अंश खलिपे यांची दुसऱ्या टप्यातील लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी
कडेगाव दि ८ ;- दिव्या महाजन प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील अश्विनी खलिपे हिने लिंग परिवर्तनाचा निर्णय घेतला आणि त्यानं अंश खलिपे नाव धारण केले होते. 4 महिन्यांपूर्वी त्याने लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेचा पहिल्या टप्पा पूर्ण केला होता. त्यातून बरा झालेनंतर दुसऱ्या टप्यातील शस्त्रक्रिया ही नुकतीच दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये डॉ.भिमसिंग नंदा यांनी 20 एप्रिल रोजी यशस्वीपणे पुर्ण केली. आता यातुन अंश 6-8 महिन्यात पुर्णपणे बरा होईल. त्यानंतर लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा 3 केला जाणार असल्याचे सर गंगाराम हॉस्पिटलचे डॉ भिमसिंग नंदा यांनी सांगितले.
अंश खलिपे याने मागील काही दिवसांपूर्वी लिंग परिवर्तनाचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे जात वंश पात धर्म याच्या पलीकडे जावुन समाजात आधुनिक विकासाची कास धरली आहे. आधुनिक काळातील समाजाने विज्ञानवादी विचारांची भुमिका घेतली आहे. अशा तरुणाईच्या मागे समाजाने उभे राहण्याची गरज आहे. यातुनच समाजाची नवनिर्मिती होवू शकते. कुठलीही मनामध्ये भिड न बाळगता समाजातील रुढी परंपरांना लाथाडुन शाहु, फुले यांच्या आधुनिक पुरोगामी विचाराची संकल्पना रुजविण्यात अंश खलिपे यांनी योगदान दिले आहे. अशा पध्दतीची भुमिका समाजात सर्व स्तरात पोहचली पाहिजे.
अंश खलिपेच्या या निर्णयामुळे समाज परिवर्तनाच्या चळवळीत ही गोष्ट नक्कीच नांदी ठरणार आहे. यामुळे समाजात असे निर्णय घेण्याच्या बाबतीत अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे अशा दबलेल्या असंख्य तरुण-तरुणींना नवीन वाट दाखविली आहे. अंश यांच्या वरती दुसऱ्या टप्याची यशस्वी शस्त्रक्रिया झालेली असुन काही महिन्यांनी तिसऱ्या टप्यातील शस्त्रक्रियेनंतर त्याचे यशस्वी लिंग परिवर्तन होईल.



No comments:
Post a Comment