सोलापूरचे आमदार मा.विजयकुमार देशमुख मालक यांचा नवीन महाराष्ट्र मंत्रिमंडळात तातडीने समावेश करावा
-लिंगायत लोकनेते मा.काकासाहेब कोयटे यांची मागणी
सोलापूरचे आमदार मा.विजयकुमार देशमुख मालक यांचा नवीन महाराष्ट्र मंत्रिमंडळात तातडीने समावेश करावा
-लिंगायत लोकनेते मा.काकासाहेब कोयटे यांची मागणी -
सातारा, दि.12 - प्रसाद वाकडे. प्रतिनिधी
वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोट जातींना ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे व सोलापूरचे आमदार मा.विजयकुमार देशमुख मालक यांचा समावेश लिंगायत समाजाचे प्रतिनिधी म्हणून नवीन महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात तातडीने करावा .अशी आग्रही मागणी लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक व लिंगायत लोकनेते मा.काकासाहेब कोयटे यांनी तुळजापूर येथे नूतन काशी जगद्गुरु प. पू.1008 डॉ.मल्लिकार्जुन महास्वामीजी महाराज यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी केली.
यावेळी वंदनीय प.पू. काशी जगद्गुरु यांच्यासमोर एक ठरावच संमत करण्यात आला व त्यास त्यांच्यासह सर्व लिंगायत समाज बांधवांनी अनुमोदन दिले.तसेच या पुढील काळात आपल्या समाजाच्या सर्व मागण्या या सरकारला मान्य करावयास लावू,असा निर्धार उपस्थित इतर सर्व प. पू.शिवाचार्य , मा.मंत्री बसवराज पाटील , आ. राणा जगजितसिंह, माजी मंत्री मधुकर चव्हाण, मा.बसवराज मंगरूळे,लिंगायत संघर्ष समिती चे अध्यक्ष मा.सुनिलशेठ रुकारी,कोषाध्यक्ष मा.राजाभाऊ मुंडे,संघटक मा.गुरुनाथ बडुरे तसेच धाराशिव व सोलापूर येथील सर्व समाज बांधवांनी केला.




No comments:
Post a Comment