Thursday, November 24, 2022
बसवेश्वर उद्यानासाठी दोन कोटींची मागणी जुळे सोलापूरच्या विकासाची आयुक्तांची हमी.
Monday, November 14, 2022
भारतीय आवाजाचे मनभावन सादरीकरण - श्वेता उमरे ला आपले बहुमोल मत द्या
भारतीय आवाजाचे मनभावन सादरीकरण - श्वेता उमरे ला आपले बहुमोल मत द्या
भारतीय आवाजाचे मनभावन सादरीकरण - श्वेता उमरे ला आपले बहुमोल मत द्या
सातारा दि १५ भारतीय आवाजाचे मनभावन सादरीकरण - श्वेता उमरे ला आपले बहुमोल मत द्या लिंगायत समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना मी श्वेता उमरे लिंगायत शरणी यवतमाळ ,माझा नमस्कार शरणू शरणार्थी . मी भारतातील सर्वोत्कृष्ट मोटिव्हेशनल स्पीकर, सक्सेस ग्यान द्वारे सुपर स्पीकर सीझन 2 च्या सर्वात मोठ्या शोधात टॉप 250 चा एक भाग आहे 🎙️
मी एक फॉरेन्सिक सायंटिस्ट आहे 👩🔬 प्रश्नित दस्तऐवजांमध्ये विशेष. मी पंतप्रधान पुरस्कारप्राप्त सार्वजनिक स्पीकर देखील आहे, भारताच्या पहिल्या राष्ट्रीय युवा संसदेचा विजेता आहे आणि विविध आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये राष्ट्रीय युवा प्रतिनिधी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे 🌍
जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी तिच्या आवाजाचा वापर करून बदल घडवून आणणारी व्यक्ती बनणे हे माझे ध्येय आहे.
सुपर स्पीकर सीझन 2 च्या टॉप 10 फायनलिस्टमध्ये जाण्यासाठी, मला तुमच्या मतांची गरज आहे. मतदान प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि त्यासाठी तुमच्या कोणत्याही तपशीलांची आवश्यकता नाही, फक्त एक क्लिक करा! 🗳️
या मजकुराच्या शेवटी दिलेल्या लिंकवर टॅप करा आणि “VOTE” वर क्लिक करा.
मताशी संलग्न तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. ती माझ्या आयुष्याची कहाणी आहे. तुम्हाला माझे काम आवडल्यास कृपया मला कळवा!
जर तुम्ही माझ्यासाठी काही मिनिटे काढू शकलात आणि हा संदेश तुमच्या कामात, मित्रमैत्रिणींमध्ये आणि कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करू शकलात, तर माझ्यासाठी ते जग असेल.
तुमचा पाठिंबा माझ्या आयुष्यात नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. माझ्या प्रवासात मला मदत केल्याबद्दल मी तुमचा मनापासून ऋणी आहे.तरी मी
कु.श्वेता शिरीष उमरे माझा हा व्हिडिओ आणि link शेयर करा आणि मला जास्तीत जास्त वोट मिळ्वून दयावे ही नम्र विनंती, माझ्या पूढील भविष्यासाठी
तुमचे मत महत्त्वाचे आहे ♥️🙏🏻 🔸 लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र 🔸
🔹 वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन 🔹 लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (VIA)
लिंगायत कन्या यवतमाळची कु.श्वेता शिरीष उमरे ही नॅशनल युथ पार्लमेंट मधे पंतप्रधान पुरस्कार विजेती व पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनाही आपल्या भाषणाने प्रभावीत करणार्या या कन्येला सुपर स्पिकर 2 मध्ये वोट करुन विजेती करुया खालील लिंक वर क्लिक करून वोट करा हा मॅसेज शेअर करा आणि तीला जास्तीत जास्त वोट मिळवून देऊया 🙏🏻
Link -
https://superspeaker.com/super-speaker-season-2-round-3-main-challenge/?contest=video-detail&video_id=236566
Sunday, November 13, 2022
खानापूर चे ग्रामदैवत विरभद्र स्वामी यात्रेस प्रारंभ.
खानापूर चे ग्रामदैवत विरभद्र स्वामी यात्रेस प्रारंभ.
खानापूर चे ग्रामदैवत विरभद्र स्वामी यात्रेस प्रारंभ.
खानापूर दि 14;- ( शिवकुमार कल्याणी,) लिंगायत टिव्ही लाईव्ह:
खानापूर ता.देगलूर येथे प्राचीन काळापासून चालू असलेली विरभद्र स्वामी यात्रेला दि ( १० ) गुरुवार पासुन सुरुवात झाली असुन हि यात्रा दि (१६) पर्यंत चालणार आहे अशी माहीती विरभद्र मठाचे मठाधिपती श्री गुंडयाप्पा स्वामी,व शिवराज स्वामी यांनी दिली.
खानापूर चे ग्रामदैवत श्री विरभद्र स्वामी महाराजाच्या यात्रेला दि (१०) गुरुवार पासुन सुरुवात झाली असुन यात्रेच्या पहील्या दिवशी दि १०रोज गुरुवारी विरभद्र स्वामी महाराजास हाळद लागते.व मानाचे अभीषेक होतात.दि १५ रोजी सकाळी मठात धगधगते अग्निकुंड प्रज्वलित केले जाते त्यातुन ,श्री विरभद्र स्वामी यांची प्रतिकृती घेवुन मठाधिपती यातुन अकरा वेळा फेरी मारतात ,व त्यानंतर गावकरी यातुन चालतात,हे अग्निकुंड तुडवल्यामुळे शरीरातील व्याधी, रोग,बाधा नष्ठ होतात अशी येथे अख्यायिका आहे,
त्यानंतर गावभरातुन ग्रामदैवत विरभद्र स्वामी यांची रथयात्रा निघते व यामध्ये अनेक भाविक मोठ्या भक्तिभावाने सामिल होतात,या रथयात्रेत भजणी मंडळी,व गावातील महिला व तरुण तरुणी कलश,व पताके घेऊन चालतात,या मठाचे अनेक राज्यांत शिष्यगण आहेत ते आवर्जून येतात
या यात्रेसाठी महाराट्रासह शेजारील कर्नाटक,आध्र प्रदेष मध्यप्रदेश ,आदी राज्यातील अनेक भावीक येथे दर्शनासाठी येउन दर्शन घेतात. विरभद्र स्वामी हे नवसाला पावनारे देवस्थान असुन येथे ईछ्या पुर्ण होण्यासाठी नवस बोलले जातात. व ते पुर्ण करण्यासाठी भावीक येथे येतात. येथे नवस पुर्ण झाल्यानंतर जावळ, अभिषेक ,अन्नपुजा असे विधी करतात..या यात्रेत सर्वांनी सामिल होऊन भगवान विरभद्र स्वामी यांचे आशिर्वाद घ्यावे असे आवाहन यात्रा समिती तथा मठाधिपती गुंडय्याप्पा स्वामी, शिवकुमार स्वामी,शिवराज महाराज मठवाले यांनी केले आहे..
Saturday, November 12, 2022
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यामुळे संघटनेला प्रेरणा
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यामुळे संघटनेला प्रेरणा
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यामुळे संघटनेला प्रेरणा
सातारा, दि.13 -प्रा.अजय शेटे.
भाजपा चे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यामुळे संघटनेला मोठी प्रेरणा मिळाली आहे.त्या अनुषंगाने आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुकात पक्षाची प्रगतिकारक घौडदौड अधिक वेगाने होणार आहे
सातारा येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पक्षाचा सुरुवाती पासूनचा तत्वनिष्ठ संघर्षकारी इतिहास विषद केला.
जनसंघाचे रूपांतर भाजपा मध्ये करताना पहिले राष्ट्रीय अध्यक्ष मा.अटलबिहारी वाजपेयी यांच्या मनात पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत प्रचंड आत्मविश्वास होता.
तसेच महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष स्व.उत्तमराव पाटील यांनी नवीन संघटना बांधणीचे शिवधनुष्य मोठ्या ताकदीने पेलून संघटना वाढीस लावली.त्यांच्यासह आलेल्या इतर सर्व दहा प्रदेश अध्यक्ष यांनी जिवाचे रान करून पक्षाची ध्येय धोरणे समाजाच्या तळागाळात पोहचवून संघटना वाढीस लावली.
आता 11 वा प्रदेश अध्यक्ष म्हणून आपल्यावर जबाबदारी येवून पोहोचली आहे.आता पक्षाची परिस्थिती बरीच सुस्थितीत आहे.ती आणखीन कायमस्वरूपी चांगली बनवण्यासाठी आपण नव्या मुळ संघटनेला नवीन संघटनेला बरोबर घेवून मोठ्या ताकदीने आगामी निवडणुका सामोरे जाऊन ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद या निवडणुकीत भाजपा चे प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न करणार असून ,या पुढील विधानसभेत भाजपा चे 200 आमदार निवडून आणून स्वबळावर एकहाती सत्ता स्थापन करणार आहोत.असे आत्मविश्वासाने सांगितले.
