण होऊन त्या भिल्लाच्या हातून अनेक बिल्व पत्रे व पाणी खाली सांडल्या मुळे श्री शिवलिंगाची पूजा पूर्ण झाली . व त्याच्या नकळत त्याचे पुण्यकर्म त्याला लाभले व त्याच्या विचारात पूर्ण मतपरिवर्तन झाले.त्याने विचार केला की हे सर्व कुटुंब प्राणी असून एकमेकांच्या जीवाची काळजी करतात आणि प्रसंगी एकमेकांसाठी स्वतःचा जीव ही देण्यास तयार होतात. आणि आपण माणूस असून त्यांच्या शिकारीचे दुष्कृत्य करतो व आपल्या पोटाची भूक वासना भागव तो हे मोठेच पाप आहे.तेव्हा आपण आता शिकार व लूटमार सोडून या निरपराध
 प्राण्यांसारखे प्रामाणिक जीवन जगू व इथून पुढे मानव कल्याणाचे कार्य करू असे म्हणून त्याने धनुष्यबाण बाजूला ठेवून त्यांना नमस्कार केला व जिवंत माघारी जाण्यास परवानगी दिली .
.. तेव्हा तिथे भगवान श्री शिवशंकर प्रकट झाले व त्यांनी  त्याच्या यश ..संपत्ती व समृध्दी साठी आशिर्वाद दिला..त्याने ते दिव्यदर्शन पाहून नमस्कार केला तेव्हा अशा  प्रकारे जो  माझे महाशिव रात्रीचे व्रत करून जो पूजापाठ..मंत्र व स्तोत्र पठण करेल तेव्हा त्या व्यक्तीस यश..समृद्धी.. ऐश्वर्य..धनधान्य..सुवर्ण.. पद..पैसा ..प्रतिष्ठा..नाव ..आणि मानसन्मान प्राप्त होईल.असे सांगून 'तथास्थु'म्हणून ते अदृश्य झाले..
.. ओम नमः शिवाय..ओम नमः शिवाय **

