Wednesday, November 17, 2021

बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री.अक्षय सोनवणे यांचे कामगिरीचा धडाका चालुच

बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री.अक्षय सोनवणे यांचे कामगिरीचा धडाका चालुच 

बलात्काराच्या गुन्ह्यात दोन वर्षापासुन फरारी असलेल्या आरोपीस सिनेस्टाईल पाठलाग करून अटक
फलटण,दि.१७ :- प्रतिनिधी 
 बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री.अक्षय सोनवणे यांनी बलात्काराच्या गुन्ह्यात दोन वर्षापासुन फरारी असलेल्या आरोपीस  पाठलाग करून अटक आज अटक केली. 
ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.नं.१२/२०२० आय.पी.सी.कलम.३६३,३६६,
३७६(२)(एन),२१२,३४ बालकांचा लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण अधिनीयकम २०१२ चे कलम
४,६,१७ प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयातील आरोपी नामे संदिप धनाजी भोसले रा.निंबळक
ता.फलटण जि.सातारा हा गुन्हा घडले पासून सुमारे दोन वर्षापासुन फरार होता.
मा.श्री.अजयकुमार बंसल पोलीस अधिक्षक सो.सातारा व श्री.अजित बो-हाडे अपर पोलीस
अधिक्षक सो.सातारा यांनी जिल्ह्यातील पाहिजे फरारी आरोपी यांना पकडणे बाबत शोध मोहिम राबविलेने श्री.तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी सोा.फलटण, श्री.धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस यांनी पाहिजे फरारी आरोपी पकडणे बाबत अक्षय सोनवणे
सहा.पोलीस निरीक्षक यांना आदेश दिला होता.
अक्षय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक तसेच गणेश अवघडे पोलीस अंमलदार व चालक यादव पो.हया.ब.नं.९७८ असे रात्रगस्त करीत असताना अशाय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक यांना गोपनिय बातमीदार मार्फत सदर फरारी आरोपी हा त्याचे राहते घरी येणार असलेची माहिती मिळालेने सदर
आरोपी यास पकडणे करीता मौजे बाजेगाव ता.फलटण गावचे हद्दीत सापळा रचुन सदर फरारी आरोपी यास पकडणेचा प्रयत्न केला असता सदर आरोपी हा पोलीस गाडी पाहून तेथुन परतुन जावू लागताच अक्षय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक तसेच गणेश अवघडे पोलीस अमलदार यांनी सदर फरारी
आरोपीचा २ किलो मिटर सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास मोठया शिताफीने पकडले. सदर गुन्हयाचा पुढील तपास अक्षय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक हे करीत आहेत. सदरची कामगिरी ही श्री.तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी सो.फलटण,
श्री.धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस यांचे मार्गदर्शनाखाली बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री.अक्षय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक, चालक यादव पो.हवा.घ.नं.९७८
व गणेश अवघडे पो.कॉ.ब.नं.२५०१ यांनी केलेली आहे.

मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ सत्र न्यायालयात बदली


मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ सत्र न्यायालयात बदली करण्यात आली
अहमदनगर दि :- adv शितल बेद्रे प्रतिनिधी
मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून या आदेशावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मात्र अचानक ही बदली झाल्यामुळे कोर्टाच्या वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. न्या. एच. एस. सातभाई हे 'प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँड्रींग ॲक्ट' या विशेष कोर्टाचं कामकाज पाहत होते. सध्या त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची न्यायप्रविष्ट प्रकरणं असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा, हेक्सवर्ल्ड यांसह अन्य काही हायप्रोफाईल प्रकरणांचा यात समावेश होता. मुळचे नाशिकचे असलेले न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह या प्रकरणातील अनेक आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं होतं. ज्यात समीर भुजबळ, पंकज भुजबळ, चमणकर कुटुंबिय आणि अन्य आरोपींचा समावेश होता.



इतकंच नव्हे तर सोमवारीही एच.एस. सातभाई यांच्या कोर्टात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रिमांड, शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांचा अटकपूर्व जामीन तर एकनाथ खडसे यांचं भोसरी प्रकरणही सुनावणीसाठी होतं.

