खटाव - माण तालुक्याचे भाग्यविधाते मा. ना. कै.भाऊसाहेब गुदगे
यांच्या पवित्र स्मृतीस
विनम्र अभिवादन -
प्रा.अजय शेटे.
सातारा , दि.8 -
उरमोडी व जिहे - कठापूर योजनेचे जनक व खटाव तालुका ग्राम पाणी योजनेचे जनक
मा. ना. कै.भाऊसाहेब गुदगे यांचे मूळगाव मायणी तालुका ,खटाव, जि.सातारा हे होय. त्यांनी बी. ए.एल एल.बी.शिक्षण पूर्ण करून कायद्याचा चांगला अभ्यास पूर्ण केला होता. घरची परिस्थिती अतिशय चांगली असल्या मुळे या कुटुंबाने पूर्वीपासून सामाजिक कार्य करताना अनेकांना आर्थिक व भौतिक ,सामाजिक मदत करून आपला लोकसंग्रह जतन करून ठेवला होता .त्यामुळे साहजिकच त्यांना आपल्या राजकीय कार्यात या सर्वाचा खूप उपयोग झाला. सुरुवातीपासून ते काँग्रेस चे नेते होते.त्यानंतर राष्ट्रवादी, अपक्ष असा प्रवास वेळोवेळी करत जनमताचा आदर करून राजकीय यश मिळवले.सुरुवातीला मायणी ग्रामपंचायत,मायणी गण - गट येथील राजकारण पार करत ते खटाव तालुका पंचायत समितीचे सभापती बनले.मार्केट कमिटी, मायणी बँक,ग्राहक संघ,मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ,भारत माता वाचनालय ,सद्गुरू यशवंत बाबा ट्रस्ट उत्सव अशा विविध राजकीय,सामाजिक व शैक्षणिक व व्यायसायिक कार्यात त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला व आदर्श लोकनेता ही आपली बिरुदावली सार्थ ठरवली. अशा या उरमोडी व जिहे कठापूर योजनेचे जनक,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष्,सलग चार वेळा खटाव तालुक्यातून विधानसभेवर निवडून गेलेले ,खटाव - माण तालुक्याचे भाग्यविधाते कै. मा.आ. ॲड.मोहन पांडुरंग तथा भाऊसाहेब गुदगे ( काका ) यांच्या स्मृती दिनानिमित्त
वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही लाईव्ह यांचे तर्फे त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन.
No comments:
Post a Comment