Sunday, February 27, 2022

वैकल्पीक वाद निवारणाची संकल्पना अतिशय प्राचीन : न्यायमूर्ती ए.ए. सय्यद


वैकल्पीक वाद निवारणाची संकल्पना अतिशय प्राचीन : न्यायमूर्ती ए.ए. सय्यद
अहमदनगर दि.२७  -: adv शितल बेद्रे लिंगायत TV live 
वैकल्पिक वाद निवारणाची संकल्पना अतिशय प्राचीन असून भारतीय संविधानात देखील ती समाविष्ट केलेली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष तथा न्यायमूर्ती श्री. ए. ए. सय्यद यांनी केले. ते वैकल्पीक बाद निवारण केंद्र, अहमदनगरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सदर इमारतीचे फीत कापून व कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. पुढे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मध्यस्थीने प्रकरणे मिटविण्याची भावना आनंद आणि 'सुकून' देवून जाते. वैकल्पीक याद निवारण आणि मध्यस्थीचा मुख्य उद्देश संवाद साधणे हा आहे. ब-याच वेळेला वाद वेगळाच असतो, परंतु तो वेगळ्या पध्दतीने न्यायालयासमोर मांडला जातो. सदरची इमारत फक्त पक्षकारांच्या कल्याणाकरीता तयार करण्यात आलेली आहे. महात्मा गांधींची विचारसरणी देखील दोन्ही पक्षांमध्ये संवाद साधून वाद मिटविण्याची होती. सध्या सर्व न्यायालयांमध्ये खूप प्रकरणे प्रलंबीत आहेत आणि ते न्याय संस्थेसमोर सर्वात मोठे आव्हान आहे आणि त्यामुळे न्यायसंस्थेवर अतिशय ताण व तणाव येतो. अशा वेळेला वैकल्पीक वाद निवारण पध्दतीने वाद मिटविण्याची गरज निर्माण होते. वैकल्पीक वाद निवारण पध्दतीने भारतीय संविधानाच्या कलम ३९ अ नुसार दिलेल्या मोफत विधी सेवेच्या अधिकाराची अंमलबजावणी करता येते. वैकल्पीक वाद निवारणाची संकल्पना अतिशय प्राचीन असून ती पंचायत राज पध्दतीपासून राबविली जाते आणि त्यामधून लोकांचे कल्याण साधले जाते. भारतामध्ये समोपचाराने भांडण मिटविण्याची परंपरा अतिशय प्राचीन आहे. लोकअदालतीव्दारे देखील प्रकरण चालविण्याच्या प्रक्रियेमध्ये वेळ न घालविता प्रकरण मिटविता येते. तसेच लोकअदालतमध्ये वाद मिटल्यामुळे पक्षकारांचे आपसातील संबंध चांगले राहतात. विधी सेवा प्राधिकरणातर्फे सर्व लोकांनी न्यायापासून वंचित राहू नये यासाठी विधी सेवा दिली जाते आणि त्यांना न्याय मिळविण्याकरीता मदत केली जाते. सर्व शासकिय विभागांचा आणि सचिवांचा, वकिलांचा लोकअदालत यशस्वी करण्यामागे सिंहाचा वाटा आहे.
वैकल्पीक वाद निवारण केंद्र (ए.डी.आर.) या इमारतीचा उद्घाटन सोहळा मा. न्यायमूर्ती श्री. ए. ए. सय्यद, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय तथा कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे शुभहस्ते व मा. न्यायमूर्ती श्री. रविंद्र विठ्ठलराव घुगे, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती जिल्हा अहमदनगर मा. न्यायमूर्ती श्री. संजय गणपतराव मेहरे, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती जिल्हा अहमदनगर, यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा. श्री. सुधाकर वें. यार्लगड्डा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे अध्यक्षतेखाली रविवार, दि. २७ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी ३.०० वा. संपन्न झाला आहे. न्यायमूर्ती श्री. रविंद्र घुगे यांनी न्यायालयाकडे ब-याच प्रकारची प्रकरणे येत असल्यामुळे समोपचाराने भांडण मिटल्यास वकिलांना प्रकरणे कमी पडणार नाहीत असे सांगितले. तसेच पक्षकारांना आपल्या प्रकरणांचा लवकर निपटारा करण्यासाठी आपल्या अपरोक्ष काम करणारी एक यंत्रणा आहे याचे नक्कीच समाधान होईल. एवढया लोकअदातलमध्ये प्रकरणे मिटल्यानंतर प्रत्येक पक्षकार सर्वांना आशिर्वाद देतो हे अतिशय पुण्याचे काम आहे. तसेच न्यायमूर्ती श्री. संजय मेहरे यांनी इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर त्या इमारतीची देखील सर्वांकडून काही अपेक्षा असते. या इमारतीची ज्या उद्देशासाठी निर्मिती झाली त्याकरीता त्या इमारतीचा वापर व्हावा अशी या इमारतीची अपेक्षा असेल असे सांगितले.
        सदर कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतांनी झाली. नालसा गीत वाजविण्यात आले. तसेच श्री. डी. पी. सुराणा, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी महाराष्ट्रातील वैकल्पीक वाद निवारण केंद्राच्या इमारतींचे विश्लेषण केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी मागील तीन लोकन्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत बरीच प्रकरणे निकाली काढली आहेत. तसेच येत्या १२ मार्च, २०२२ रोजी , येणा-या लोकन्यायालयामध्ये प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले आहे.
मा. श्री. मिलींद तोडकर, उपसचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, मा. श्री. अजित ए. यादव, प्रबंधक, मुख्य मध्यस्थी केंद्र, मुंबई हे उपस्थित होते. रेवती देशपांडे, सचिव, जिल्हा विधी सेवा यांनी आभार प्रदर्शन केले आणि राष्टगिताने सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Saturday, February 26, 2022

मावळ्यांची शाळा या आधुनिक उपक्रमातून उलगडणार शिवछत्रपतींचा इतिहास


मावळ्यांची शाळा या आधुनिक उपक्रमातून उलगडणार शिवछत्रपतींचा इतिहास 
 
सातारा दि २६ : 
प्रसाद वाकडे  प्रतिनिधी लिंगायत TV live
ब्रिटीशांच्या गुलामीतून संघर्ष करून बाहेर आलेला आणि गेली ७५ वर्षे स्वातंत्र्य उपभोगत असलेला आपला भारत देश अनेक क्षेत्रांत प्रगती करत आहे. शिक्षण क्षेत्र देखील त्याला अपवाद नसून या ही क्षेत्रात आमुलाग्र बदल आपण पाहिले आहेत. मात्र अजूनही शाळांमध्ये इतिहास हा केवळ एक विषयापर्यंत मर्यादित राहिला आहे. सनावळी, परप्रांतातील महायुद्धे, राज्यक्रांत्या शिकताना इतिहासातून जी प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळायला हवी ती मिळताना दिसत नाही. 
 
