लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे करणार आशिया खंडात भारत देशातील सहकार क्षेत्राचे नेतृत्व
सातारा, दि.3 - प्रसाद वाकडे प्रतिनिधी लिंगायत TV live
बँकॉक, थायलंड येथे सुरू असलेल्या 32 देशांच्या शिखर संघटनेच्या एशियन क्रेडिट युनियनच्या ४१ व्या जनरल मि टिंग मध्ये देशाच्या इतिहासात प्रथमच भारताचे प्रतिनिधी म्हणून लिंगायत लोकनेते श्री.काकासाहेब कोयटे यांची संचालक व कोषाध्यक्ष पदी व बहुमताने निवड करण्यात आली.
आजपर्यंत हा बहुमान कुठल्याही भारतीयाला मिळालेला नाही तो बहुमान आपल्या समाजाचे मा. काकासाहेब कोयटे यांना त्यांच्या सामाजिक, सहकार क्षेत्रातील योगदानामुळे मिळाला. याचा सर्व लिंगायतांना अभिमान व गर्व आहे.
लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे यांच्या या यशाबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृह व सहकार मंत्री मा. अमितभाई शहा, मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेष्ठ नेते शरदचंद्र पवार, कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री मा. बी एस येडीयुरप्पा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, अशा सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
काकासाहेब आपला सर्व समाजबांधवांना सार्थ अभिमान आहे व पुढील कार्यास
लिंगायत संघर्ष समिती ,महाराष्ट्र.
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन,वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही लाईव्ह यांचे तर्फे हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.

No comments:
Post a Comment