Thursday, November 24, 2022

बसवेश्वर उद्यानासाठी दोन कोटींची मागणी जुळे सोलापूरच्या विकासाची आयुक्तांची हमी.



 बसवेश्वर उद्यानासाठी दोन कोटींची मागणी  जुळे सोलापूरच्या विकासाची आयुक्तांची हमी. 




  बसवेश्वर उद्यानासाठी दोन कोटींची मागणी  जुळे सोलापूरच्या विकासाची आयुक्तांची हमी. 
   सोलापूर  दि 25  : -

 जुळे सोलापुरातील महात्मा बसवेश्वर उद्यान निर्मितीचे रखडलेले काम जलदगतीने पूर्ण करावे आणि त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात दोन कोटी रूपयांची आर्थिक तरतूद करावी,तसेच शिवबसव चौकात महात्मा बसवेश्वर प्रवेशद्वाराचे स्वागत कमान उभारण्यात यावे आणि जुळे सोलापुरात सर्व नागरी सुविधा द्या अशी मागणी लिंगायत शिष्टमंडळाने केली आहे.
             महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सौ.शीतल उगले यांची भेट घेऊन या विषयांची निवेदने दिली.यावेळी म्हैसूर पगडी परिधान करून,शाल,पुष्पगुच्छ तसेच महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा देऊन डाॅ.बगले यांच्या हस्ते नूतन आयुक्तांचा सत्कार करण्यात आला.
              सिध्देश्वर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष आनंद मुस्तारे,लिंगायत महासंघाचे शहर अध्यक्ष सचिन शिवशक्ती,बसवप्रेमी चन्नबसवेश्वर गुरूभेटी,समाजसेवक संदीप भंडारे,शशिकला कस्पटे,शिवानंद बगले,सिध्दाराम खुटेकर,प्रदीप जाधव,धर्मराज पुजारी,निंगोंडा तळे,सैफन ईनामदार,अशोक पांचाळ,चंद्रशेखर भूरे,सिध्दलिंग मसूती,आमसिध्द मुटाळे आदि बसवप्रेमी यावेळी उपस्थित होते.
             या भेटीत आयुक्त उगले यांनी महात्मा बसवेश्वर उद्यानाच्या उभारणीसाठी तात्काळ नगर अभियंता यांना कार्यवाहीचे निर्देश देऊन त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूदही करण्यात येईल अशी ग्वाही दिली.शिवबसव (सैफूल ) चौकात स्वागत कमानी बाबत पाहणी करून सकारात्मक निर्णय घेऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

● *गुंठेवारी बांधकामे नियमित करा...!* 
            सोलापूरच्या हद्दवाढ भागातील गुंठेवारी बांधकामे नियमित करा आणि नागरिकांची गैरसोय त्वरीत दूर करा अशी विनंती डाॅ.बसवराज बगले,संदीप पांढरे,शिवानंद बगले,सिध्दाराम खुटेकर यांनी केली.त्यावर गुंठेवारी मिळकतींची योग्य ती आकारणी करून मोजणीबाबतही कार्यवाही करून जनहिताचा निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी हमी आयुक्तांनी दिली.
*हद्दवाढचा निधी तिथेच खर्च करा... 
             जुळे सोलापुरातून सर्वाधिक कर संकलन होतोय मात्र त्या तुलनेत विकास कामे होत नाहीत,हद्दवाढ भागातील निधी अन्यत्र खर्च न करता त्याच भागात खर्च करा, जुळे सोलापूर भागात मुबलक पाणीपुरवठा करा,स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वाढवा अशा विविध मागण्यांबाबत डाॅ.बगले यांनी आयुक्तांशी चर्चा केली.त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिलासा दिला.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...