शिरोळ तालुका लिंगायत समाजाने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
शिरोळ तालुका लिंगायत समाजाने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समयी दीप प्रज्वलन करताना
शिरोळ तालुका लिंगायत समाजाने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
शिरोळ दि १ ;- रमेश मिठारी , संजय शहापुरे शेडशाळ , लिंगायत TV live प्रतिनिधी
समस्त शिरोळ तालुका लिंगायत समाज वतीने टारे मल्टीपर्पज व्हाल शिरोळ येथे लिंगायत समाजातील १० वी ,१२ वी , युपीएससी व एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी क्षारपड मुक्त शेतीचे जनक,दत्त चे चेअरमन गणपतराव पाटील होते.ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की युवकांनी करियर म्हणून शेती निवडावा व आपले ज्ञान युवकांनी शेतीमध्ये घालून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून शेतीचे उत्पादन वाढवू शकतो त्यामुळे शेतीकडे वळले पाहिजे असे मत व्यक्त केले.एमपीएसी स्टेट रॅक २०२० मध्ये यश मिळविलेले प्रमोद चौगुले म्हणाले की आपल्या यशात आई-वडिलांचा, शिक्षक , मित्र परिवाराचा साथ असतो त्यामुळे मी यशस्वी झालो असं म्हणुनये.नायब तहसिलदार एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेले शिरिष शहापुरे म्हणाले की पालकांनी आपल्या पाल्याचा कल ओळखून त्याला संधी दिले पाहिजे.यावेळी प्रमुख वक्ते जयसिंगपुर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र कुंभार यांनी लिंगायत जन्माला येतात पण ते लिंगायत नाहीत त्यासाठी महात्मा बसवन्नांचे वचन साहित्य वाचून ती आचरणात आणले पाहिजे अन माणुस म्हणून जगता आलं पाहिजे. मानसाला आपल्या बरोबर देव पाहीजे यासाठी धर्मगुरु बसवन्नानी आपल्याला इष्टलिंग दिली आहे.ही फार मोठी गोष्ट आहे.ती सर्वानी आचरणात आणावी असे विनंती केले.गुरुकुल आय.आय.टी व मेडीकल ॲकॅडमी, अब्दुललाट चे चेअरमन गणेश नायकुडे यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की पालकांनी आपल्या पाल्याला त्यांच्या इच्छेप्रमाणे शिकवा व त्याला संधी द्यावी तर विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचा आदर बाळगा असे सांगितले.
लिंगायत समाजाचे नेते मिलिंद साखरपे भाऊ यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की समाजात एकसुत्रीपणा नसल्याने एकी असण्याचे लाभ मिळत नाही त्यामुळे समाजात एकी असावे असे आव्हान केले.
कार्यक्रमाची सुरुवात लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने व ओम श्री गुरू बसव लिंगाय नमः या मंत्र पठणाने करण्यात आला.या कार्यक्रमासाठी रमेशकुमार मिठारे,संजय शहापुरे, स्वप्निल चौगुले,सुधिर शहापुरे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.सुनिल गुरव, तरुण दत्तवाडे, डॉ.बी.के.देवताळे, सच्चिदानंद आवटी, संतोष बिडवे, अजितकुमार कोरे, फोटोग्राफर- सुरेश मेंगे, जे.आर.बेळकुड,शंकर कागले आदीनी सहकार्य केले.कार्यकर्माचे सुत्रसंचलन राजेंद्र ऐनापुरे व मनोजकुमार रणदिवे यांनी केले तर आभार शैलेश आडके यांनी मानले.




No comments:
Post a Comment