मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर स्मारकाबाबत शासनाने उदासीनता दाखविल्यास नगरपालिकेच्या जागी "प्रतिकात्मक बसवेश्वर पुतळा उभारू " अशी घोषणा लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल रूकारी
सातारा, दि.2 - प्रसाद वाकडे प्रतिनिधी लिंगायत TV live
मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर स्मारकाबाबत शासनाने उदासीनता दाखविल्यास जनतेचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी नगरपालिकेच्या जागी "प्रतिकात्मक बसवेश्वर पुतळा उभारू " अशी घोषणा लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल रूकारी यांनी केली.
मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर स्मारकाबाबतची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज मंगळवारी मंगळवेढ्याला भेट देऊन प्रमुख लिंगायत नेत्यांशी चर्चा केली व जागेची पाहणी केली. या शिष्टमंडळात सर्वश्री श्रीकांत तोडकर,सुनिल शास्त्री कसबेकर,राजाभाऊ मुंढे, कोठावळे,विद्याधर ताठे,गुरूनाथ बडूरे,डाॅ.बसवराज बगले आदि मान्यवरांचा समावेश होता.
वीरशैव मंगल कार्यालयात समाज प्रमुखांच्या संवाद उपक्रमात ॲड.शैलेश हावनाळे यांनी सर्वांचे स्वागत केले.गुरूनाथ बडूरे यांनी या बैठकीचा उद्देश सांगितला,सोमनाथ माळी यांनी नगरपालिकेकडून करावयाच्या पुतळयाबाबतची स्थिती सांगितली.नगराध्यक्षा अरूणाताई माळी यांनी मंगळवेढा नगरपालिकेकडून बसवेश्वर पुतळा उभारण्यासाठी जागा व ४५ लाख रूपयांची तरतूद केल्याबद्दल त्यांचा लिंगायत संघर्ष समितीकडून सुनिल रूकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
*● क्रांती दिनापासून लाखोंची पदयात्रा...!*
जगातील पहिली लोकशाही संसद ज्या मंगळवेढा शहरात स्थापन झाली त्या महान संताच्या स्मारकाकडे शासन गांभीर्यपूर्वक लक्ष देत नसेल तर आत्ता संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही,अशी भुमिका लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वय काकासाहेब कोयटे यांनी मांडली. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट या क्रांती दिनापासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून लाखो बसवप्रेमींची पदयात्रा काढण्यात येईल आणि १४ ऑगस्ट रोजी ही पदयात्रा मंगळवेढ्यात पोहोचून महात्मा बसवेश्वरांची महाआरती करण्यात येईल अशी घोषणाही काकासाहेब कोयटे यांनी यासंदर्भात केली.
*● स्मारकाविषयी शासन सकारात्मक...!*
त्यानंतर महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले यांनी शासनस्तरावर बसवेश्वर स्मारकाविषयी चालू असलेल्या प्रशासकीय कामकाजाची प्रगती सांगितली.येत्या आठवड्यात नव्या स्मारक समितीची रचना होईल आणि सरकारी जमीनी बाबत सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी सर्वश्री शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम कुदळे, पत्रकार दिगंबर भगरे,शिवानंद हिरेमठ,सुरेश वाले,दत्तात्रय कोरे,दादा टाकणे,दयानंद सोनगे,संजय पाटील खवेकर,शरणप्पा माळी,ॲड.दत्तात्रय तोडकरी,संगमेश्वर बुरकुल,पप्पू स्वामी,संतोष राऊत,ज्ञानेश्वर भिमदे,संतोष सोनगे,राहूल टाकणे,निंगप्पा तळे,यांच्यासह प्रमुख समाजबांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment