बसवेश्वरांनी पशुपक्ष्यांनाही समान लेखले : प्रवीण दर्गोपाटील
वीरशैव व्हिजनतर्फे जनावरांच्या पाण्यासाठी जलकुंभ वाटप
सोलापूर दि 6 : राजशेखर बुरुकुले प्रतिनिधी
बाराव्या शतकात जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांनी आयुष्यभर समतेचा संदेश जगाला दिला. केवळ मानव प्राणी नाही तर पशु, पक्षी, जनावरे व प्राण्यांनाही त्यांनी समान लेखले. त्यांच्या साठी जागोजागी अन्न दासोह आणि पाणवठा सुरु केले असे प्रतिपादन युवा उद्योजक प्रवीण दर्गोपाटील यांनी केले.
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त वीरशैव व्हिजनच्या वतीने जनावरांच्या पाण्यासाठी जलकुंभ वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोलापूर मोबाइल रिटेलर असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय नवले, शिवसृष्टी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अमोल केकडे, सामाजिक कार्यकर्ता गणेश साखरे, वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, सचिव विजयकुमार बिराजदार उपस्थित होते.
हे जलकुंभ शहरातील ५ ठिकाणी पाण्याची कायमस्वरूपी सोय असणाऱ्या व करणाऱ्या व्यक्तींच्या जबाबदारीसह देण्यात आले. ती ठिकाणे व कार्यवाहक पुढीलप्रमाणे आहेत. राजेश नीला - मनमीत ब्लॉसम अपार्टमेंट, जुळे सोलापूर, डॉ. नायडू - बनशंकरी नगर, शेळगी, शिवानंद शीलवंत - बुधले गल्ली, संजय पाथरकर - सम्राट चौक, तम्मा पोतदार - जोडभावी पेठ
याप्रसंगी सोमेश्वर याबाजी, सिद्धाराम बिराजदार, बद्रीनाथ कोडगी-स्वामी, मल्लिनाथ कोटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार बिराजदार यांनी केले. सूत्रसंचालन गंगाधर झुरळे यांनी तर आभारप्रदर्शन बद्रीनाथ कोडगी-स्वामी यांनी केले.
No comments:
Post a Comment