आभाळ मायेचा छत्रपती श्रीमंत छ.शाहू महाराज
विशेष लेख - प्रा.अजय शेटे.
आभाळ मायेचा छत्रपती श्रीमंत छ.शाहू महाराज
विशेष लेख - प्रा.अजय शेटे.
सातारा, दि.6 -
आज 6 मे 2022 ,करवीर नगरीचे राजे श्रीमंत छ.शाहू महाराज यांची 100 वी पुण्यतिथी संपूर्ण महाराष्ट्र व भारतभर अनेक ठिकाणी साजरी केली जात आहे.आज त्यांच्या लोकोत्तर महान कार्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी बरोबर सकाळी 10 वा आहे या ठिकाणी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून त्यांना व त्यांच्या कार्याला भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली आणि या लोक राजाचे आदरयुक्त स्मरण करण्यात आले.
छ.शाहूंनी कोल्हापूर संस्थानचे अधिपती म्हणून अनेक समाज उपयोगी कामे पार पाडली.राधानगरी धरण,गरीब कुटुंबांसाठी ची घरकुल योजना,लिंगायत,जैन,मराठा बोर्डिंग,शाळा संकुल,रोजगार योजना यासारख्या अनेक योजना राबवून त्यांनी समाज सुधारणेचा उपक्रम केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरू करून परदेशात जाऊन शिक्षण घेण्यास मदत केली.भटक्या विमुक्त जातीतील लोकांच्या वाईट सवयी सवयी कमी व्हाव्यात .म्हणून त्यांना स्वतःचे अंगरक्षक म्हणून नेमले.नगराची सुरक्षा व्यवस्था करण्याची ,राखण करण्याची जबाबदारी त्यांना दिली.त्यांना धरण, कालवे,तलाव,घरे बांधणी अशी रोजगाराची कामे देवून त्यांच्या अंगातील शक्तीला योग्य मार्गाला लावले.त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवला.
श्री महालक्ष्मी मंदिर पूजा, व्यवस्थापन,राजवाडे ,राजवास्तू,कारागृह ,शाळा संकुल इमारती,विद्यार्थी वस्ती गृहे उभारून शिक्षण चळवळीला गती दिली.
शेती,शेती व पिण्याचे पाणी,धान्य गोदा मे यांचे काटेकोर नियोजन करून सोयीसुविधा उपलब्ध केल्या.चोर,लुटारू,दरोडेखोर यांचा बंदोबस्त करून जनतेला सामाजिक सुरक्षेची हमी दिली.पशुपालन ,जातिवंत जनावरे पैदास,खत निर्मिती यांना प्राधान्य दिले.स्वतः हून अनेक वेळा रात्री,अपरात्री,पहाटे फिरून नगर रचना व नगर सुरक्षा यांचा आढावा घेतला.अंधश्रद्धा,अतिरिक्त कर्मकांड यांना विरोध करून मानवतेच्या मंदिरात जिवंत मानवांची पूजा केली.
आपण महाराष्ट्रातील तमाम सामान्य जनतेचे राजे आहोत .ही भावना सतत मनात बाळगून कोणताही राजेशाही थाट माट व डामडौल केला नाही शिस्तबध्द आरोग्य मय जीवन जगत इतरांना पण प्रेरणा दिली.श्रम संस्काराला महत्त्व दिले.साधी राहणी ,उच्च विचारसरणी वर्तनात बाळगली.कोणतेही नबाबी चोचले न करता खास कोल्हापुरी आहार पद्धतीला प्राधान्य दिले,जे पाणी प्रजा पे यी ल तेच राजा पण पे यि ल आणि जे अन्न प्रजा खाईल तेच अन्न राजा पण खाईल.अशी खास सात्विक महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती जपण्यासाठी त्यांनी आपल्या
भ टारखा न्यात खास मराठमोळे आचारी नेमून स्वतःची व राजदरबारी काम करणाऱ्या नोकरांची अन्न पाण्याची व्यवस्था केली.जे प्रजेच्या घरात खाल्ले जाई तेच राजाच्या दरबारी खाल्ले जाईल.असा खाद्य संस्कृती पासून वर्तन पद्धतीचा शिस्तबद्ध पायंडा पाडत अतिशय कमी वयात वयाच्या फक्त 48 व्या वर्षी हा राजा शिवैक्य झाला. वय वर्षे 20 पासून अतिशय कमी वयात राज्याची जबाबदारी स्वीकारून वय वर्षे 48पर्यंत सलग 28 वर्षाच्या अतिशय कमी कालखंडात या राजाने जे अतुलनीय कार्य केले आहे.त्याची भारत आणि पर्यायाने महाराष्ट्रातील इतिहासात एक आगळी वेगळी नोंद नक्कीच झाली आहे.अशा या आभाळ मायेच्या छत्रपती शाहू महाराजांना महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून मानाचा मुजरा,मानाचा मुजरा. छ.शाहू महाराज की,जय .
No comments:
Post a Comment