श्री क्षेत्र बसवकल्याण येथे ' अनुभव मंटप ' उत्सवाचे आयोजन
श्री क्षेत्र बसवकल्याण येथे ' अनुभव मंटप ' उत्सवाचे आयोजन
सातारा, दि.25 - प्रा.अजय शेटे
भालकी येथील हिरेमठ संस्थांनचे मठाधिश व महाराष्ट्र बसव परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बसवलिंग पट्टदेवरू यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि.26 व रविवार दि.27 नोव्हेंबर 2022 रोजी लिंगायत धर्माचे श्री क्षेत्र बसवकल्याण येथे दोन दिवसीय राष्ट्रीय अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.+
म.बसवेश्वर व समकालीन भक्तांची कायकभुमी , क्रांतिभूमी म्हणजे श्री क्षेत्र बसव कल्याण होय.या ऐत्याहसिक नगरीत म.बसवेश्वर यांनी जगातील पहिल्या लोकशाही संसदेचे प्रारूप असलेल्या अनुभव मंट पाची स्थापना केली.
सुरुवातीला 770 शरण हे त्या अनुभव मंटपाचे सदस्य होते.शर णांच्या या सामूहिक संवादातून वचन साहित्य निर्माण झाले आणि त्यातून घडून आलेली कल्याण क्रांती ही देशातील दुःख ,दारिद्र्य,अज्ञान,अंधश्रद्धा ,जातीयता,अस्पृश्यता,लिंगभेद,
वर्णभेद व पुरोहितशाही नाकारून सकल जीवाम्यांच्या कल्याणासाठी कार्यरुपात आणलेली अप्रतिम समग्र क्रांती होती.भारतभर विखुरलेला लिंगायत समाज आणि सर्व समतावादी विचारधारा एकत्र याव्यात .या हेतूने गेल्या 42 वर्षांपासून डॉ. पट्टदेवरू दरवर्षी राष्ट्रीय अनुभव मंटपाचे आयोजन करतात..कर्नाटक राज्यातील श्री क्षेत्र बसवकल्याण येथे 26 व 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या उत्सवात चिंतन सभा,विविध विषयावर मान्यवरांची व्याख्याने,तसेच मराठी भाषेतील इतर आठ ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे.
तरी सदर कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र बसव परिषदेचे राज्या ध्यक्ष मा. बी.एम.पाटील आणि संचालक राजू जुबरे यांनी केले आहे.**



No comments:
Post a Comment