सकल लिंगायत समाज या नावाने किमान समान कार्यक्रमावर महाराष्ट्रातील 12 संघटना राज्य पातळीवर एकत्र आलेल्या आहेत.या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा
मा. आ.विनय जी कोरे साहेब व लिंगायत लोकनेते मा.काकासाहेब कोयटे यांची भेट
सातारा, दि.7 - प्रा अजय शेटे
सकल लिंगायत समाज या नावाने किमान समान कार्यक्रमावर महाराष्ट्रातील 12 संघटना राज्य पातळीवर एकत्र आलेल्या आहेत.
तेव्हा त्यातील काही समाजहिताच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यासाठी वारणा उद्योग समूहाचे सर्वे सर्वा मा. आ. विनय जी कोरे व लिंगायत नेते मा.काकासाहेब कोयटे भेट घडून येवून दीर्घ चर्चा झाली.
या भेटी नंतर आनंद व्यक्त करताना समान कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाकडून भाषिक अल्पसंख्य दर्जा मिळावा. या मागणीचा सहभाग व्हावा व तो मिळाल्यानंतर अल्पसंख्यांक विद्यापीठ स्थापन करण्याची जबाबदारी मी घेतो.असे मा.कोरे साहेब यांनी मा. कोयटे साहेब यांना सांगितले.तसेच अनेक समाज प्रश्न व आंदोलन या विषयी दोघात सविस्तर चर्चा झाली.
No comments:
Post a Comment