कुरुंदवाड येथे म.बसवेश्वर जयंती सोहळा मोठ्ठ्या उत्साहात साजरी
कुरुंदवाड दि ५ :- प्रतिनिधीः सच्चीदानंद आवटी ,
कुरुंदवाड म.बसवेश्वर जयंतीनिमित्त श्री कल्लेश्वर मंदिर ,कुरुंदवाड येथे म.बसवेश्वर जयंती सोहळा मोठ्ठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री कल्लेश्वर मंदिर येथे श्री कल्लेश्वर महाराजांच्या पिंडीला सामुदायिक महाभिषेक घालण्यात आला.या कार्यक्रमाचे पौरोहित्य श्री ओंकार जंगम यांनी केले.महाभिषेकानंतर मंदिरातील श्री बसव प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
तसेच म.बसवेश्वर चौक फलकाचे पुजन करुन स्वा.से.श्रीपालकाका आलासे अर्बन बँकेचे चेअरमन श्री. अरुण आलासे आणि लिंगायत समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्री सदाशिव मगदुम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर श्री कल्लेश्वर मंदिरात आयोजित रांगोळी स्पर्धांमध्ये यशस्वी स्पर्धकांची नांवे अशीः प्रथम क्रमांकः सौ.सुप्रिया व्होरा द्वितीयः सौ.रेणुका आवटी तृतीयः सोनाली माळी उत्तेजनार्थः सौ.प्रियांका व्होरा ,भाग्यश्री मगदुम , आकांक्षा पोतदार.बालगट विशेष पुरस्कारः पारस जनवाडे सहभागिता पुरस्कारः प्रेमिला कुंभार ,सानिया कवठेकर .
महात्मा बसवेश्वर जन्म काळ साजरा करताना भगिनी
या कार्यक्रमास म.बसवण्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठान ,अक्कमहादेवी महिला भजनी मंडळ,श्री शिवशक्ती कला,क्रिडा सांस्कृतिक मंडळ,लिंगायत समाज ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि कुरुंदवाड शहरातील सर्वा प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment