Sunday, March 6, 2022

हिंगोली महिला जिल्हाध्यक्षा पदी सौ. मीरा टाले-बुट्टेकर यांची निवड.

हिंगोली महिला जिल्हाध्यक्षा पदी सौ. मीरा टाले-बुट्टेकर यांची निवड.
    हिंगोली दि 7:-  प्रतिनिधी- लिंगायत धर्म महासभा (महाराष्ट्र राज्य) च्या हिंगोली महिला जिल्हाध्यक्षा  पदी अ‍ॅड. सौ. मीरा सतीश टाले-बुट्टेकर (बी. एससी., एल. एल. एम.) यांची निवड करण्यात आली. महिला राज्याध्यक्षा श्रीमती वैशाली दिलीप पाटील यांनी त्यांची निवड केली या निवडीसाठी लिंगायत धर्म महासभा राज्य अध्यक्ष आर. एस. देशिंगे (पुणे), राज्य सरचिटणीस बी. एस. पाटील आणि हिंगोली जिल्हा अध्यक्ष गजानन होनराव यांचे सहकार्य लाभले.

Saturday, March 5, 2022

लिंगायत समाजातील उद्योजक पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी डॉ.नरेंद्र दाभोलकर पुरस्काराने सन्मानित


लिंगायत  समाजातील उद्योजक पद्मभूषण बाबासाहेब  कल्याणी डॉ.नरेंद्र दाभोलकर पुरस्काराने सन्मानित 
..सातारा.. दि.5...रविंद्र वाकडे 
सातारा जिल्ह्यातील कोळे गावचे सुपुत्र भारत फोर्ज या कंपनीचे मालक व यशस्वी उद्योजक श्री.बाबासाहेब  कल्याणी यांना सन 2021 चा डॉ.नरेंद्र दाभोलकर सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात येवून पुणे येथे प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार दरवर्षी सातारा नगरपालिकेच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या महान व्यक्तीस प्रदान करण्यात  येतो.एक लाख रुपये..सन्मानचिन्ह..मानपत्र ..शाल..श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
..उद्योजक बाबासाहेब कल्याणी व श्रीमंत उदयनराजे भोसले यांचे पूर्वीपासून अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत.या संबंधाच्या जोरावरच श्री.कल्याणी यांनी आपली जागा रू.एक मात्र भाडे करार तत्वावर सातारा नगरपालिकेला दिली आहे.सातारा नगरपालिकेचे स्वच्छता व पर्यावरण क्षेत्रात मोठे नाव आहे. व डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे सामाजिक कार्य खूप महान आहे.या दोन्हींच्या माध्यमातून हा पुरस्कार आपणाला मिळाला याचा आपणास खूप मोठा अभिमान वाटत आहे.असे सत्काराला उत्तर देताना उद्योजक कल्याणी यांनी सांगितले.
..उद्योजक कल्याणी यांच्या भारत फोर्ज कंपनी तर्फे महाराष्ट्रातील 100 गावात तसेच सातारा जिल्ह्यातील 28 गावांमध्ये जलसंधारण..पाणी.प्राथमिक शिक्षण..आरोग्य..वीज या क्षेत्रात सामाजिक विकास कामे चालू असून जवळ जवळ 5 लाख लोकांना यांचा फायदा होत आहे.
..  श्री.कल्याणी सदर एक लाखाचा धनादेश हा सातारा येथील गरजू व्यक्ती अथवा सामाजिक संस्थेसाठी दान केला जा वा अशी मनिषा व्यक्त करून सन्मानाने परत करत मनापासून आभार व्यक्त केले.
..श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.अभिजीत बापट साहेब..उपनगराध्यक्ष मनोज शेंडे..पुरस्कार समितीचे सदस्य विनोद कुलकर्णी.. हरिष पाटणे..अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले..सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे..यांच्या हस्ते समस्त सातारकर जनतेच्या वतीने  या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समस्त  लिंगायत समाज  वीरशैव इंटरर्नेशनल असोसिएशन (VIA) आणि लिंगायत संघर्ष समिती यांचे वतीने अभिनंदन करणेत येत आहे

Tuesday, March 1, 2022

महाशिवरात्रीनिम्मित हेमाडपंथीय संगमेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी



महाशिवरात्रीनिम्मित हेमाडपंथीय संगमेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी
मायणी:-दि०१ :- प्रा अजय शेटे
   मायणी  येथील प्रसिद्ध प्राचीन काळातील हेमाडपंती शिव मंदिरात यंदा महाशिवरात्री निम्मित मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी झाली होती. याठिकाणी येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप शिवभक्तांकडून करण्यात आले.
           दरवर्षी याठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या उत्साहात पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये हा उत्सव साजरा होतो. गेल्या दोन वर्षापासून देशावर ती कोरोना महामारी असल्यामुळे अनेक निर्बंधाना जनतेला सामोरे जावे लागले.याकाळात  धार्मिक स्थळांवर दर्शनास बंदी घालण्यात आली होती.याकारणाने कोणतेही उत्सव साजरे केले गेले नाहीत. परंतु आता परिस्थिती हळूहळू सुधारत आल्याने सरकारने निर्बंध शिथिल केल्याने महाशिवरात्रीचा यंदाचा उत्सव सर्वत्र मोठ्या आनंदात व भक्तिभावाने संपन्न झाला.
           शिवभक्तांकडून प्रसादाचे वाटप
       महाशिवरात्रीनिम्मित मंदिरास विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीत सजवण्यात आले होते.दरवर्षीप्रमाणे येथील शिवभक्त उमेशबापू पुस्तके,विजय परदेशी यांच्याकडून महाप्रसादाचा उत्कृष्टरित्या नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमास अमोल भिसे,मनोहर घाडगे,विजय भोंगाळे,रंगा साळुंखे,दत्ता पाटोळे,विशाल कांबळे,तानाजी पाटोळे,विक्रम भोंगाळे यांची साथ मिळाली.तर मंदिरातील पुजारी बाबुराव पाटोळे यांनी या धार्मिक कार्यकामाचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य असे नियोजन केल्याचे दिसून आले.

विशेष चौकट - *कर्तव्यासोबत व धार्मिक संस्काराचीही जोपासना*
          मायणी दुरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी महादेव मंदिरास भेट देत कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. आपल्या कर्तव्यासोबतच आपल्या धार्मिक परंपरेच्या संस्काराची जोपासना करीत आपले पती रमेश शिंदे यांचेसोबत महादेवाचे दर्शन घेतले.त्यांच्या या कृतीचे भाविकांनी कौतुक केले.
       
    महाशिवरात्रीनिमित्त येणार्‍या भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करताना उमेश पुस्तके, विजय परदेशी व अमोल भिसे .

    हेमाडपंथीय संगमेश्वर मंदिरास भेट देत महादेवाचे दर्शन घेताना पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर सोबत त्यांचे पती रमेश शिंदे.
        

