Friday, September 10, 2021
वीरशैवांचा आधारवड कोसळला माजलगांवकर महाराज शिवचरणी लीन
Thursday, September 9, 2021
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पुणे शहरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.पुण्यात आजपासून कलम 144 लागू; उल्लंघन केल्यास कारवाई
Monday, September 6, 2021
शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम कर्तव्यभावनेतून करा – जगदाळे,स्वाती चेणगे - बाजारे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
Sunday, September 5, 2021
उंब्रज येथील प्रसिद्ध उद्योजक मा राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार प्रदान
Saturday, September 4, 2021
राज्य सरकारच्या सहकार समिती वर सदस्य पदीलिंगायत संघर्ष समिती चे समन्वयक, लिंगायत लोकनेते मा काकासाहेब कोयटे यांची निवड
Thursday, September 2, 2021
लिंगायत समाजातील उद्योजक राजेंद्र प्रल्हाद घुटे यांनावीरशैव ईंटरनँशनल असोसिएशन चे सदस्य उद्योजक मा राजेंद्र घुटे चेअरमन सत्यम पेट्रोकेमीकल्स यांना अत्यंत प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला पुरस्कार तसेच बिझनेस मँनेजमेंट क्षेत्रातील योगदानाबद्दल अमेरिकन युनिव्हर्सिटी कडुन डॉक्टरेट पदवी जाहीर,
उद्योजक राजेंद्र प्रल्हाद घुटे सत्यम पेट्रोकेमिकल्स उंब्रज तालुका कराड यांना जागतिक नेल्सन मंडेला पुरस्कार जाहीर
लिंगायत समाजातील उद्योजक राजेंद्र प्रल्हाद घुटे सत्यम पेट्रोकेमिकल्स उंब्रज तालुका कराड यांना जागतिक शांततेसाठी नेल्सन मंडेला पुरस्कार जाहीरउंब्रज दि 3
उंब्रज तालुका कराड येथील प्रसिद्ध लिंगायत समाजातील जेष्ठ उद्योजक राजेंद्र प्रल्हाद घुटे सत्यम पेट्रोकेमिकल्स उंब्रज तालुका कराड यांना जागतिक शांततेसाठी नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रात काही भरीव कामगिरी केल्याबद्दल अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए कडून डॉक्टरेट पदवी देखील देण्यात आली आहे. हा पुरस्कार 4 सप्टेंबर 2021 रोजी ताज हॉटेल, अहमदाबाद येथे अत्यंत प्रतिष्ठित लोक आणि सुप्रसिद्ध व्यक्तींच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.
वीरशैव ईंटरनँशनल असोसिएशन
चे सदस्य उद्योजक मा राजेंद्र घुटे चेअरमन सत्यम पेट्रोकेमीकल्स यांना अत्यंत प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला पुरस्कार तसेच बिझनेस मँनेजमेंट क्षेत्रातील योगदानाबद्दल अमेरिकन युनिव्हर्सिटी कडुन डॉक्टरेट पदवी जाहीर,
असा पुरस्कार व पदवी मिळविणारे महाराष्ट्रातील व लिंगायत समाजातील एकमेव असणारे मा राजेंद्र घुटे यांचे वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समिती समस्त लिंगायत समाज उंब्रज यांचे वतीने हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस

Tuesday, August 31, 2021
नांदगाव च्या तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश पाटील यांची तर जयवंत मोहिते यांची उपाध्यक्षपदी निवड
नांदगाव च्या तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश पाटील यांची तर जयवंत मोहिते यांची उपाध्यक्षपदी निवड
कराड दि ३० प्रतिनिधी नांदगाव (ता. कराड) येथील ग्रामसभा सोमवार (दि 30) रोजी गोंधळात पार पडली. सभेमध्ये तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गणेश पाटील तर उपाध्यक्षपदी जयवंत मोहिते यांची बहुमताने निवड करण्यात आली. विरोधी उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले.
कोरोना महामारीमुळे नांदगाव ची लांबलेली पहिली ग्रामसभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये तंटामुक्तीसह अन्य समितींच्या निवडी होणार असल्याने ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी 11:30 वाजता सुरू झालेली ग्रामसभा दुपारी 3:30 पर्यंत चालली. पण ग्रामस्थ ठिय्या मांडून बसले होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच हंबीर पाटील होते. मात्र तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवडीवरून बरीच ताणाताणी झाल्यानंतर त्यांनी मधूनच हे अध्यक्षपद सोडले. उपसरपंच अधिकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पुढे सुरू राहिली .यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, अमोल कांबळे, डॉ. शुभांगी माळी, अनिता पाटील, गौरी मोरे, ग्रामसेवक मोहन शेळके यांची उपस्थिती होती. सभेमध्ये बहुमताने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडण्यात आले .
निवडीनंतर दक्षिण मांड व्हॅली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वि. तु. सुकरे- गुरुजी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते पोपटराव पाटील, शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सतीश कडोले, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, डॉ. नरेंद्र माळी, हितेश सूर्वे, दत्तात्रय माटेकर, सागर कुंभार, विजय पाटील, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, शिवाजी माळी, अरविंद पाटील, अधिकराव पाटील, विलास माटेकर, सयाजी शिंदे, अशोक शिंदे, संग्राम पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या निवडी यशस्वी करण्यासाठी युवा नेते पोपट पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक टी. के. पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हिंदुराव पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगन्नाथ माळी, दिनकरराव पाटील, विजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण ...
-
कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम अ...
-
महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,दि. 18 रोजी बसव भूषण पुरस्कार 2024 चे वितरण. सातारा, दि.16 - रविंद्र वाकडे महात...