भाजपाच्या उभारणीत जुन्या मुळ संघटनेचे योगदान खूप मोठे असून,ज्या काळात पक्षाचे काम करण्यासाठी धाडसाने कोणी पुढे येत नव्हते त्यावेळी मोठा विरोध पत्करून तसेच मोठे नुकसान सोसून अनेक नेते व कार्यकर्ते यांनी भाजपा चे विचार समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवले.त्यासाठी त्यांनी आपले तन - मन ,- धन अर्पण करून प्रसंगी कारावास पण सोसला.अशा सर्व सर्व जुन्या कार्यकर्त्यांना भाजपाच्या पुढील काळात पन्नास टक्के सत्तेत सामावून घ्यावे.त्यांच्या मागील कार्याची उचित दखल घ्यावी.त्यासाठी लवकरच भाजपा च्या प्रदेश अध्यक्ष यांच्यासह सर्व मंत्र्यांना,नेत्यांना व पदाधिकाऱ्याना पत्र व्यवहार केला जाणार असून ,त्यांना त्यांच्या पूर्वकार्याचे फळ म्हणून प्रगतीची संधी देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे अनेक जुन्या जाणकार नेते व कार्यकर्ते यांनी यावेळी आपल्या खाजगी मनोगतात बोलून दाखविले.
या कार्यक्रमाला भाजपाचे सर्व पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख व बुथप्रमुख मोठ्या संख्येने हजर होते. **
Friday, November 11, 2022
अक्कमहादेवी एक युग स्त्री : डॉ. वैशाली कडूकर 'महायोगिनी अक्कमहादेवी' कादंबरीचे प्रकाशन
अक्कमहादेवी एक युग स्त्री : डॉ. वैशाली कडूकर 'महायोगिनी अक्कमहादेवी' कादंबरीचे प्रकाशन
अक्कमहादेवी एक युग स्त्री : डॉ. वैशाली कडूकर 'महायोगिनी अक्कमहादेवी' कादंबरीचे प्रकाशन
सोलापूर दि १० : प्रतिनिधी
जननी आणि जन्मभूमी ही निर्मितीची केंद्रे आहेत. जी निर्मिती करू शकते ती कधीच अबला नसते. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. 12 व्या शतकात अक्कमहादेवींनी केलेले धाडस अतुलनीय आहे. व्यक्तीमुळे जेव्हा नवीन युगाची सुरुवात होते तेव्हा त्या व्यक्तीला युगपुरुष संबोधले जाते. तसेच अक्कमहादेवी या स्त्रीने बाराव्या शतकात नवीन युगाची सुरुवात केली. त्यांच्या विचारावरून व कार्यावरून त्या एक युग स्त्री असल्याचे सिद्ध होते. महायोगिनी अक्कमहादेवी या कादंबरीमुळे अक्कमहादेवी यांचे चरित्र समाजासमोर येण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी केले.
प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर लिखित, सुविद्या प्रकाशन प्रकाशित आणि वीरशैव व्हिजन आयोजित 'महायोगिनी अक्कमहादेवी' या कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे, साहित्यिका डॉ. स्मिता पाटील, अक्कनबळग महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा बावी, लेखिका व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर, सुविद्या प्रकाशनचे प्रकाशक बाबुराव मैंदर्गीकर व वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.
लेखिका श्रुती वडगबाळकर यांनी कादंबरी लेखनाविषयीचे त्यांचे अनुभव सांगून या कादंबरीचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. स्मिता पाटील यांनी या कादंबरीचे वेगळेपण सांगून ही कादंबरी प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी वाचली पाहिजे असे सांगितले. कारण या कादंबरीतून केवळ अध्यात्मच नाही तर जीवन जगण्याचे साध्य नेमके काय आहे हेही दिसून येते असे स्पष्ट केले.
यावेळी साहित्यिका सुरेखा शहा, अरविंद जोशी, प्रा. भीमाशंकर बिराजदार ,महेश अंदेली, जे. जे. कुलकर्णी, शोभा मोरे, दशरथ वडतीले, पद्माकर कुलकर्णी, अर्जुन व्हटकर, श्री.अवधूत म्हमाणे, डॉ.नसीमा पठाण , डॉ. अनिल सर्जे, चन्नवीर भद्रेश्वरमठ, रंजीता चाकोते, डॉ.सुहास पुजारी, अनेक नामवंत लेखक, उद्योजक, मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.
