Tuesday, August 2, 2022

कै.भालचंद्र गणपती झरेकर यांचे प्रथम पुण्यस्मरण

 



 कै.भालचंद्र गणपती झरेकर यांचे प्रथम पुण्यस्मरण 



सातारा , दि.3 - कै.भालचंद्र गणपती झरेकर, (आप्पा ) पुजारी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रविंवार  दि.07.08.2022 रोजी सकाळी 10 ते 12.00 या वेळेत त्यांच्या राहत्या घरी शिवडे येथे ह. भ. प.शिवाजी भोसले सर्, एकसळ यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित केले आहे. तरी सर्वांनी किर्तन व फुलांच्या कार्यक्रमास हजर रहावे.असे आवाहन शोकाकुल श्री मायाक्का देवस्थान कमिटी व ग्रामस्थ शिवडे यांनी केले आहे.




कै. पुजारी यांनी आपला संसार अतिशय कष्टाने फुलविला होता.सर्व कुटुंबाला व गावकऱ्यांना  त्यांनी अतिशय मायेच्या सावलीत वाढवले होते.आईच्या ममतेने त्यांनी सर्वांवर प्रेम केले होते.परंतु अशी साथ त्यांच्या अचानक निधनाने संपून गेली.परंतु त्यांनी दिलेले संस्कार आम्ही कायम जतन करून ठेवू.तसेच तुम्ही पुन्हा जन्माला यावे आणि आम्हाला सुसंस्कार द्यावेत.अशी भावना शिवडे ग्रामस्थ व त्यांचे कुटुंबीय यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...