शिवछत्रपतींचा खरा इतिहास आधुनिक तसेच रंजक पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा ह्यासाठी छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले ह्यांच्या पुढाकारातून आणि मीती इन्फोटेन्मेंट ह्यांच्या तांत्रिक सहयोगातून मावळ्यांची शाळा ह्या अभिनव उपक्रमाची घोषणा सातारा येथील गांधी मैदान येथे आयोजित केलेल्या सोहोळयात करण्यात आली. छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले आणि मीती इन्फोटेन्मेंटचे व्यंकटेश मांडके, अनिरुद्ध राजदेरकर आणि शंतनु कुलकर्णी ह्यावेळी उपस्थित होते. ह्या दिमाखदार सोहोळ्यास शिवाजी महाराजांच्या २९ शिलेदारांचे वंशजही उपस्थित होते. या सोहोळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर ह्यांनी केले.  

ह्या सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर छत्रपती उदयनराजे भोसले ह्यांच्या समवेत स्वराज्ययोध्द्यांचे २८ वंशज आणि मागे पडद्यावरती, मितीइन्फोटेन्मेंट ने बनवलेल्या, लोकार्पित केलेल्या ६० स्वराज्ययोध्द्यांची चित्रे असा ऐतिहासिक प्रसंग उपस्थितांना पाहता आला.छत्रपती उदयनराजे भोसले ह्यांचे मावळ्यांची शाळा ह्या आधुनिक पद्धतीने मराठ्यांचा इतिहास शिकवण्याच्या उपक्रमाची घोषणा करणे, स्वराज्ययोध्द्यांच्या चित्रांचे लोकार्पण करणे, शिवरायांचा इतिहास मुलामुलिंपर्यंत पोहोचवणाऱ्या - राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या खेळाचे मावळा ह्या बोर्ड गेम चे कौतुक करणे आणि ते ही स्वराज्य योद्ध्यांच्या वंशजांच्या उपस्थितीत ह्या साऱ्यांनी सोहळ्याला अलौकिक असे महत्त्व आले.
 
मावळ्यांची शाळा या उपक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील निरनिराळ्या शासकीय, निमशासकीय आणि स्वतंत्र शाळांमधून अधिकचे तास घेऊन आधुनिक आणि रंजक पद्धतीने शिवछत्रपतींनी उभारलेला स्वराज्यलढा हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाईल. रटाळ सनावळ्या पाठ करून घेण्याच्या रुक्ष प्रथेला खंड देत, प्रोजेक्टर्स आणि व्हिजुअल ग्राफिक्सच्या सहाय्याने आपल्या मातीमध्ये घडलेल्या आणि आपल्या मातीसाठी लढलेल्या स्वराज्ययोद्ध्यांच्या शौर्यगाथा शिकविल्या जातील. शालेय अभ्यासक्रम ज्या वीरयोद्ध्यांना विद्यार्थ्यांपासून वंचित ठेवतो त्या स्वराज्ययोद्ध्यांना त्यांच्यापर्यंत अधुनिक पद्धतीने पोहोचवताना त्यांच्या चारित्र्यातून काय शिकावे? एकूणच शिवचारित्र्यातून कोणते बोध घ्यावेत? ह्याचा अभ्यासपूर्वक विचार करून या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
 
हा उपक्रम अस्सल इतिहास प्रेरणादायी पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचवता पोहोचवता शहरातील अनेक हुशार तरूणांना रोजगार देखील देईल.  
 
