पांढरकवडा शहरात वीरशैव लिंगायत हीतसंवर्धक मंडळाचे वतिने म.बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी
पांढरकवडा ( यवतमाळ) दि 5 :- दि 5:- पांढरकवडा जि.यवतमाळ) अरुण डोंगशनवार, लिंगायत TV live प्रतिनिधी
पांढरकवडा शहरात वीरशैव लिंगायत हीतसंवर्धक मंडळाचे वतिने म.बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.या वेळेस शहरात शोभायात्रा देखील काढण्यात आली.
शहरात म.बसवेश्वर जयंतीनिमित्त शोभायात्रा जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळील कै.बाळासाहेब काळे यांचे निवासस्थानाहुन काढण्यात आली.सदर शोभायात्रा स्टेट बॅंक , बिरसामुंडा चौकाने मार्गस्थ होत म.बसवेश्वर चौकात पोहचली.तिथे चौकात चारही बाजूस असलेल्या प्रतिमेचे पूजन वीरशैव लिंगायत महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ.माधुरी दिवाणे,सौ.लिना अरुण डोंगशनवार, सौ.प्राजक्ता प्रमोद पंचभाई,आणि सौ.हुगेवार यांनी केले तर पुष्पहार वीरशैव लिंगायत हीतसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष अरुण डोंगशनवार, उपाध्यक्ष प्रमोद पंचभाई,सचिव मंगेश चांदेकर आणि डाॅ.राहुल हातगावकर यांनी अर्पण केले.
शोभायात्रेद्वारे चौकातील म.बसवेश्वरांचे प्रतिमेला अभिवादन करून शोभायात्रा आल्या मार्गानेच उत्तरवार ले आउट मधील विसावा वाटीकेत शोभायात्रा पोहोचली. तिथे सर्व प्रथम म.बसवेश्वरांचे प्रतिमेचे पूजन समाजातील जेष्ठ नागरिक गणपत कौरवार यांचे तसेच न.प.चे मुख्याधिकारी राजूभाऊ मोट्टेमवार, वीरशैव लिंगायतहीत संवर्धक मंडळाचे अध्यक्ष अरुण डोंगशनवार,वीरशैव लिंगायत महिला संघटनेच्या अध्यक्षा माधुरी दिवाणे यांचे हस्ते पूजन करण्यात आले.तसेच या प्रसंगी वीरशैव लिंगायत समाजाचे भुषण असलेले पांढरकवडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजूभाऊ मोट्टेमवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामधे सर्वप्रथम लहान मुलाकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नंतर म.बसवेश्वरावर आधारित भक्तीगीताचा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाचे संचालन सौ.गीता डोंगरे यांनी केले. स्नेहभोजना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.म.बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी वालुरकर साहेब, अंबर काळे, गणेश नांदेकर, मोहन काळे,सुहास हातगावकर,प्रवीण नंदनकर,मारोतराव आरेवार, विशाल सपाटे,अरुण कत्तेवार,संदीप पंचभाई,संदीप मिटकर,गजानन मिटकर,सौ.सुनिता काळे,सौ.भारती महाजन,सौ.ज्योती महाजन,मेघा काळे,प्रिती चांदेकर,सोनाली काळे पल्लवी नारींगे आदींनी परिश्रम घेतलेत.
No comments:
Post a Comment