Monday, June 6, 2022

जगद्गुरु श्री अल्लमप्रभू योगीपीठ येथे वृक्षारोपण कार्यक्रम


 जगद्गुरु श्री अल्लमप्रभू योगीपीठ येथे वृक्षारोपण कार्यक्रम 
चिकोडी  दि.6 :- शितल कुडचे  प्रतिनिधी लिंगायत TV live
दि.5 जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जगद्गुरु श्री अल्लमप्रभू योग पीठ, आळते जि.कोल्हापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी  पिठाध्यक्ष जगद्गुरु श्री  बसवकुमार स्वामी, राष्ट्रीय बसव दल ,कोल्हापूर चे सरचिटणीस महेशकुमार बळवंत कोरे, सिद्धराम कवळीकुट्टी ,प्रभू कवळीकट्टी,सुधीर शहापुरे व राष्ट्रीय बसव दल, धरणगुत्ती चे सर्व सदस्य उपस्थित होते.
या सर्वांच्या हस्ते देशी वुक्षांची रोपे लावून त्याचे योग्य प्रकारे संगोपन करण्याचे निश्चित करण्यात आले.
  वृक्ष हिच निसर्गाची खरी संपत्ती असून,त्यामुळेच मानव व सजीवांना प्राणवायूचा पुरवठा होऊन त्यांचे जीवन सुसह्य होते. वृक्ष हेच पर्यावरणाच्या रक्षण साखळीतील महत्वाचे घटक असून त्यांची लागवड सर्वांनी सतत केली पाहिजे.अशा प्रकारचे मनोगत जगद्गुरु श्री बसवकुमार स्वामी यांनी यावेळी व्यक्त केले.

Saturday, June 4, 2022

प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा मजनू चित्रपट रसिकांच्या भेटीला 10 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित


प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा मजनू चित्रपट रसिकांच्या भेटीला 10 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

Friday, June 3, 2022

रामदास पाटील सुमठाणकर* यांना साम टीव्ही चा *ग्लोबल अचिव्हर्स* अवार्ड जाहीर दुबईत होणार पुरस्कार वितरण सोहळा


रामदास पाटील सुमठाणकर* यांना साम टीव्ही चा *ग्लोबल अचिव्हर्स* अवार्ड जाहीर 
दुबईत होणार पुरस्कार वितरण सोहळा
नांदेड  दि 3 ( शिवानंद स्वामी प्रतिनिधी) - यंदाचा साम टीव्ही च्या ग्लोबल अचिव्हर्स अवार्ड नांदेडचे निवृत्त प्रशासन अधिकारी तथा *राष्ट्रसंत मिशनचे प्रमुख रामदास शिवराज पाटील* यांची निवड करण्यात आली आहे.. *8 जुन रोजी दुबईत* होणाऱ्या एका भव्य सोहळ्यात पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील सुमठाण येथील मात्र, सध्या नांदेड मध्ये स्थायिक झालेले दिव्यांग असलेल्या रामदास शिवराज  पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिव्यांग वसतीगृहात राहून,आश्रम शाळेत निवासी अभ्यास करुन प्रशासनात मुख्याधिकारी म्हणून सेवा मिळवली... आणि 12 वर्ष सेवा पुर्ण केली.प्रशासन सेवेत असताना आपल्या धाडसी कामामुळे समाजोपयोगी  व नवनवीन प्रयोग करणारे अधिकारी म्हणून शासनस्तरावर दखल घेत अनेक पुरस्कार मिळविणारे माननीय रामदास पाटील यांनी स्वतःची राज्यात वेगळी ओळख निर्माण केली होती. दिव्यांग असतानाही महत्वाकांक्षा आणि जिद्दीच्या जोरावर अनेक उपलब्धी मिळवलीय. शासनाकडून महामहीम राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते सेवेत संस्थेला सत्कार प्राप्त झाले . तसेच चीन आणि अमेरिका राष्ट्रच्या अभ्यास दौरा केला.
सामाजिक कार्याची आवड असल्याने प्रशासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेत पाटील यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले... त्याच बरोबर वचन स्थंभ चॅरिटेबल ट्रस्ट, नांदेड मार्फत राष्ट्र संत मिशनच्या माध्यमातून गोरगरिब विद्यार्थ्यांना साठी युपीएसस्सी, एमपीएससी अभ्यासासाठी नांदेड मध्ये मोफत अभ्यासिका केंद्र सुरू केलीय.
तसेच नामांकित तज्ञांचे शिबीर आयोजित केले. त्यांचं नांदेड, हिंगोली जिल्ह्य़ातील कोरोनाच्या काळात हजारो  रुग्णांसाठी केलेलं काम स्मरणार्थ राहणारे आहे... एवढचं नाही तर सामान्यच्या अडचणीत पडलेल्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा आणि स्वतःला झोकून देणारा माणूस म्हणून पाटलांची मराठवाड्यात ओळख झालीय. दिव्यांग मुलीच पालकत्त्व स्वीकारून मदत केले ती मुलगी टॉकीयो येथे प्यारालंम्पिक खेळली .लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपुरकर यांचे अत्यंत विश्वासू असलेले पाटील हे त्यांच्या ट्रस्ट वर काही काळ गुरु च्या आदेशानुसार अध्यक्ष होते. पाटील यांच्या अशा अनेक कामांची पावती म्हणून साम टीव्ही ने पुरस्काराची निवड केली आहे. 
दरम्यान, पाटील यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