विशेष म्हणजे ही सर्व व्यवस्था संपूर्णपणे नि:शुल्क असून त्यासाठी लागणारे सर्व माध्यम, माहिती, व्हिजुअल ग्राफिक्स, अॅनिमेशन आणि इच्छुकांना उपक्रम राबविण्याचे प्रशिक्षण मीती इन्फोटेन्मेंट कसलेही शुल्क न आकारता देणार आहे. इच्छुकांचे वेतन, त्यांना शाळांत पोहोचण्यासाठी लागणारी मदत इत्यादी छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले करणार आहेत.
 
सदर उपक्रमाबाबत  छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले म्हणाले की गेले अनेक दिवस आधुनिकतेच्या नावाखाली कमी कमी होत चाललेल्या मराठयांच्या इतिहासाकडे माझे लक्ष वेधले गेले. पाहायला जावे तर अशी एक गोष्ट नाही जी तुम्हाला शिवचारित्र्यातून प्रेरणादायी पद्धतीने पोहोचत नाही. मग आपलाच इतिहास आपल्या नव्या पिढीला शिकवण्यासाठी मी पाऊले नाही उचलायची तर मग कोणी? ह्याच विचाराने झपाटून मी ह्या क्षेत्रात काम करायचे ठरवले. मीती इन्फोटेन्मेंट ह्यांना मी त्यांच्या बोर्ड गेमच्या निर्मितीपासून ओळखतो. तेव्हा त्यांनी संकलित केलेल्या माहितीचा उपयोग आपल्या सातार्‍यातील मुलामुलींना झालाच पाहिजे ह्यासाठी मी प्रयत्न करत आहे . 
 
उपक्रमाच्या संकल्पनेबाबत  मीती इन्फोटेन्मेंटचे  व्यंकटेश मांडके म्हणाले की आमच्याकडे मावळा हा बोर्ड गेम बनवताना गोळा केलेले साहित्य तर होतेच. जेव्हा अशा संकल्पनेबाबतचा विचार पुढे आला तेव्हा आम्ही त्याला त्वरीत होकार दिला. आमचा मावळा हा बोर्ड गेम बनवतानाचा असलेला उद्देशच इथेही आहे! शिवरायांचा इतिहास सगळ्यांना माहीत असायलाच हवा!शुल्क न आकारता पुढे मांडण्यात आलेली ही योजना म्हणजे आपला इतिहास आपल्या तरुणांपुढे मोठ्या प्रमाणात पोहोचवण्याची अमूल्य संधी होती.   अर्थात आम्ही सार्‍यांनी त्वरित ती उचलून धरली!

मीती इन्फोटेन्मेंटचे शंतनु कुलकर्णी म्हणाले की कोणालाही कसलीही गोष्ट समजाऊन सांगण्यासाठीचे अॅनिमेशन हे अगदी सर्वात प्रभावी माध्यम आहे. आम्ही आमच्या मावळा ह्या बोर्ड गेम साठी बर्‍याच ऐतिहासिक गोष्टींच्या अॅनिमेशनचा अभ्यास आधीच केलेला होता! त्यात शुल्क न आकारता पुढे मांडण्यात आलेली ही योजना म्हणजे आपला इतिहास आपल्या तरुणांपुढे मोठ्या प्रमाणात पोहोचवण्याची अमूल्य संधी होती. अर्थात आम्ही सार्‍यांनी त्वरित ती उचलून धरली! 

मीती इन्फोटेन्मेंटचे अनिरुद्ध राजदेरकर म्हणाले की मोठी माणसं शिवरायांबाबत निरनिराळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करत राहतात. गड-दुर्गांवर जाणे, त्यांच्याबद्दल व्याख्यानमाला भरवणे इत्यादी. पण ह्यातून फक्त आपले प्रेम दिसते, ह्यातून नव्या पिढीला आपला इतिहास कळणार आहे का? मुला-मुलींना शाळांतच आधुनिक उपकरणे वापरून शिकवले असता शिवछत्रपतींचा स्वराज्यलढा रुजण्यास मदत होईल. आणि हा उपक्रम नेमके हेच करतो!

