Monday, August 15, 2022

हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत अनेक कार्यक्रम संपन्न , 'स्वातंत्र्य चळवळ ' आंदोलन व ' कायदा लष्कर ' नाटीकांनी जिंकली देशप्रेमी रसिकांची मने

 

 हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत अनेक कार्यक्रम संपन्न 

'स्वातंत्र्य चळवळ ' आंदोलन व ' कायदा लष्कर ' नाटीकांनी जिंकली देशप्रेमी रसिकांची मने 


 हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत अनेक कार्यक्रम संपन्न 

'स्वातंत्र्य चळवळ ' आंदोलन व ' कायदा लष्कर ' नाटीकांनी जिंकली देशप्रेमी रसिकांची मने 



सातारा, दि.15 - प्रा.अजय शेटे.

 सन 1942 च्या हुतात्म्यांची स्मृती कायम जतन रहावी यासाठी वडूज शिक्षण विकास मंडळ तर्फे चालवण्यात येणाऱ्या हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये दि.9 ते 15 ऑगस्ट 2022 या कालखंडात ' स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव '  कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी - विद्यार्थिनींसाठी अनेक  शैक्षणिक उपक्रम राबविले गेले.

   यामध्ये ज्युनियर कॉलेजच्या वतीने निबंध,वकृत्व ,चित्रकला स्पर्धा व ' 'कराओके  संगीत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यामध्ये नितीन उर्फ बंटी लंगडे,शंकर चव्हाण,,प्रा.रोहिणी बडवे,प्रा,ज्योती कुलकर्णी,प्रा.वासंती शेळके, प्रा.राधिका डोंबे  व विद्यार्थीनी यांनी गीत गायन केले.तसेच प्रा.अजय शेटे यांनी गीत गायन करण्याबरोबरच कार्यक्रमाची संपूर्ण मिमिक्री केली.


या कार्यक्रमात उपप्राचार्य महेश गोडसे व ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.एस. बी.जाधव यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.संदीप तिवाटणे, प्रा.रवींद्र येलमर, प्रा.शुभांगी पंडित ,प्रा.प्रशांत कुलकर्णी,प्रा.निवास मगर यांनी परिश्रम घेतले.


त्यानंतर तहसील कार्यालय ,खटाव ( वडूज ) निवडणूक शाखेतर्फे मतदान व मतदार जागृती कार्यक्रम अंतर्गत आधार कार्ड ला मतदान कार्ड लिंकिंग करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या वेळी नायब तहसीलदार रविकांत जाधव यांनी विद्यार्थी व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रशांत केंगार उपस्थित होते.

माध्यमिक विभागातर्फे ' 1942 ची स्वातंत्र्य चळवळ आणि व डू ज मधील नऊ हुतात्मे ' व ' कायदे लष्कर '  ही विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघु नाटिका सादर करण्यात आल्या. या नाटिका सादर करण्यासाठी सहाय्यक शिक्षक किरण लोखंडे ,पंकज  पवार यांनी अधिक परिश्रम घेतले.या नाटीकांचे दिग्दर्शन प्रा.अनिल माने यांनी केले,निवेदन अंबादास भंडारे यांनी केले.


ज्युनियर कॉलेज व हायस्कूल  यांच्या वतीने शाळा प्रांगणात वडू ज शिक्षण विकास मंडळ यांच्या वतीने व हस्ते ध्वजारोहण व वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.त्यानंतर संपूर्ण गावातून प्रभात फेरी घोषणा देत काढण्यात येवून तहसील कार्यालय, वडूज येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग घेण्यात आला.यावेळी शाळेच्या विद्यार्थिनी गीत मंचातर्फे संगीतमय देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.यामध्ये सहाय्यक शिक्षक संतोष स्वामी, रुपाली येवले ,राजश्री भिंगारदिवे ,किरण कांबळे  विद्यार्थिनी यांनी गीत गायन केले.त्यांना संगीताची साथ रवींद्र चौधरी,जाधव सर् यांनी दिली.संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन प्रा.राजेंद्र जगदाळे यांनी केले.


     सर्व कार्यक्रमातील उत्कृष्ठ रंगीबिरंगी फलक लेखन कला शिक्षक विजय शेंडे , व्ही. डी.राऊत  यांनी केले तर तांत्रिक सहाय्य  सहायक शिक्षक ज्ञानेश्वर लहारे यांनी केले.

प्रभात फेरीत एन.सी.सी. कॅडेट ,स्काऊट , गाईड व  बँड पथक सहायक शिक्षक अनिल राऊत,आर.बी.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामील झाले होते.

विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य आंदोलनातील देशप्रेमी स्त्रिया,भारतमाता ,झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या हुबेहूब  रंगीबिरंगी वेशभूषा  सादर केल्या होत्या.यासाठी सहायक शिक्षिका वैशाली आस्मे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक दिलीप फडतरे ,पर्यवेक्षिका भारती माने यांनी अथक परिश्रम घेतले.

वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित म.फुले प्राथमिक शाळा व प्रेरणा पूर्वप्राथमिक केंद्र यांचीही प्रभात फेरी बँड  पथकासह या बरोबरच काढण्यात आली होती. 

या विभागाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका शितल शिंदे, विजया खराडे,आशुतोष गवळी यांनी अतिशय परिश्रम घेतले.

 सर्व कार्यक्रमाला वडूज शिक्षण विकास मंडळ ,वडूज यांचे भक्कम पाठबळ लाभले. तसेच सर्व शिक्षक - शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी ,पालक वर्ग,विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी उत्तम सहकार्य करून कार्यक्रम पूर्णपणे  यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. 



No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...