Tuesday, August 9, 2022

जिथे सत्य आहे तिथेच परमात्मा : श्री काशी जगद्गुरू वीरशैव सिद्धांत परीक्षेच्या प्रमाणपत्रांचे वितरण


जिथे सत्य आहे तिथेच परमात्मा : श्री काशी जगद्गुरू 
वीरशैव सिद्धांत परीक्षेच्या प्रमाणपत्रांचे वितरण
पुणे दि 8 : - राजशेखर बुरुकुले लिंगायत TV live प्रतिनिधी
 धर्मात अनेक व्रत आहेत. त्यापैकी सत्य हे एक व्रतच आहे. परमेश्वराने आपल्याला वाणी सत्य बोलण्यासाठीच दिली आहे. धर्माचरणाचे जे मार्ग आहेत त्यापैकी सत्य हा देखील एक मार्ग आहे. जिथे सत्य आहे तिथेच परमात्मा आहे. सत्य बोलल्यामुळे पूज्यता येते. सत्यम् शिवम् सुंदरम् असे त्यासाठीच म्हटले आहे. असत्य बोलून केलेली पूजा, दान, ध्यानधारणा फळास येत नाही. असे प्रतिपादन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
                 श्री काशी जगद्गुरू विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ, जंगमवाडी मठ, वाराणसीतर्फे वीरशैव सिद्धांत परीक्षेच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी आशीर्वचनपर ते बोलत होते. याप्रसंगी ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य, औंधकर महाराज, खंडूशेठ चिंचवडे, विकास साने उपस्थित होते.
                 यावेळी प्रबोध परीक्षेतील जगद्गुरू विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी प्रथम पारितोषिक माधुरी पाटील (सोलापूर), जगद्गुरू वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी द्वितीय परितोषिक शुभांगी अरळीमार (सोलापूर), जगद्गुरू विश्वेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तृतीय परितोषिक विभागून चिन्मयी सोपल (बार्शी), शिवकन्या मल्लिकार्जुन दळवे (बार्शी) यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले.

            तसेच प्रविण परीक्षेतील जगद्गुरू विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी प्रथम पारितोषिक महात्मा हत्ते (परळी वैजनाथ), जगद्गुरू वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी द्वितीय परितोषिक सुभद्रा संकद (सोलापूर), जगद्गुरू विश्वेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तृतीय परितोषिक नूतन जंगम (मुंबई) यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले.
           महास्वामीजी पुढे म्हणाले की, 'सा विद्या, या विमुक्तये' म्हणजे विदयेमुळे संसारातून व्यक्ती मुक्त होतो. सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये अध्यात्मिक विद्या सर्वश्रेष्ठ आहे. त्याकरिता श्री काशी जगद्गुरु विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठाची स्थापना केली. आतापर्यंत सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांनी या विद्यापीठातून वीरशैव सिद्धांतांचा अभ्यास केला आहे. 

            यावेळी सामाजिक कार्यकर्ते संगीता जोशी व किशोर जोशी (भाळभोर) यांचा महास्वामीजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र बलसुरे यांनी केले. सूत्रसंचालन रेवणसिद्ध वाडकर यांनी तर गुरुशांत रामपूरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चेतना गौरशेटे, राजशेखर बुरकुले, महेश स्वामी, रोहिणी स्वामी यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी : काशीपीठाच्या वीरशैव सिद्धान्त इच्छा प्रमाणपत्र वितरणप्रसंगी काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य, औंधकर महाराज, खंडूशेठ चिंचवडे, डॉ. अनिल सर्जे, रेवणसिद्ध वाडकर, राजेंद्र बलसुरे, राजशेखर बुरकुले, गुरुशांत रामपुरे, चेतना गौरशेटे

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...