Thursday, February 24, 2022

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती प्रदानप्रसंगी काढण्यात येणाऱ्याशोभायात्रेत नागरिकांसह तालीम, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा – अध्यक्ष कुलदीप गायकवाड


करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती प्रदानप्रसंगी काढण्यात येणाऱ्या
शोभायात्रेत नागरिकांसह तालीम, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा – अध्यक्ष कुलदीप गायकवाड
कोल्हापूर, ता. २४ – प्रणाली वाकडे प्रतिनिधी
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती प्रदानप्रसंगी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज केले.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडे अंदाजे ५१ किलो वजनाची चांदीची मूर्ती आहे. ती १ मार्च २०२२ रोजी विधिवत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केली जाणार आहे. त्या निमित्ताने अंबाबाई मंदिर परिसरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने रांगोळ्यांसह आकर्षक रोषणाईही केली जाणार आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना श्री. गायकवाड म्हणाले, सराफ संघाकडे ३१ वर्षांपासून करवीर निवासिनी अंबाबाईची चांदीची मूर्ती आहे. दरम्यान, अंबाबाई मंदिरात असणाऱ्या मूळ मूर्तीचीही अभिषेकमुळे झीज होत आहे. याच कारणासाठी आम्ही ही मूर्ती देण्याचा सर्व संमतीने निर्णय घेतला. त्यासाठी रीतसर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून परवानगी घेऊन मूर्ती प्रदान करीत आहोत. यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडे यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.

ते म्हणाले, एक मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अंबाबाई मंदिर परिसरात मूर्तीसह शोभायात्रा निघेल. यावेळी रांगोळी, आकर्षक रोषणाईबरोबर वाद्यांचा गजरही असेल. यामध्ये नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी.

यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संजय जैन, संचालक सुहास जाधव, सुरेश गायकवाड, सुरेंद्र पुरवंत, अमोल ढणाल, सुरेश राठोड आदी उपस्थित होते.  

४ मार्चला महायज्ञ
दरम्यान, मूर्ती देवस्थान समितीकडे सुपूर्द केल्यानंतर गरुड मंडपामध्ये मूर्ती ठेवण्यात येईल. तिचा वापर दैनंदिन पूजा आणि अभिषेकसाठी केला जाणार आहे. त्यापूर्वी ४ मार्च रोजी मंदिरात मूर्तीला अभिषेक केला जाणार आहे. त्याचबरोबर महायज्ञाचेही आयोजन केले आहे. यामध्ये शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित सहकुटुंबे सहभागी होणार आहेत.

Wednesday, February 23, 2022

संत श्री गजानन महाराज प्रकट दिन , वंदनीय गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी .


 संत श्री गजानन महाराज प्रकट दिन , वंदनीय गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी .
 वडूज.. दि.23.. ..प्रा.अजय शेटे..वडूज
.गणेशवाडी येथील भूमिपुत्र व पुणे येथील  विभागीय पोलिस अधिकारी श्री.सुनील दादासाहेब घार्गे यांनी वडूज ..कर्मवीर नगर येथे बांधलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिर मध्ये  तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.अशोक आबा गोडसे यांनी बांधलेल्या वाकेश्र्वर रोड वरील  मंदिरात तसेच  व्यावसायिक  श्री. दत्तात्रय रामचंद्र गाडवे  यांच्या वाड्यात आज श्री गजानन महाराज प्रकट दिंन सोहळा साजरा करण्यात आला..
..यावेळी सकाळी 8 ते 9 होमहवन..9 ते 10 सत्यनारायण महापूजा..11 ते 12 या वेळेत श्री महाराजांची आरती व पुष्पवृष्टी.. व नंतर महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
..त्या नंतर वंदनीय श्री गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पण करण्यात आले.. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी  श्री सुनील घार्गे साहेब व श्री.अशोक आबा गोडसे  यांनी आपले धार्मिक व सामाजिक मनोगत व्यक्त केले..
..या वेळी पुणे स्थित मारुती स्टील कंपनी चे एम.डी.श्री. दिपक बतिजा साहेब..सारसबाग ग्रुपचे संस्थापक आणि म्हाडा कंपनी चे अधिकारी सतीश राऊत..संजय नाईक सर्..श्री.शैलेश आंदेकर तसेच पुणे येथील सर्व सभासद..आत्मनिर्भर भारत अभियानचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा.अजय शेटे.. निवृत्त प्राचार्य श्री.मिलिंद घार्गे सर..श्री.हणमंत साळुंखे.. सागर पाटोळे..श्री गणेश वाडी ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ हजर होते..