Monday, November 15, 2021

गंगापूरच्या पोलिस नाईकाने दहा हजार रुपयांची मागणीमुळे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात


गंगापूरच्या पोलिस नाईकाने दहा हजार रुपयांची मागणीमुळे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
गंगापूर औरंगाबाद दि  :  adv शितल बेद्रे प्रतिनिधी 
गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक यांनी दहा हजार रुपयांची मागणी (Police demanded Rs 10,000 from Nathe' केल्यामुळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात (In the net of the bribery department)अडकले. पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस नाईक हरिचंद्र अशोक नरके, (Police Naik Harichandra Ashok Narke) ( वय 40) यांनी तक्रारदार यांच्याकडे 10,000/- रु लाचेची मागणी केल्याचे उघडकीस झाल्याने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद (Bribery Prevention Department, Aurangabad) च्या वतीने कारवाई करण्यात आली असून गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिचंद्र अशोक नरके( Harichandra Ashok Narke) यांनी तक्रारदार यांना दाखल गुन्हयात मदत करण्यासाठी व पो.स्टे ला जमा केलेली मोटारसायकल सोडून देण्यासाठी  10,000/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली. या तक्रारींचे अनुषंगाने लाचेच्या मागणीची शहानिशा केली असता, हरिचंद्र अशोक नरके( Harichandra Ashok Narke) , यांनी 10,000/- रुपये लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाणे गंगापूर येथे रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक .डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक मारुती पांडत (Superintendent of Police. Rahul Khade, Upper Superintendent of Police Vishal Khambe, Deputy Superintendent of Police Maruti Pandat) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी (Police Inspector Shubhangi Suryavanshi) यांनी केली आहे.
या कारवाईत त्यांना  पो.ना. राजेंद्र सिनकर, पो अं. विलास चव्हाण, केवलसिंग घुसिंगे, चालक पा.अ. चांगदेव बागुल (Po.Na. Rajendra Sinkar, Po no. Vilas Chavan, Kevalsingh Ghusinge, Driver P.A. Changdev Bagul) यांनी मदत केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका आजपासुन

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका आजपासुन
कोल्हापूर दि 14 :- प्रणाली वाकडे
  मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका आजपासुन सोनी मराठीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका आजपासुन सुरु 
श्री छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर  'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेतून उलगडणार आहे. या मालिकेनिमित्त रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता, कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली. या सोहळ्याला कोल्हापूरचे  श्री छत्रपती शाहू महाराज, इतिहासकार जयसिंगराव पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे,   सोनी मराठी चे बिझनेस हेड श्री. अजय भाळवणकर  यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कलाकार स्वरदा थिगळे, संग्राम समेळ, रोहित देशमुख, अमित देशमुख, यतिन कार्येकर, आनंद काळे हे उपस्थित होते. 

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी  या मालिकेतून  १५  नोव्हेंबरपासून , सोम.-शनि. संध्या.  ७:३०  प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. 

करारी नजर, स्पष्ट शब्दोच्चार, पहाडी आवाज आणि शिवकुळातले जाज्वल्य तेज यांमुळे स्वरदाला प्रेक्षकांची विशेष प्रशंसा लाभते आहे. स्वरदाच्या आजवरच्या अभिनय प्रवासातले हे एक वेगळे आव्हानात्मक रूप आहे. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित ही मालिका ताराराणींचा दुर्दम्य आत्मविश्वास, स्वराज्याप्रती अढळ निष्ठा, स्वराज्यासाठी केलेला त्याग आजच्या पिढीसमोर मांडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या जाज्वल्य इतिहासाचे अपरिचित पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून उलगडणार आहे.

जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे स्वराज्याबद्दलची जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे ताराराणींचे शब्द आणि युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे; हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. 'मराठ्यांच्या मुली ज्या हाताने फुगडी खेळतात, त्याच हाताने गर्दनही मारू शकतात!' ह्या उद्गारातून महाराणी ताराराणींची लढवय्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसली आहे. १५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे,  म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणे!
पहायला विसरू  नका स्वराज्य सौदामिनी ताराराणी , सोम.-शनि.संध्या. ७:३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर. 

प्रमुख उपस्थिती
डॉ. अमोल कोल्हे - (मालिकेचे निर्माते)
श्री. अजय भाळवणकर - (बिझनेस हेड, सोनी मराठी)
●उपस्थित कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखा
स्वरदा थिगळे - स्वराज्य सौदामिनी ताराराणी  
यतीन कार्येकर- औरंगजेब
संग्राम समेळ- छत्रपती राजाराम राजे
संताजी घोरपडे - अमित देशमुख
धनाजी जाधव - रोहित देशमुख
हंबीरराव मोहिते - आनंद काळे

श्रीमंत छ.शिवाजी महाराज यांचा चालता..बोलता..इतिहास... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.

श्रीमंत छ.शिवाजी महाराज यांचा चालता..बोलता..इतिहास...
  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.विशेष लेख
प्रा.अजय शेटे..वडूज.
.. ज्यांनी खऱ्या अर्थाने इतिहास वाचून नाहीतर आपल्या जीवन अनुभवातून जिता.. जागता केला.आपल्या अमोघ वक्तृत्व वाणी ने शिवमहिमा मनामनात व घराघरात पोहचवला.शिवचरित्र नसानसांत भिनवले.ते शिवशाहीर बाबासाहेब उर्फ बळवंत मोरोपंत पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला..
..शिवशाहीर बाबासाहेब यांना 100 वर्षाचे निरामय शतायुषी आयुष्य लाभले.गेली 70 वर्षे ते सत्य इतिहास संशोधनाचे कार्य करत आले.यासाठी त्यांना इतिहास संशोधक  कै.ग. ह.खरे यांचे गुरू म्हणून मार्गदर्शन लाभले.पुणे विद्यापीठाच्या ' मराठा इतिहासाची शकावली ..सन 1740 ते 1764 ' या भारत इतिहास संशोधन मंडळाने केलेल्या प्रकल्पात संशोधक म्हणून कार्य करण्याची मोठी संधी मिळाली .
..त्यांनी ऐत्याहासिक विषयात सावित्री.. जाळ त्या ठिणग्या.. मुजऱ्याचे मानकरी..राजा 
शि वछत्रपति..शेलार खिंड..महाराज.. पुरंदरेंचा सरकारवाडा.. शन वार वाड्यातील शमादान.. शिलंगणाच सो नं..पुरंदरच्या बुरुजावरुन ..कलावंती णी चा सज्जा..महाराजांची राज चिन्हे..पुरंदरे ची नौबत.. ई.साहित्य लेखन केले.राजा छत्रपतीं या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित होऊन 5 लाखा हून अधिक प्रती खपल्या हा एक विक्रम आहे..
..बाबासाहेबांनी शिवचरित्रावर देश..विदेशात मिळून एकूण 12 हजाराच्या वर व्याख्याने दिली हा पण एक विक्रम आहे..
..त्यांनी  छ.शिवरायांच्या जीवनावरील ' जाणता राजा ' या भव्यदिव्य दृश्य नाटकाचे दिग्दर्शनही केले .या महा नाट्याचे निर्माते म्हणून त्यांनी गेल्या 27 वर्षात 1250 हून अधिक प्रयोग केले.हे नाटक मराठी..हिंदी..इंग्रजी सह इतर 5 देशी..विदेशी भाषेत अनुवादित झाले.या नाटकात एकूण 150 स्त्री..पुरुष कलावंत काम करतात.शिवाय 4 हत्ती  व 20 घोडे यांची पण महत्वाची भूमिका आहे.या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी कमीत कमी 10 एकराचे मैदान लागते. व तेथील फिरता रंगमंच उभारणीसाठी आधीचे 10 दिवस व उतरविण्यासाठी नंतरचे 5 दिवस लागतात..हा पण एक विक्रम आहे..
..त्यांच्या या ऐत्याहसिक कार्याची दखल घेवून सन 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांचा ' महाराष्ट्र भूषण '  व भारत सरकारने सन 2019 मध्ये ' पद्मविभूषण ' हा सर्वोच्च पुरस्कार देवून  त्यांचे देशप्रेमी कार्याचा गौरव केला आहे..
..वंदनीय बाबासाहेब नेहमी म्हणत ..मी छ.शिवाजी महाराजांच्या पायाचा पावन स्पर्श झालेल्या  प्रत्येक जागेवर पोहचलो आहे..एक स्वर्ग फक्त बाकी राहिलाय..
आज त्यांनी आपली ती अखेरची इच्छा पण पूर्ण करून घेतली..
.. महाराष्टातील गड किल्ले..मराठा साम्राज्य..ऐत्याहसिक दस्तऐवज व कागदपत्रे यांच्याकडे तरुणांना नव्या अभ्यासू दृष्टीने पाहण्याचा आयाम देणारा एक महान शिवशाहीर देह रूपाने आपल्या तून निघून गेला असला तरी तो त्यांच्या ऐत्याहसिक कार्य..कीर्ती रूपाने आपल्या स्मरणात कायम राहील...
..वंदनीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तमाम जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा .. मानाचा मुजरा..**

Friday, November 12, 2021

स्वराज्याची महाराणी ताराराणींना शोभायात्रेतून मानवंदना


स्वराज्याची महाराणी ताराराणींना शोभायात्रेतून मानवंदना  
कोल्हापूर दि १२ :  विशेष प्रतिनिधी श्रीपती कोरे
ज्या विरांगनेपुढे औरंगजेब निष्प्रभ ठरला अशी, हिंदुत्व रक्षणासाठी मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले अश्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या  कन्या ,आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री ताराराणीं अशा या रणरागिणीची शौर्य गाथा सर्वांपर्यंत पोहचावी या उद्देशाने सोनी मराठी घेऊन येत आहे स्वराज्य सौदामिनी ताराराणी. 

या मालिकेनिमित्त १४ नोव्हेंबर रविवारी, कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथून १. ३ किलो मी पर्यंत शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. सरसेनापती संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो  कि पळो करून सोडणाऱ्या रणरागिणी, करवीर संस्थापिका सेनानी महाराणी ताराराणी यांना ढोल ताशांच्या गर्जनात, साहसी खेळांच्या रूपात, ढाल - तलवार भगवा फडकवत, इतिहासाचा जागर करत या शोभायात्रेच्या माध्यमातून मानवंदना दिली जाणार आहे. या सोहळ्याला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून कलाकार स्वरदा थिगळे, संग्राम समेळ, रोहित देशमुख, अमित देशमुख, यतिन कार्येकर हेही उपस्थित असतील.

Saturday, November 6, 2021

अस्तित्व फाऊंडेशन सातारा जिल्हा अध्यक्ष पदी रविंद्र वाकडे यांची नियुक्ती

अस्तित्व फाऊंडेशन सातारा जिल्हा अध्यक्ष पदी रविंद्र वाकडे यांची नियुक्ती सातारा दि 4 :- प्रतिनिधी महादेव मेंडगीरी , उंब्रज तालुका कराड येथील पत्रकार आनि सामाजिक कार्यकर्ते रविंद्र वाकडे यांची निवड, अस्तित्व फाऊंडेशन चे अध्यक् आणी शिवचरित्रकार शुभम चौहान आणि सौ वैष्णवी भोर सचिव अस्तित्व फाऊंडेशन यांनी सातारा जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करन्यात आली, सातारा जिल्ह्यातील कामाची दखल घेत रविंद्र वाकडे यांचे वर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली ,यावेळी रविंद्र वाकडे म्हणाले की अस्तित्व फाऊंडेशन यांच्या माध्यमातून जास्तीत युवकांनापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार , शिवचरित्र पोहोचविणार आहोत,त्यांच्या या निवडी बद्दल उंब्रज मधील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...