लातूर येथे दि 5 जून रोजी सर्व लिंगायत संघटनांची राज्यव्यापी बैठक

 लातूर येथे दि 5 जून रोजी सर्व लिंगायत संघटनांची राज्यव्यापी बैठक 
सातारा, दि.2 - प्रा.अजय शेटे लिंगायत TV live प्रतिनिधी
लातूर येथे रविवार दि. 5 जून रोजी सकाळी 11 वाजता महात्मा बसवेश्वर विद्यालय येथे  महाराष्ट्र राज्यातील सर्व लिंगायत संघटनांची राज्यव्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
      महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात  लिंगायत समन्वय समितीच्या  नेतृत्वाखाली झालेल्या तब्बल 20 लिंगायत महामोर्चानंतर ' लिंगायत ' आंदोलनाच्या पुढील वाटचाली विषयी चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्व लिंगायत संघटना ,प्रतिष्ठान आदींना या बैठकीचे खास निमंत्रण देण्यात आले आहे.
   या बैठकीचे आयोजन लिंगायत समन्वय समिती यांनी केले असून,अधिक माहितीसाठी श्री.माधवराव पाटील टाकळीकर , मोबा. क्र.  8408811000,प्रा.राजेश विभुते 9370086443,प्रा.सुनील हेंगणे  9421366564 यांचेशी संपर्क साधावा.अशी माहिती समिती तर्फे जाहीर करण्यात आली आहे.

Thursday, June 2, 2022

मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर स्मारकाबाबत शासनाने उदासीनता दाखविल्यास नगरपालिकेच्या जागी "प्रतिकात्मक बसवेश्वर पुतळा उभारू " अशी घोषणा लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल रूकारी


मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर स्मारकाबाबत शासनाने उदासीनता दाखविल्यास  नगरपालिकेच्या जागी   "प्रतिकात्मक बसवेश्वर पुतळा उभारू " अशी घोषणा लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल रूकारी
सातारा, दि.2 -  प्रसाद वाकडे प्रतिनिधी लिंगायत TV live
मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर स्मारकाबाबत शासनाने उदासीनता दाखविल्यास जनतेचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी नगरपालिकेच्या जागी   "प्रतिकात्मक बसवेश्वर पुतळा उभारू " अशी घोषणा लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल रूकारी यांनी केली.
मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर स्मारकाबाबतची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज मंगळवारी मंगळवेढ्याला भेट देऊन प्रमुख लिंगायत नेत्यांशी चर्चा केली व जागेची पाहणी केली. या शिष्टमंडळात सर्वश्री श्रीकांत तोडकर,सुनिल शास्त्री कसबेकर,राजाभाऊ मुंढे, कोठावळे,विद्याधर ताठे,गुरूनाथ बडूरे,डाॅ.बसवराज बगले आदि मान्यवरांचा समावेश होता.
वीरशैव मंगल कार्यालयात समाज प्रमुखांच्या संवाद उपक्रमात ॲड.शैलेश हावनाळे यांनी सर्वांचे स्वागत केले.गुरूनाथ बडूरे यांनी या बैठकीचा उद्देश सांगितला,सोमनाथ माळी यांनी नगरपालिकेकडून करावयाच्या पुतळयाबाबतची स्थिती सांगितली.नगराध्यक्षा अरूणाताई माळी यांनी मंगळवेढा नगरपालिकेकडून बसवेश्वर पुतळा उभारण्यासाठी जागा व ४५ लाख रूपयांची तरतूद केल्याबद्दल त्यांचा लिंगायत संघर्ष समितीकडून सुनिल रूकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 *● क्रांती दिनापासून लाखोंची पदयात्रा...!* 
             जगातील पहिली लोकशाही संसद ज्या मंगळवेढा शहरात स्थापन झाली त्या महान संताच्या स्मारकाकडे शासन गांभीर्यपूर्वक लक्ष देत नसेल तर आत्ता संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही,अशी भुमिका लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वय काकासाहेब कोयटे यांनी मांडली. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांती दिनापासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून लाखो बसवप्रेमींची पदयात्रा काढण्यात येईल आणि १४ ऑगस्ट रोजी ही पदयात्रा मंगळवेढ्यात पोहोचून महात्मा बसवेश्वरांची महाआरती करण्यात येईल अशी घोषणाही काकासाहेब कोयटे यांनी यासंदर्भात केली.
 *● स्मारकाविषयी शासन सकारात्मक...!* 
            त्यानंतर महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले यांनी शासनस्तरावर बसवेश्वर स्मारकाविषयी चालू असलेल्या प्रशासकीय कामकाजाची प्रगती सांगितली.येत्या आठवड्यात नव्या स्मारक समितीची रचना होईल आणि सरकारी जमीनी बाबत सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला. 
              या प्रसंगी सर्वश्री शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम कुदळे, पत्रकार दिगंबर भगरे,शिवानंद हिरेमठ,सुरेश वाले,दत्तात्रय कोरे,दादा टाकणे,दयानंद सोनगे,संजय पाटील खवेकर,शरणप्पा माळी,ॲड.दत्तात्रय तोडकरी,संगमेश्वर बुरकुल,पप्पू स्वामी,संतोष राऊत,ज्ञानेश्वर भिमदे,संतोष सोनगे,राहूल टाकणे,निंगप्पा तळे,यांच्यासह प्रमुख समाजबांधव उपस्थित होते.

लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत बाबत तात्काळ कार्यवाही करावी - मा.शरदरावजी पवार साहेब.


 लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत बाबत तात्काळ कार्यवाही करावी - मा.शरदरावजी पवार साहेब.
सातारा, दि.3 -प्रा.अजय शेटे. लिंगायत TV live प्रतिनिधी
 लिंगायत समाजाच्या मागण्या रास्त असून त्या प्रलंबित आहेत.त्या संबंधी त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही केली जावी.असा पत्रव्यवहार मा.शरदरावजी पवार साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांना केला आहे.
या मध्ये लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा,लिंगायत वाणी लोकांना आरक्षणाचा लाभ मिळावा, म.बसवेश्वर स्मारक,मंगळवेढा बाबत तातडीने अनुदान मंजूर होऊन कार्यवाही सुरू करावी,अकरा पोट जातींचा लिंगायत म्हणून समावेश व्हावा.लिंगायत समाजाच्या मठ स्थावर संपत्ती वरील अतिक्रमणे हटविली जावीत. म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.लातूर येथील विमानतळाला म.बसवेश्वर यांचे नाव द्यावे.अशा स्वरूपाच्या या काही मुख्य मागण्या आहेत.
त्या बाबत तातडीने कार्यवाही करून मा.मुख्यमंत्री साहेब यांनी संबंधित सर्व वेगवेगळ्या विभागाकडून तातडीने अहवाल मागविले आहेत व त्या बाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या बद्दल सांगली राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.संजयजी शेटे यांनी मा.शरदरावजी पवार साहेब व मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांचे लिंगायत समाज संघटने तर्फे आभार व्यक्त केले आहेत 

Wednesday, June 1, 2022

लिंगायत समाज भूषण श्रेष्ठ उद्योगपती बाबासाहेब कल्याणी पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित


लिंगायत समाज भूषण श्रेष्ठ उद्योगपती बाबासाहेब कल्याणी  पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित 
सातारा, दि.2 - प्रा. अजय शेटे लिंगायत TV live प्रतिनिधी
पुण्यभूषण फाउंडेशन व पुणेकर नागरिक  यांचे वतीने देण्यात येणारा यंदाचा  2022 
सालचा 32 वा  पुण्यभूषण पुरस्कार श्रेष्ठ आणि जेष्ठ उद्योगपती  तसेच भारत फोर्ज या कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मा.बाबासाहेब कल्याणी यांना जाहीर करण्यात आला आहे .
हा पुरस्कार केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री मा.नितीनजी गडकरी यांचे शुभहस्ते मा. बाबासाहेब कल्याणी यांना शनिवार दि.4 जून रोजी , संध्या. ठीक 5.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर ,पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे .
तरी या गौरव सोहळ्यास आपली वेळेवर उपस्थिती प्रार्थनीय आहे.तरी आपण संध्या.5.15 पर्यंत आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे ..असे आवाहन फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.


लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...