Saturday, August 6, 2022

श्री बसव ज्योती संदेश यात्रेचा अतिशय उत्साहात शुभारंभ


श्री बसव ज्योती संदेश यात्रेचा अतिशय उत्साहात शुभारंभ 
 
सातारा, दि.7 - प्रसाद वाकडे
 श्री बसव पंचमी चा योग साधून 'आझादी का अमृत महोत्सव  ' या  कार्यक्रमांतर्गत कल्याण कर्नाटक प्रतिष्ठान तर्फे श्री बसव ज्योती संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ,त्या माध्यमातून अनेक जन जागृतीचे कार्यक्रम होणार आहेत.
या संदेश यात्रेची सुरुवात 
श्री सिद्ध रामेश्वर समाधी स्थळ ,सोलापूर येथून झाली आहे. तसेच पुढे 75 गावात ही 'बसव संदेश ' यात्रा मार्गक्रमण करणार आहे.

याच यात्रेच्या पहिल्याच टप्प्यात असलेल्या ' विद्या विकास शिक्षण संकुल, मंठाळ,बसवकल्याण येथे या संदेश यात्रेचे अतिशय दिमाखदार व भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी श्री बसव प्रार्थना, वचन विचार याचे पठण करण्यात आले.तसेच सुप्रसिद्ध वक्ते मा.बसवकुमार पाटील यांचे 'स्वातंत्र्य युद्ध वीरांची यशोगाथा ,त्यांचे देशप्रेम,देशभक्ती व आजच्या  मुलामुलींचे उज्वल भवितव्य '  या विषयावर  सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान झाले.यावेळी विद्यार्थी- विद्यार्थिनींना स्वातंत्र्य वीरांच्या पराक्रम कथांची पुस्तके वाटप करण्यात आली.
विद्या विकास शिक्षण संस्था टिम ने या कार्यक्रमाचे अतिशय उत्तम आयोजन केले होते.त्याच प्रमाणे योग्य नियोजन करून श्री बसव महाप्रसाद दासोह व्यवस्था करण्यात आली होती.

मंठाळ येथील या भव्य कार्यक्रमासाठी शरण संतोष मलशेटे यांनीही अतिशय मोठे असे समन्वय कार्य केले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.संजय इंडे,रवि खुबा,नृसिंह मुळे व इतर सर्व मंडळी हजर होती.तसेच संध्याकाळी महात्मा बसवेश्वर चौक येथील श्री महादेव मंदिर सभागृहात  खास  ' श्रावण प्रकाश '  कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी श्री बसवप्रभू स्वामीजींचे प्रवचन,श्री बसव कुमार पाटील यांचे व्याख्यान तसेच श्री.शिवकुमार शटगर ,श्री. घाळप्पा गुरुजी,श्री.रवी खुबा,श्री.नृसिंह मुळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नागेश तांबोळी यांनी केले. मा.सुमित्रा दावनगिरे व महिला मंडळ टिम ने मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजामध्ये श्री बसव गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात व शेवट केला.श्री.शिवकुमार शटगर,श्री.नागेश तांबोळी ,श्री. शाम हत्ते व मित्र मंडळ व ग्रामस्थ यांनी श्री महाप्रसाद दासोह सह सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले.या कार्यक्रमात ' भारत देशा - जय बसवेशा ' अशा घोषणा देण्यात आल्या.या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व उपस्थितांना या कार्यक्रमाच्या आयोजनाने अतिशय आनंद वाटला.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...