नागठाणे येथील चौकात दररोज एक कर्मचारी नेमणूक,बोरगांव पोलीस ठाण्याचे सपोनि चेतन मछले
नागठाणे येथील चौकात दररोज एक कर्मचारी नेमणूक,बोरगांव पोलीस ठाण्याचे सपोनि चेतन मछले , सातारा जिल्हा वडाप संघटनेचे अध्यक्ष यांचे सोबत चर्चा करताना
नागठाणे ता.०६ :- रवींद्र वाकडे
नागठाणे तालुका सातारा येथे वारंवार होत असणाऱ्या अपघात ,आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नागठाणे येथील चौकात दररोज एक कर्मचारी नेमणूक करण्यात येणार , बोरगांव पोलीस ठाण्याचे सपोनि चेतन मछले
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बोरगांव पोलीस ठाण्याचे सपोनि चेतन मछले यांनी संपूर्ण चौकाची पाहणी करून उद्यापासून नागठाणे चौकात एक पोलीस हवालदार यांची नेमणूक करू अशी माहिती दिली. बुधवारी पहाटे नागठाणे येथील भर चौकात एका दांपत्याचा झालेल्या भीषण अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि चेतन मछले यांनी शुकवारी सायंकाळी संपूर्ण चौकाची पाहणी करून सातारा वडाप गाड्यांचे चालक तसेच नागठाणे चौकातील व्यावसायिक दुकानदार आणि उपस्थित सर्व नागरिकांना वाहतूक नियमांचे योग्य रीतीने पालन करण्याच्या मार्गदर्शनपर सूचना दिल्या. त्यावेळी सातारा जिल्हा वडाप संघटनेचे अध्यक्ष दिपक नलावडे, वडाप चालक, मालक तसेच पोलीस हवा.अमोल गवळी, वाहतूक विभागाचे पोलीस हवा.विजय देसाई, विजय साळुंखे आदी कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना सपोनि चेतन मछले यांनी नागठाणे हे बाजारपेठेचे गाव असून मंगळवार हा बाजाराचा दिवस सोडून व्यावसायिक दुकानदार यांना माल वाहतूक करत येणाऱ्या गाडयांना सुद्धा शक्यतो मंगळवार सोडून अन्य दिवशी चौकात गर्दी नसताना बोलावून माल वाहतूक करून घ्यावी जेणेकरून चौकात मोठ्या गाड्यांची गर्दी राहणार नाही आणि त्या कारणे अपघाताचे प्रमाण कमी होईल. तसेच वडाप गाड्यांचे चालकांनी सुद्धा आपल्या गाड्या चौक सोडून पुढे बोरगावचे दिशेने उभ्या कराव्यात अशा कडक सूचना दिल्या. आजपर्यंत दोन महिन्यात सपोनि चेतन मछले यांनी आपल्या कार्यकाळात विनाकारण भर रस्त्याचे बाजूस उभ्या राहणाऱ्या २१ गाडी चालकांवर कारवाई केली असून उद्यापासून नागठाणे येथील चौकात दररोज एक कर्मचारी नेमणूक करून विनाकारण गर्दी करणाऱ्या गाड्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती दिली....!



No comments:
Post a Comment