जागतिक महिला दिना निमित्त कोल्हापूर येथे विविध कार्यक्रम


जागतिक महिला दिना निमित्त कोल्हापूर येथे  विविध कार्यक्रम 
.सातारा दि.1:- प्रा.अजय शेटे 
  श्री बसव लिंग स्वामी यांच्या आशीर्वादाने जागतिक महिला  दिन 8 मार्च चे औचित्य साधून कोल्हापूर येथील श्री बसव  केंद्र.लिंगायत समाज संस्था. व राणी चेन्नमा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कला गुण दर्शन व मनोरंजन कार्यक्रम शनिवार दि.5 मार्च 2022 रोजी दु.3 ते 7 या वेळेत चित्रदुर्ग मठ .दसरा चौक ..कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
..या कार्यक्रमात संगीत खुर्ची स्पर्धा ..लहान व मोठा गट. स्पॉट गेम्स..लहान व मोठा गट.ग्रुप गेम्स.खाद्यपदार्थ स्टॉल .मिमिक्री.कॉमेडी नक्कल लहान गट. म.बसवेश्वर अनुभव मंटप परीक्षेचे प्रशस्तीपत्र वितरण.अशा क्रमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून इचलकरंजी च्या नगराध्यक्षा मा. सौ.अलका ताई स्वामी .मोनार्क स्टील उद्योग समूहाच्या सुप्रसिद्ध उद्योजिका मा. सौ.श्रीदेवी पाटील.तसेच सौ.वैशाली पाटील. सौ.आशा शेंडे या उपस्थितीत राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.राजश्री संतोष सावर्डेकर.उपाध्यक्षा सौ. वारणा वडगावकर..सौ.शुभांगी चितारी.. सौ.अर्चना हिडदुग्गी. श्रीमती नंदा निर्वाणी. कार्याध्यक्षा श्रीमती महानंदा पाटील.सचिव सौ.श्वेता तारळी.सहसचिव सौ.उमा आंबोळे.खजिनदार सौ.स्नेहा शिंत्रे.सल्लागार समिती सौ.सरलाताई पाटील..सौ.मंदाकिनी तंबाके.. सौ.सुजाता वाली..सौ. शिल्पश्री सावर्डेकर..सौ.कांचन ताई पाटील.सौ.सुनीता खोत.सौ.विद्या बनशोडे.कार्यकारी सदस्य सौ. दिपा निर्वाणी..सौ.पूजा आंबोळे..सौ.अवंती तंबाके.सौ.मंगल पाटील.सौ.प्रियांका पंजे.सौ.सुरेखा मुरगुडे.सौ.वैजयंती पाटील..सौ.वंदना जमदाडे..सौ.स्मिता शेटे..सौ.मधुमती मुरदंडे..सौ.शोभा मिरजे..सौ.जयश्री कोरे..सौ.मीना राजमाने..सौ.वैशाली गाडवे ..सौ.श्रद्धा पद्माई..सौ.सुजाता परमाने अशी कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे.
..या कार्यक्रम स्थळी राणी चेन्नमा महिला मंडळाची सभासद नोंदणी पण करण्यात येणार असून विविध गुण दर्शन आणि स्पर्धा तसेच खाद्यपदार्थ स्टॉल मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांक 8975848400..8830357746..9545776699 यावर पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.असे समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे..


युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा अध्यक्ष पदी पत्रकार प्रविण मिरजकर यांची बिनविरोध निवड


युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा अध्यक्ष पदी  पत्रकार प्रविण मिरजकर यांची बिनविरोध निवड
मिरज दि 28 :- प्रतिनिधी
 : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याची शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे बैठक पार पडली
या बैठकीत युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी प्रवीण मिरजकर यांची बिनविरोध निवड झाली. युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
   युवा पत्रकार संघाच्या वर्धापदिनानिमित्त विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहे. या संदर्भात शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे बैठक व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
   या वेळी बोलताना संस्थपाक अध्यक्ष यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व सभासद पदाधिकारी यांना पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवून दिली कोणत्या पद्धतीने कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे याची थोडक्यात रूपरेषा सांगितली
 राज्यस्तरीय पुरस्कार कोणत्या पद्धतीने कोणत्या व्यक्तींसाठी आसतात या मध्ये काय काम केले पाहिजे, अशा सर्व गोष्टींची माहिती सविस्तर त्यांनी सर्व सभासद पदाधिकारी यांना दिली.
  नविन नवोदित पत्रकार यांना मार्गदर्शन केले. पत्रकार संघा मध्ये काम कोणत्या पद्धतीने केले पाहिजे
संघटना कशी चालते अशा अनेक गोष्टंविषयी माहिती त्यांनी दिली.
  तसेच युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या  कोल्हापूर महीला जिल्हा अध्यक्षपदी रविना पाटील यांची निवड करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
 राज्य महीला अध्यक्षा अर्चना चव्हाण व महिला आघाडीच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे कौतुक केले..
यावेळी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य पदाधिकारी तसेच कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते.

वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न


वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न 
वडूज.दि.28. :- .प्रा.अजय शेटे. वडूज प्रतिनिधी 
येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिन सकाळी 8 ते 10 या वेळेत  साजरा करण्यात आला.
..यावेळी  श्रेष्ठ कवी  कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन वरिष्ठ शिक्षिका प्रा. सौ.रोहिणी बडवे यांचे हस्ते करण्यात आले.
..या कार्यक्रमात प्रा.रोहिणी बडवे..प्रा.सौ.ज्योती कुलकर्णी..प्रा.अजय शेटे..प्रा. सौ.राधिका डोंबे..प्रा. संदिप तिवाटणे..प्रा.प्रशांत कुलकर्णी..विद्यार्थी..विद्यार्थिनी  यांची मराठी भाषा गुणगान करणारी भाषणे झाली..सर्वांनी मराठी भाषा गीते गायली..ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.शंकरराव जाधव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषविले व आपले मनोगत व्यक्त केले..
..या वेळी मराठी राजभाषा का ? तिच्या अभिजात दर्जाच्या मागणीचे विशेष..मराठी भाषा इतिहास..संत साहित्य..आधुनिक कविता लेखन..तिचे संरक्षण व संवर्धन या विषयी मनोगते व्यक्त करण्यात आली..
..उच्च न्यायालय नियुक्त सदस्य डॉ.हेमंत पेठे..सतीश शेटे..नितीन जाधव..गोविंद भंडारे यांनी कार्यक्रमास शुभ चिंतन व्यक्त केले ..
..कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.सौ.मंगल काळे यांनी केली. व सूत्रसंचालन प्रा. सौ.ज्योती पाटील यांनी केले.आभार प्रा.रवींद्र येलमर यांनी मानले.
..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सौ.वासंती शेळके..प्रा.निवास मगर..प्रा.शुभांगी पंडीत..विद्यार्थी..विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोण होणार करोडपती चे नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, नावनोंदणी सुरु.


कोण होणार करोडपती चे नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, नावनोंदणी सुरु.
मुंबई १ :- प्रतिनिधी प्रणाली वाकड़े
बुद्धी आणि ज्ञानाच्या जोरावर  पैसे जिंकण्याची संधी देणारा कोण होणार करोडपती चा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येकजण पाहतो पण हे सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरण्याची संधी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा घेऊन आली आहे स्वबळावर आणि ज्ञानावर मिळणाऱ्या यशाची चव चाखण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा . कारण लवकरच येतोय कोण होणार करोडपतीचा पुढचा सिझन हीच आहे वेळ धनलक्ष्मी,प्रतिष्ठा प्रेक्षकांची  मनं जिंकण्याची आणि  कोण होणार करोडपती' या जगविख्यात कार्यक्रमाच्या तिसऱ्या  सिझनमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे.

सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' हा मराठी रियॅलिटी शो अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. मनोरंजनासोबत ज्ञानार्जन' हे वैशिष्ट्यं असणार्‍या या कार्यक्रमात स्वत:ला अवगत अ  सलेलं आणि मिळवलेलं ज्ञान तुम्हाला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतं याची प्रचिती मागील दोन सिझनमुळे सगळ्यांना आली. यंदाही कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर सूत्रसंचालन करणार आहेत. स्वतःचा अभिनय कौशल्याबरोबरच सचिन खेडेकर सहभागिंशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे काम मोठ्या खुबीने करतात, त्यामुळे स्पर्धेतील यंदाही 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर सूत्रसंचालन करणार आहेत. 

स्वत:च्या अभिनय कौशल्याबरोबरच सचिन खेडेकर स्पर्धेतील सहभागींशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे काम मोठ्या खुबीने करतात. त्यामुळे स्पर्धेतील सहभागी स्पर्धक आत्मविश्वासाने खेळअधिक चांगल्या प्रकारे खेळू शकतात.मागच्या वर्षी सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना १० प्रश्न विचारले जात होते. पण यंदा १४ दिवस १४ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. जितके जास्त प्रश्न तितक्याच जास्त संधी. त्यामुळे 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमामध्ये त्वरित सहभागी व्हा. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी २३ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. 

२३ फेब्रुवारी पासून सुरु झालेले हे प्रश्न, ८ मार्च पर्यंत विचारण्यात येणार असून ७०३९०७७७७२  या क्रमांकावर मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह अँपवर जाऊन प्रेक्षक स्वतःची नोंदणी करून घेऊ शकतात.करोडपती होण्याचं तुमचं स्वप्न आता खऱ्या अर्थाने  साकार होऊ शकतं. ज्ञान, मनोरंजन आणि रसिकप्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यासाठी तयार रहा. कारण सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येत आहे, 'कोण होणार करोडपती'!

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...