Tuesday, August 9, 2022

खानापूर येथील शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून दिला एकात्मतेचा संदेश

 


खानापूर येथील शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून दिला एकात्मतेचा संदेश



खानापूर येथील शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून दिला एकात्मतेचा संदेश

शिवकुमार कल्याणी लिंगायत टिव्ही लाईव्ह देगलूर..!

मा. मुख्य कार्यकारी महोदय यांच्या सूचनेनुसार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी या हेतूने  *दि. 09 ऑगस्ट 2022  मंगळवारी क्रांती दिनाचे औचित्य साधून, शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली

 जि. प. हा. खानापुर  ता देगलुर येथील  शाळेत मानवी साखळी तयार करून यांमधून एकात्मतेचा संदेश दिला असुन अशा उपक्रमांमुळे नागरिकांत एकात्म भावना व राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी मदत होईल असं  यावेळी  विषदं करण्यात आले,दिनांक १३ ते १५ऑगष्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचा संकल्प ही यावेळी करण्यात आला. 



खानापुर बस स्टॉप मेन रोड वर एकमेकांच्या हातात हात घेऊन मानवी साखळी तयार करण्यात आली. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन मानवी साखळी मुलांची, मुलींची स्वतंत्र मानवी साखळी करण्यात आली.भारत माता की जय,वंदे मातरम्,हम सब एक है च्या घोषणा देत हातात तिरंगा झेंडा घेऊन "घरोघरी तिरंगा लावू,भारत गीते आपण गाऊ"अशा घोषणा देण्यात  आल्या, त्यामुळे या घोषणांनी संपूर्ण खानापूर परिसर दणाणून गेला होता,यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री गज्जलवार , श्री.शिरामे , श्री.विधमवार , श्री बल्लाळ  , श्री.अक्कमोड ,सौ. साळुंके , सौ.कबीर , सौ.पाटील  व सांस्कृतिक प्रमुख श्री कदम , अक्येमवार यासह यावेळी गावातील बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिकांचीही उपस्थिती होती.





No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...