Saturday, September 10, 2022

शंतनु पिंगळे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस रवाना

                       

                   शंतनु पिंगळे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस रवाना 


                  शंतनु पिंगळे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस रवाना 



सातारा, दि.10 -प्रसाद  वाकडे. लिंगायत TV Live प्रतिनिधी 

 भांबर्डे ता.शिरूर येथील शंतनु चांगदेव पिंगळे हे अमेरिकेतील नॉर्थ युनिव्हर्सिटी येथे एम.एस.( माहिती व तंत्रज्ञान ) या उच्च शिक्षणासाठी नुकतेच रवाना झाले आहेत.

त्यांचे प्राथमिक  आणि माध्यमिक शिक्षण सेंट व्हीसेट स्कूल ,पुणे.उच्च माध्यमिक शिक्षण फर्ग्युसन कॉलेज,पुणे .तसेच बी.टेक.( आय. टी.) हे पदवी शिक्षण  विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ,पुणे या महाविद्यालयात पूर्ण झाले आहे.


   शंतनु हे अंबिका शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.चांगदेव पिंगळे यांचे चिरंजीव तर अंबिका विविध कार्यकारी  सेवा सोसायटीचे संचालक दशरथ पिंगळे यांचे पुतणे आहेत.

शंतनु यांची अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी निवड झाल्या बद्दल अंबिका शिक्षण संस्थेचे सचिव बापूराव पवार,संचालक रामभाऊ पवार,दशरथ पवार,हनुमंत पवार,शिवाजी वीर यांच्यासह  अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.




No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...