हर्रर्र बोला.. हर्रर्रच्या गजरात निघाली 68 लिंग पदयात्रा निमित्त श्रावणमासाचे 68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हीजनचा उपक्रम
हर्रर्र बोला.. हर्रर्रच्या गजरात निघाली 68 लिंग पदयात्रा निमित्त श्रावणमासाचे 68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हीजनचा उपक्रम
सोलापूर दि १४ : राजशेखर बुरुकुल्रे
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी शहराच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंगांचे एकदा हर्र बोला.. हर्र... श्री सिध्देश्वर महाराज की जय, या जयघोषात अभिषेक करुन भाविकांनी रविवारी ६८ लिंगांचे दर्शन घेतले.
प्रातःकाळी मंगलमय वातावरणात जेष्ठ समाजसेवक बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत वीरशैव व्हिजनचे अध्यक्ष राजशेखर बुरकुले, 68 लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, संजय साखरे, राजेश नीला, होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण, नागनाथ चांगले, अरुण पाटील, आशा शेटे, रेखा बंडगर, सोनाबाई लांडगे, श्रुती माळगे, भाग्यश्री भास्कर, सपना गायकवाड आदी सहभागी झाले होते.
श्रावणातील तिसऱ्या रविवारी निघालेल्या या पदयात्रेत महेश माळगे स्वामी यांनी प्रत्येक लिंगाची पूजन व अभिषेक केले. या पदयात्रेत शहर परिसरातील भाविकांसोबतच दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट येथील सुमारे 250 भाविकांचा समावेश होता. विशेष करुन या पदयात्रेत ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग उल्लेखनीय होता.
पदयात्रेच्या मध्यंतरात शिवानुभव मंगल कार्यालय येथे दीपकभाऊ निकाळजे बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी यांच्या वतीने सहभागी भाविकांना अल्पोपहार व चहा देण्यात आला.
68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हीजनतर्फे श्रावण महिन्यानिमित्त काढलेल्या 68 लिंग पदयात्रेत सहभागी भाविक
पदयात्रेच्या यशस्वितेसाठी बसवराज बेऊर, आनंद नसली, उज्वल सावळगी, अशोक ग्वालगेरी, संगप्पा मेणसे, प्रशांत जाधव, विनायक कलशेट्टी, धानेश सावळगी, सचिन विभुते यांनी परिश्रम घेतले.








No comments:
Post a Comment