Saturday, August 6, 2022

श्री बसव पंचमी व अक्का नागलंबिका जयंती संपन्न

 

                      श्री बसव पंचमी व अक्का नागलंबिका जयंती संपन्न 


 श्री बसव पंचमी व अक्का नागलंबिका जयंती संपन्न 

सातारा, दि.7 - प्रसाद  वाकडे.

श्री बसव सेवा प्रतिष्ठान ,पुणे यांचे तर्फे श्री बसव पंचमी व अक्का नागलंबिका उर्फ नागाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून म.बसवेश्वर पुतळा स्मारक व परिसराची स्वच्छता करण्यात आली.यानंतर म.बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली.तसेच श्री बसव वचन विचार गोष्टींचे वाचन करण्यात येवून ,श्री बसव प्रार्थना करण्यात आली.तसेच अनुभव गोष्टींची चर्चा करण्यात आली.

यावेळी  मसाला दूध वाटप दासोह करण्यात आला.तसेच महाराष्ट्र बसव परिषदेतर्फे  ' आसरा  आश्रम ' येथील वृद्ध व जेष्ठ नागरिक स्त्री - पुरुषांना मसाला दूध व ब्रेड वाटप दासोह करण्यात आला.

यावेळी या उपक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व समाज सहयोगीना प्रतिष्ठान तर्फे धन्यवाद देण्यात आले.



No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...