Tuesday, August 2, 2022

खानापूर ग्रामपंचायतीचा भोगंळ कारभार भर पावसाळ्यात पाणी टंचाईमुळे घागर मोर्चा; ग्रामस्थांचा आक्रोश..

 

          खानापूर ग्रामपंचायत वर धडकला घागर मोर्चा  ग्रामस्थांकडून तिव्र आक्रोश व संताप व्यक्त

खानापूर ग्रामपंचायतीचा भोगंळ कारभार भर पावसाळ्यात पाणी टंचाईमुळे  घागर मोर्चा; ग्रामस्थांचा आक्रोश..


खानापूर ग्रामपंचायतीचा भोगंळ कारभार भर पावसाळ्यात पाणी टंचाईमुळे  घागर मोर्चा; ग्रामस्थांचा आक्रोश..



 खानापूरदि २ ;-  शिवकुमार कल्याणी प्रतिनिधी लिंगायत टिव्ही लाईव्ह देगलूर..!



देगलूर तालुक्यातिल एक मोठी ग्रामपंचायत म्हणून खानापूर ग्रामपंचायत हि गणल्या जाते, भर पावसाळ्यात येथील लोकांना पाणी मिळत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी खानापूर ग्रामपंचायत वर घागर मोर्चा काढून आपला आक्रोश व्यक्त केले आहे



खानापूर येथील इंदिरा आवास वसाहतीत राहाणारे जनतेला पाण्यासाठी नळ व्यवस्था नाही,येथे शंभर ते दिडशे कुटुंबियांना पाणी मिळत नाही,त्यांनी हि बाब अनेकदा ग्रामपंचायत ला कळवून सुद्धा त्यांना पाणी मिळावे असे काहीच प्रयत्न न झाल्याने अखेर संतापलेल्या नागरिकांनी आज दि २ रोजी खानापूर ग्रामपंचायत वर घागर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.. ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर मोर्चा काढला. यामध्ये सुमारे सव्वाशे ग्रामस्थ ज्यामध्ये महिला , अबालवृद्ध तथा तरूण, सहभागी झाले होते




कोणी पाणी देता का पाणी?व ग्रामपंचायत हाय हाय, आम्हाला पाणी पुरवठा करा, नाहीतर खुर्ची खाली करा अशा घोषणांनी खानापूर परिसर दणाणला




 पाणी नाही नळाला, ग्रामपंचायत हवी कशाला, पाणी सुरळीत करा,  घोषणांनी  परिसर दणाणून गेला होता. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. हंडे, घागरी वाजवत कोणी पाणी देता का हो पाणी अशी घोषणा देत नागरिकांनी  ११ वाजता घागर मोर्चाला सुरूवात झाली. इंदिरा आवास ते खानापूर ग्रामपंचायतपर्यंत पायी चालत घागर मोर्चा काढण्यात आला होता, याठिकाणी ग्रामविकास अधिकारी हजर राहत नसुन ते जिल्ह्यावरूण ग्रामपंचायत चे काम पाहात असतात,आशा गैरजबाबदार ग्रामसेवकांची तातडीने बदली करण्याची मागणी ही यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली , येत्या आठवडाभरात जर आम्हाला पाणी पुरवठा झाला नाही तर ग्रामपंचायत ला टाळं ठोकू असा इशारा यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला



No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...