Monday, February 21, 2022

शिवबा सामाजिक संस्था उंब्रज ता कराड वतीने अनोख्या व साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी


शिवबा सामाजिक संस्था उंब्रज ता कराड वतीने अनोख्या व साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी.
कराड दि :- 20 दिलीप महाजन लिंगायत TV live  कराड प्रतिनिधी
शिवबा सामाजिक संस्था उंब्रज ता कराड वतीने अनोख्या व साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली
दिनांक 19 फेब्रुवारी उंब्रज ता कराड
संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती  उत्साहात आणि जोशात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा 
 घोषणा मय वातावरणात अक्खा महाराष्ट्र दुमदुमून निघाला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करत होता यातच उंब्रज ता कराड येथील शिवबा सामाजिक संस्थेतील छोट्या मावळ्यांनी शिवजयंती चे औचित्य साधून  साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली त्यांनी उंब्रज बाजार पेठे मधील मध्यवर्ती ठिकाणी होत असलेल्या प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोळा फूट  उंच पंचधातूच्या अश्वरुढ पुतळ्यास देणगी स्वरूपात 11,111/- रुपये रोख रक्कम शिव योद्धा प्रतिष्ठान उंब्रज यांच्याकडे सुपूर्त केली
 छ.शिवाजी महाराज यांच्या 16 फूट उंच पंचधातूच्या मूर्तीस प्रशासकिय मान्यता मिळाली असून लोकसहभागातून निधी संकलनाचे काम सुरु आहे. गत दोन वर्षात कोरोनाकाळात लॉकडाऊनच्या परिस्थितीतून बाजारपेठ व्यापारी शेतकरी स्थिरावत आहेत.या आर्थिक अडचणीच्या काळातही नियोजित छ.शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूतीसाठी व आपल्या लाडक्या राजाच्या प्रेमापोटी नागरीक शिवप्रेमी व्यापारी शेतकरी नोकरदार तसेच सामाजिक संस्था गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळे भरभरून देणगी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान यांचेकडे जमा करीत आहेत.अनेकजण वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस किंवा कोणतेही शुभकार्य असो या शिवकार्यासाठी देणगी देऊन साजरे करतात. 
 शिवजयंतीचे औचित्य साधुन  शिवबा  सामाजिक संस्थेच्या छोट्या मावळ्यांनी होणारा वायफळ खर्च वाचवून उंब्रज बाजारपेठेत श्री. छ. शिवाजी महाराज यांचा भव्य व दिव्य अश्वारुढ पुतळा व्हावा या भावनेने   रोख 11,111/- श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानकडे सुपूर्त केले. या छोट्या मावळ्यांनी केलेल्या लाखमोलाच्या देणगीचे व त्यांच्या वैचारीक कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Saturday, February 19, 2022

महिलांनी प्रशिक्षण घेऊन उद्यमी बनावे- शर्मिला मिस्किन कणेरी मठ येथे महिलांना प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन


महिलांनी प्रशिक्षण घेऊन उद्यमी बनावे-  शर्मिला मिस्किन
कणेरी मठ येथे महिलांना प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन.
कणेरी मठ, दि 19 प्रतिनिधी
 – महिलांनी हस्तकेलेचे प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनण्याबरोबरच उद्यमी बनावे, असे आवाहन राज्य जीएसटीच्या उपनिदेशक श्रीमती शर्मिला विनय मिस्किन यांनी आज केले.

कणेरी मठ येथे महिलांच्या समर्थ योजनेअंतर्गत प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. सहायक निदेशक हस्तशिल्प केंद्राच्या वतीने महिलांसाठी दोन महिने चालणाऱ्या या प्रशिक्षण केंद्रांच्या उदघाटनप्रसंगी इंडोकाऊंट कंपनीचे राजेश मोहिते, हस्तकला विभागाचे सहायक निदेशक चंद्रशेखर सिंग, प्रशिक्षण अधिकारी रितेश कुमार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

दरम्यान, या महिलांनी बनविलेल्या हस्तकलेचे प्रदर्शन कणेरी मठ येथे आयोजित केले जाणार आहे, तर या सर्व महिलांना इंडो काऊंट रोजगाराची संधी देण्याचे आश्वासन राजेश मोहिते यांनी दिले.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...