शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा
असणारा उंब्रज चा सुप्रसिद्ध भीम - कुंती उत्सव ,
या उत्सव कालावधीत भीमसेन आणि माता कुंती यांची पूजा करण्याचा मान हा उंब्रज येथील लिंगायत समाजातील बबनराव मेणकर यांचे कुटुंबाकडे असतो सध्या बबन मेणकर यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव विकास मेणकर आणि कुटुंबीय करत आहेत .
शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणारा उंब्रज चा
सुप्रसिद्ध भीम - कुंती उत्सव
उंब्रज, दि.3 - रविंद्र वाकडे.
उंब्रज, जि.सातारा येथील अतिशय श्रध्देचा व ऐतीहासिक परंपरा असलेला भीम - कुंती पंचक्रोशी उत्सव हा गेली शेकडो वर्षे सर्व धर्म समभाव आणि ऐक्याची परंपरा जोपासणारा उत्सव आहे.पवित्र श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी तो साजरा केला जातो.
उंब्रज हे गाव तारळी, उत्तरमांड व कृष्णामाई या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले
असून या गावाला ऐंतिहसिक व धार्मिक असा वारसा लाभलेला आहे. या गावाचे आराध्य दैवत
श्री उमेश्वर महादेव असून शेजारीच कोटी गावचे दैवत श्री कोटेश्वर व वडोली येथील
दैवत श्री भिकेश्वर अशा तीन दैवतांच्या सानिध्यात व पवित्र कृष्णामाईच्या काठावर
उंब्रज हे गाव वसलेले आहे.शिवाय येथेच पवित्र कृष्णामाई पूर्वाभिमुखी होते.
------------------------------------------------------------------------------------
संपूर्ण
देशभरात फक्त महाराष्ट्रामधील कराड तालुक्यात उंब्रज येथेच हा उस्तव एवढ्या मोठ्या
प्रमाणात साजरा करण्यात येतो उंब्रज नंतर तारळे आणि उरुल तालुका पाटण येथे हि हा उस्तव
साजरा केला जातो मात्र उंब्रज येथील उस्तव हा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला
जातो याला शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे
------------------------------------------------------------------------------------
श्रावणातील शेवटच्या
सोमवारी माता कुंती व भीम या माय - लेकरांची पारंपरिक पद्धतीने भेट होते.हा उत्सव
येथे भीम - कुंती उत्सव म्हणून ओळखला जातो. गजराजावरील अंबारीतून कुंती भीमाच्या
दर्शनासाठी मिरवणुकीने जात होती मात्र गेल्या काही वर्षापासून मिरवणुकीसाठी रथाचा वापर
केला जातो ,नंतर या उत्सवा सांगता होते.
तथापि या उत्सवाला जवळ जवळ 400 वर्षाची परंपरा आहे.असा दावा याच गावातील अनेक जेष्ठ नागरिक जाणकार दंतकथेच्या आधारे करतात.सुमारे चारशे वर्षांपूर्वी उंब्रज येथील कासार पाटील यांचा मुलगा खूप आजारी पडला होता.अनेक गुणकारी दवा-पाणी घेवून सुद्धा त्याच्या तब्ब्येतीत तिळमात्र फरक पडत नव्हता.पाटील यांच्या घरातील सर्व मंडळी निराश झाली होती.कोणताच पर्याय त्यांच्या समोर उरला नसताना धार्मिक वृत्ती असणाऱ्या पाटील यांनी भीमसेन महाराज यांची मातीची मूर्ती तयार करीन अशी मनोकामना केली .तसे काही दिवसातच त्यांना त्यांच्या मनोकामनेचे फळ मिळाले व त्यांचा मुलगा थोड्याच दिवसात एकदम ठणठणीत बरा झाला.तेव्हापासून ते आज अखेर उंब्रज पंचक्रोशीत व्यापारी पेठेत भीम - कुंती उत्सव साजरा होत आहे. माता कुंती व भीमसेन महाराज पाटलांच्या नवसास पावल्याचे वृत्त वेगाने पंचक्रोशीत पसरले. रंजले - गांजलेले सर्वजण या उत्सवास हजेरी लावू लागले.भीम - कुंती सर्वांच्याच नवसास पावू लागले.हळूहळू ही यात्रा विराट रूप धारण करू लागली .त्यानंतर गेली शेकडो वर्षे ही यात्रा अखंड चालू आहे.या यात्रेस परिसरातील लोक हजारोंच्या संख्येने येत असतात.उंब्रज हे या परिसरातील प्रमुख बाजार पेठेचे ठिकाण असल्याने व्यापारी व शेतकरी यांची येते सतत वर्दळ असते.त्यामुळे व्यापारी व शेतकरी यांच्यात एकोपा रहावा म्हणून हा उत्सव जोरात साजरा करण्यात येवू लागला.शेतकऱ्यांमध्ये कष्ट करण्यासाठी भीमा सारखी ताकद यावी.असाही या यात्रेमागचा उद्देश असल्याचे सांगितले जाते.
********************************************************************
कराड ते वाई हा परिसर
पांडवकालीन काळातील दंडकारण्य या नावानी प्रसिद्ध आहे या काळात पांडवांचे अज्ञातवासातील शेवटचे 1 वर्ष हे पांडवांनी सातारा जिल्ह्यात व्यथित केले आहे त्यांनी आपला अज्ञातवासातील शेवटचा 1 वर्षा चा काळ हा कराड आगाशिवनगर
ते वाई या भागात घालवला या काळात त्यांनी आपले वास्तव्य हे डोंगरावर अज्ञात ठिकाणी महादेवाची मंदीरे डोंगर कपारीत खोदुन काढली आणि या ठिकाणी त्यांनी आपले वास्तव्य केले या मध्ये
आगाशिवनगर येथील पांडवकालीन लेणी , पाटण तालुक्यातील नारळवाडी येथील रुद्रेश्वर महादेव मंदिर , मांडवे नागठाणे , येथे भैरवगड, वाई येथील किचन टेकडी येथे शेवटचे वास्तव्य झाले वाई येथे असणारा हा ओढा कीचक ओढाया नावाने ओळखला
जातो भीमसेन यांचे कडून याच ठिकाणी किचकाचा वध झाला या नंतर भीमसेन यांनी आपल्या अंगावर उडालेले रक्त आणि वस्त्र धुण्यासाठी
उंब्रज तालुका कराड येथील कृष्णा नदीवर आले होते , त्यांच्या पद स्पर्शाने उंब्रज हे गाव पावन झाले आहे. अशी अख्यायिका शेकडो वर्षांपासून सांगितली जात आहे पांडवांच्या
वास्तव्या बाबतीत पुरावे देखील आहेत
*********************************************************************
या वेळी ढोल ताशे वाजवले
जातात.ग्राम प्रदक्षिणा पूर्ण झाल्या नंतर भीम चौकात भीम कुंतीच्या भेटीचा
कार्यक्रम होतो.
त्यावेळी येथे जमलेल्या
भाविकांना डोळ्याचे पारणे फिटल्याचा भास होतो. हा मंगलमय क्षण सर्वांना आनंदी
करतो.नंतर भीम व कुंतीची मूर्ती सर्व भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते .एक महिना
भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते व नवस ही बोलले जात असतात .
गतवर्षीचे ज्यांचे नवस पूर्ण झाले आहेत.ते भिमासाठी धोनचा व कुंती मातेसाठी चोळी - खण नारळाचे तोरण अर्पण करतात.भीम - कुंतीच्या पूजा अर्चेचे काम श्री. मेनकर कुटुंबीय पाहतात.या सर्व कामात भीमसेन मंडलाचे कार्यकर्ते ग्रामस्थ आणि युवक सहभागी होत असतात .एक महिन्या नंतर भाद्रपद पौर्णिमेला भीम - कुंती यांच्या भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. या साठी सुमारे २१ पायली धान्य वापरले जाते ,
भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी श्री भीमसेन - माता कुंती यांना
दर्शनासाठी दिल्ली दरवाजा येथे आणले जाते.सर्व भाविक त्या संध्याकाळी दर्शनाचा लाभ
घेतात तसेच ज्या भाविकांचे नवस पूर्ण झाले आहेत ते भाविक आपले नवस या ठिकाणी पूर्ण
करतात .यावेळी मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा व इतर कार्यक्रम ठेवले जातात.तसेच भजन
किर्तनाचा पण कार्यक्रम आयोजित केला जातो.त्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम होऊन श्री
भीमसेन - माताकुंती यांच्या प्रतिमा विसर्जनासाठी कृष्णा नदीच्या काठावर नेल्या
जातात.हा ' भीम गाडा ' ओढण्यासाठी तरुण आणि भाविक मोठ्या संख्येनी उपस्थित सहभागी होतात
.पुढे कोळी घाटावर घाटावर श्री भीमसेन - माताकुंती यांची आरती करण्यात येवून परिसरातून येणारे
भाविक आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस बोलतात,या नंतर मूर्तींचे विधिपूर्वक
विसर्जन केले जाते सुरुवातीला कोलीवाद्यामधील कोळी बांधव हे मत कुंती यांच्या
प्रतिमेला आपल्या होडीतून नदीच्या पात्रात पाच प्रदक्षिणा घालून विसर्जन केले जात
होते कालांतरानी होड्या बंद झाल्यावर साध्या प्रकारे माताकुंती मूर्तींचे विसर्जन
करून श्री भीमसेनयांच्या प्रतिमेचे विसर्जन करण्यात येते या नंतर या उत्सवाची
सांगता होते.
आजच्या बदलत्या काळाबरोबर
उत्सवाचे स्वरूप ही बदलू लागले आहे.मात्र भाविकांच्या मनात या उत्सवाबद्दल मनातील
श्रद्धा आजही कायम आहे . या उस्तव कालावधीत भीमसेन आणि माता कुंती यांची पूजा
करण्याचा मान हा उंब्रज येथील लिंगायत समाजातील बबनराव मेणकर यांचे कुटुंबाकडे
असतो सध्या बबन मेणकर यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव विकास मेणकर आणि कुटुंबीय करत
आहेत .
भीमसेन उत्सव मंडळ ,ग्रामपंचायत उंब्रज तसेच उंब्रज पोलीस स्टेशन चे सपोनि अजय गोरड आणि सर्व कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य करून हा
सदरचा सोहळा योग्य रित्या संपन्न होणेसाठी योग्य ते नियोजन
करून घेतात आणि हा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत माता कुंती आणि पुत्र भीमसेन
यांच्या भेटीचा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा होतो
हे मात्र निश्चित . भीम राजेश राजेश महाराज की जय
विशेष लेख रवींद्र वाकडे



No comments:
Post a Comment