सुरुवातीला राजशेखर बुरकुले यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुराव मैंदर्गीकर यांनी केले. लेखिका वंदना कुलकर्णी यांनी कादंबरी वरील अभिप्राय वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शुभदा उपासे-शिवपुजे यांनी केले तर आभारप्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश बडदाळ, विजयकुमार बिराजदार, संजय साखरे, राजेश नीला, महेश मैंदर्गीकर, मनोज पाटील, मेघराज स्वामी, महेश विभुते, संगमेश कंठी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, गौरीशंकर अतनुरे, अमोल कोटगोंडे यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी : 'महायोगिनी अक्कमहादेवी' या कादंबरीचे प्रकाशन करताना डॉ. वैशाली कडुकर, दत्ता सुरवसे, डॉ. स्मिता पाटील, डॉ. श्रुती वडगबाळकर, सुरेखा बावी, बाबुराव मैंदर्गीकर, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, अमित कलशेट्टी
Tuesday, November 8, 2022
वीरशैव लिंगायत समाज जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि सामर्थ्यवान बनला पाहिजे यासाठी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि औद्योगिक समस्या सरकार दरबारी पोहचविण्यासाठी माझा जन्मभर प्रामाणिक प्रयत्न राहणार-रामदास पाटील सुमठाणकर (कपिलधार धर्मसभेत प्रतिपादन)
Wednesday, November 2, 2022
मुंबई येथे भव्य लिंगायत मोर्चाचे आयोजन
मुंबई येथे भव्य लिंगायत मोर्चाचे आयोजन
मुंबई येथे भव्य लिंगायत मोर्चाचे आयोजन
सातारा, दि.1 - प्रा.अजय शेटे.
मुंबई येथे रविवार दि.18 डिसेंबर रोजी आझाद मैदान या ठिकाणी भव्य अशा लिंगायत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वसामान्य लिंगायत जनतेतून गेली अनेक वर्षे लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून ,कर्नाटक विधी मंडळात याबाबत यशही मिळाले आहे.परंतु महाराष्ट्रात नांदेड,लातूर,कोल्हापूर,सांगली,
यवतमाळ ,परभणी ,संभाजीनगर ,सोलापूर,नाशिक,पुणे येथे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले.यामधून राज्यातील लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर संघटित झाला.परंतु सरकारने अजूनही लिंगायत बांधवांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही.
अल्पसंख्यांक दर्जा व आर्थिक विकास महामंडळ मिळणे हा लिंगायतांचा हक्क आहे.यातून समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न तसेच तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटेल व लिंगायतांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होईल.लोकशाही मध्ये जो समाज संघटित होऊन संघर्ष करतो त्याच समाजाचे भवितव्य सुरक्षित व चांगले राहते.
त्यामुळे याच सर्व मागण्या घेवून रविवार , दि.18 डिसेंबर 2022 रोजी पहिल्यांदाच लिंगायतांचा महामोर्चा मुंबईत दिवसभर होणार आहे.
या महामोर्चात लिंगायत धर्माला स्वतंत्र संविधानिक मान्यता द्या,लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करा, म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा,मंगळवेढा येथील म.बसवेश्वर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित करा,विधानभवन परिसरात म.बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभा करा.अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.
तरी राज्यातील सर्व लिंगायत बांधवांनी या मोर्चात लाखोंच्या संख्येने सामील व्हावे व या ऐत्याहासिक प्रसंगांचे साक्षीदार व्हावे.असे आवाहन अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती यांनी केले आहे.
तसेच या मोर्चाच्या अधिक माहितीसाठी मोबाईल संपर्क क्रमांक 9923232229,9615221008,8975521520,9021962214,9370111165,9137561012,9604487007,9420625234 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.**
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम अ...
-
🚩** भारताच्या इतिहासातील सुवर्ण क्षण शिवराज्याभिषेक सोहळा **🚩 विशेष लेख - प्रा.अजय शेटे. सातारा, दि.6 - ज्युलियन...
-
हिंगोली महिला जिल्हाध्यक्षा पदी सौ. मीरा टाले-बुट्टेकर यांची निवड. हिंगोली दि 7:- प्रतिनिधी- लिंगायत धर्म महासभ...









