हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
सातारा, दि.1 - प्रा.अजय शेटे.प्रतिनिधी लिंगायत TV live
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 22 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियन सातारा कमांडींग ऑफीसर कर्नल दिपक टोंगे व ॲडम ऑफीसर कर्नल मोहन भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली येथील हु. प.विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये शनिवार ,दि.27 रोजी सकाळी 8.30ते 10.30 या वेळेत मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. वडूज ते पिंगळी या मार्गावर ही स्पर्धा होताना मुलांसाठी 10 किमी तर मुलींसाठी 5 किलोमीटर ची स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेची सुरुवात शाळा संकुला पासून उपप्राचार्य एम.एस.गोडसे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली.त्यावेळी पर्यवेक्षक दिलीप फडतरे,पर्यवेक्षिका बी.एस.माने ,वरिष्ठ विज्ञान शिक्षक डी.सी. पंडीत ,एस.पी.जोशी मॅडम हजर होते.स्पर्धा मार्गावर ए.के.माने, जे. टी.धुळप,एस.आर.जाधव, ए.जी.भंडारे, के.जे.कांबळे,एस. ए.स्वामी,एस,आर,फडतरे , व्ही. टी.पवार,सी.जे.बहिरम,पी.जे.
पाखले सौ. एस.एच.काळे,आर.सी.जाधव, आर. आर. गाडवे, एम. ए.शेटे मॅडम ,प्रा. एस.जी.तिवाटने,प्रा.आर.बी. येलमर , ए.एम.राऊत, डी.एम. लहारे ,एस. डी.घनवटआर.बी.काळे.एस.एस.जामदार, एम.बी.भोकरे, के. व्हीं.लोखंडे,एस.एस
चव्हाण यांनी ठिकठिकाणी स्पर्धक विद्यार्थी - विद्यार्थिनींची योग्य ती काळजी घेतली.
क्रीडा प्रशिक्षक आर,एस, जगदाळे व प्रा.एन,एस,मगर यांनी या स्पर्धेचे अतिशय उत्तम नियोजन करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
वडूज पोलीस स्टेशन तर्फे संपूर्ण स्पर्धा रस्त्यावर संपूर्ण वाहतूक नियंत्रणाची काळजी घेण्यात आली.तसेच वडूज ग्रामीण रुग्णालय यांचेतर्फे फिरती अँब्युलन्स सज्ज ठेवण्यात आली होती. वडूजच्या नगराध्यक्षा मनिषा रविंद्र काळे यांचे तर्फे विजयी स्पर्धकांना चषक बक्षीस देण्यात आले.
यामध्ये एन.सी.सी.कॅडेट यश चंद्रकांत तुपे, कु.सायली कैलास शिंगाडे व
ज्युनियर कॉलेज मधील चि.उत्कर्ष उत्तम खाडे,12क. निरंजन अनिल जगताप , 11अ.दिपक भगवान जाधव ,12 अ,शुभम राजकुमार पवार,11 अ. कु.प्रतिमा कालीदास इंगळे , 12अ.प्राजक्ता चंद्रकांत जानकर , 11ड,आरती उमेश चव्हाण, 11ड.या स्पर्धकांनी अनुक्रमे विजय प्राप्त करून चषक प्राप्त केले.त्यांचा विशेष सत्कार ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.एस बी.जाधव,प्रा. सौ.आर आर.बडवे यांचे हस्ते करण्यात आला.
यशस्वी स्पर्धक व आयोजक यांचे वडूज शिक्षण विकास मंडळ तांचेतर्फे खास अभिनंदन करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांचे खूप मोठे सहकार्य लाभले.



No comments:
Post a Comment