लिंगायत समाज भूषण श्रेष्ठ उद्योगपती बाबासाहेब कल्याणी पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित
सातारा, दि.2 - प्रा. अजय शेटे लिंगायत TV live प्रतिनिधी
पुण्यभूषण फाउंडेशन व पुणेकर नागरिक यांचे वतीने देण्यात येणारा यंदाचा 2022
सालचा 32 वा पुण्यभूषण पुरस्कार श्रेष्ठ आणि जेष्ठ उद्योगपती तसेच भारत फोर्ज या कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मा.बाबासाहेब कल्याणी यांना जाहीर करण्यात आला आहे .
हा पुरस्कार केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री मा.नितीनजी गडकरी यांचे शुभहस्ते मा. बाबासाहेब कल्याणी यांना शनिवार दि.4 जून रोजी , संध्या. ठीक 5.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर ,पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे .
तरी या गौरव सोहळ्यास आपली वेळेवर उपस्थिती प्रार्थनीय आहे.तरी आपण संध्या.5.15 पर्यंत आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे ..असे आवाहन फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment